अखेर सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादीच्या विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी निवड विधानभवनात पक्षाच्या बैठकीत झाली निवड

अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे राज्याच्या विधिमंडळात आणि राजकारणातील त्यांच्या पक्ष नेतृत्वहीन बनला. त्यामुळे अजित पवार यांच्या जागेवर नियुक्त करण्यासाठी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी नियुक्ती करण्याचा निर्णय राष्ट्रवादीने घेतला.

त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाची आज दुपारी बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला पक्षाचे नेते प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे-पाटील यांच्यासह पक्षाचे ४१ आमदार उपस्थित होते.

या बैठकीत ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी विधिमंडळ पक्षाच्या प्रमुख पदी सुनेत्रा पवार यांच्या निवडीचा प्रस्ताव मांडला. तसेच पक्षाच्या गटनेत्या म्हणून सर्व अधिकार सुनेत्रा पवार यांना देण्यात आल्या. त्यास दिलीप वळसे-पाटील यांनी अनुमोदन दिले. तर धनंजय मुंडे यांनी त्यास अनुमोदन दिले. तत्पूर्वी अजित पवार यांच्या निधनाबद्दल प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी शोक प्रस्ताव मांडला. आला.

सुनेत्रा पवार यांची अशा पद्धतीने एकमताने विधिमंडळ पक्षाच्या गटनेते पदी निवड करण्यात आली.

त्यानंतर संध्याकाळी पाच वाजता सुनेत्रा पवार यांची उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याचे सांगितले. त्यानुसार राज्यपाल भवनवर शपथविधी होणार असल्याचे सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन प्रतोद अनिल पाटील यांना सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीबाबत इतकी घाई का असा सवाल केला. त्यावर अनिल पाटील म्हणाले की, या सर्व गोष्टी घाई जरी घाईच्या वाटत असल्या तरी ती काळाजी गरज आहे.मग ती मजबूरी का असेना. पण ही काळाजी गरज आहे.राष्ट्रवादीचा नेता निवडणं हे काम राष्ट्रवादीचे आमदारच करू शकतात. त्यामुळे पक्षाच्या सर्व आमदारांच्या भावना लक्षात घेतल्या असता हा निर्णय घेणं भाग पडत असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

विजय वडेट्टीवार यांची मागणी, राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था विधेयक, संयुक्त समितीकडे पाठवा विश्वस्त मंडळावर लोकप्रतिनिधी,राजकीय व्यक्ती नसाव्या, विश्वस्त मंडळावरील सदस्यांना भत्ते देऊ नये

विधानसभेत मांडण्यात आलेल्या ‘श्री राम मंदिर देवस्थान विश्वस्त व्यवस्था, रामटेक विधेयक’ यावर चर्चा करताना काँग्रेस …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *