केंद्रीय मंत्री आठवलेंनी लाईक केले या मोदी विरोधी ट्विटला ऊर्जा मंत्री राऊत यांचे ट्विट

मुंबई: प्रतिनिधी
राज्य असो किंवा केंद्र असो बदलत्या राजकारणाचे वारे ओळखणारे राजकारणी जे काही आहेत. त्यामध्ये केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे फार वरचे स्थान आहे. या बदलत्या राजकारणाचा अंदाज घेवून राजकिय आघाड्या करण्यातही त्यांचा हात कोणी धरू शकत नाही. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात स्थलांतरीत मजुरांचा प्रश्न, कोरोनाची वाढती संख्या आणि आर्थिक परिस्थितीवरून जनमानसात एकप्रकारचा केंद्र सरकारच्या विरोधात रोष आहे. याच अनुषंगाने काँग्रेसचे राज्यातील मंत्री डॉ.नितीन राऊत यांनी एक ट्विट केले. विशेष म्हणजे या ट्विटला केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी चक्क लाईक केल्याने राजकिय वर्तुळात वेगळ्याच चर्चेला सुरुवात झाली आहे.
विशेष म्हणजे काँग्रेसकडून #modibetrayedindia या नावाने हॅशटॅग चालविला जात आहे. याच माध्यमातून पंतप्रधान मोदी यांना नितीन राऊत यांनी काही प्रश्न विचारले.

About Editor

Check Also

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे ९ निर्णय मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे निर्णय

आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे होते. या बैठकीत पुण्यात होणार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *