रोहित पवार यांचा आरोप, अजित पवार यांच्या विमान अपघातात प्रभावशाली लोक या मंत्र्याचा राजीनामा घ्यावा

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र या विमान अपघातावरून राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू तथा आमदार रोहित पवार यांनी चौकशीची मागणी करत या प्रकरणातील अनेक गोष्टींबाबत प्रश्नचिन्ह उभे केले. त्यातच मुंबई दोन वेळा पत्रकार परिषद घेत रोहित पवार यांनी चौकशीची मागणी केली. मात्र आज दिल्लीत पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी करण्याची मागणी पंतप्रधान मोदी, अमित शाह आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याकडे केली.

रोहित पवार यांनी ब्लॅक बॉक्स आणि इतर त्रुटी माध्यमांसमोर मांडल्या. डीजीसीएकडून करण्यात येत असलेल्या तपासावरही रोहित पवार यांनी आक्षेप घेतला. तसेच व्हिसीआर कंपनीवर बंदी घालण्याची मागणीही केली. तसेच व्हिसीआर कंपनीच्या मालकाला केंद्रातील मोठ्या नेत्याची साथ असल्याचा आरोप केला होता. मात्र आज रोहित पवार यांनी केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

पुढे बोलत असताना रोहित पवार म्हणाले की, या प्रकरणामागे अत्यंत प्रभावशाली लोकांचा सहभाग असून पंतप्रधान मोदी, अमित शाह, विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांना विनंती करणार असून नागरी उड्डाण मंत्री राममोहन नायडू यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केली.

रोहित पवार पुढे बोलताना म्हणाले की, व्हिसीआरला कोणी वाचवत असेल तर तो ही एका षडयंत्राचा भाग असू शकतो. डीजीसीएचे मोठे अधिकारी या मागे आहेत. मला तर असं वाटतं की, अजित पवारांना न्याय देण्याची गरज असेल तर महाराष्ट्र आणि देशातील लोक प्रयत्न करत आहेत. जर न्याय द्यायचे असेल तर या प्रभावशाली लोकांनी लक्ष घातलं पाहिजे. कारण या प्रकरणातील लोकचं प्रभावशाली आहेत. तेच याप्रकरणी न्याय देऊ शकतात. देशातील सर्वात मोठे प्रभावशाही नरेंद्र मोदी, अमित शाह हेच न्याय देऊ शकतील, त्यांनी याप्रकरणी जातीनं लक्ष घालावं अशी मागणी करत यासंदर्भात मोदी यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविणार असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

आशिष शेलार यांची घोषणा, पुढील वर्षी ‘पुणे महोत्सव’ राज्यातील नंबर एकचा महोत्सव करू गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा

पुणे हे विद्येचे, संस्कृतीचे आणि ऐतिहासिक वारशाचे माहेरघर आहे. तीन दिवसांच्या सांस्कृतिक महोत्सवाला पुणेकरांनी दिलेला उत्स्फूर्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *