पवारांच्या पत्रावरून अल्पसंख्याक मंत्री मलिक यांचा फडणवीसांवर पलटवार पवारांनी बाजार समित्यांचे अधिकार केंद्राकडे हस्तांतरीत केले नाहीत

मुंबईः प्रतिनिधी
शरद पवार (Sharad Pawar) यांनी खाजगी उद्योगांना(Privet Businessman)  शेती क्षेत्रात (Farming Sector) येण्यास कधीही प्रोत्साहन देत राज्यातील बाजार समित्यांचे (APMC) अधिकार केंद्राकडे हस्तांतरीत केले नाहीत. मात्र केंद्र सरकारने शेतीविषयक आणलेल्या तीन विधेयकांपैकी २ विधेयकात राज्यांना अधिकारच दिले नसल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी करत भाजपा (BJP) नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या आरोपातील हवा काढून घेतली.
वास्तविक पाहता शेती हा विषय केंद्र आणि राज्य सरकार यांच्या सामायिक सूचीत येतो. त्यामुळे त्याविषयीचा कायदा केल्यानंतर त्यात बदल किंवा सुधारणा करण्याचे अधिकार राज्य सरकारलाही आहेत. मात्र केंद्राने मंजूर केलेला कायद्यात तशा पध्दतीची सुधारणा करण्याचे अधिकारच देण्यात आले नाहीत. तसेच हा कायदा जबरदस्तीने राज्यांवर लादल्याचे सांगत मागील ७० वर्षापासून भाजपा हा पक्ष शेतकरी विरोधी असल्याचे सांगत होतो. मात्र आता त्यांनी शेतकरी विरोधी असल्याचे दाखवूनच दिल्याचा टोलाही त्यांनी लगावला.
८ डिसेंबर २०२० रोजी होणाऱ्या भारत बंदमध्ये सर्व जनतेने सहभागी व्हावे असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांची मागणी, विश्व हिंदू परिषदेने गरबा -दांडियामध्ये घातलेल्या मुस्लिम बंदी संदर्भात सरकारने भूमिका घ्यावी मुस्लिम द्वेष वाढवणे हा विश्व हिंदू परिषद आणि संघाचा अजेंडा

११ ऑक्टोबर पासून सुरू होणाऱ्या नवरात्रमध्ये गरबा- दांडिया खेळामध्ये मुस्लिम युवकांना बंदी घालण्यासंदर्भात विश्व हिंदू …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *