सुप्रिया सुळे यांची टीका, रुग्णालयाने जी वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना, अतिशय दुर्दैवी

या जगात सर्वात उत्तम डॉक्टर भारतात आहेत. आपल्या सगळ्यांचा अनुभव आहे, एक डॉक्टर वाईट वागला म्हणून सर्वच डॉक्टर वाईट होत नाही. जगामध्ये भारताकडे अभिमानाने बघितलं जातं. देशातील एवढ्या मोठ्या घराण्याचं नाव ज्या रुग्णालयाला देण्यात आलं तिथे एवढी मोठी घटना घडते, हे अतिशय दुर्दैवी आहे असल्याची भावना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना व्यक्त केली.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे बोलताना म्हणाल्या की, मंगेशकर कुटुंबियांचे योगदान हे केवळ देशात नव्हे तर जगभरात आहे. त्यामुळे जी भावना लोकांची आहे त्याची चर्चा झाली पाहिजे. एखादे रुग्णालय इतक्या असंवेदनशीलपणे कसं काय वागू शकतं? रुग्णालय प्रशासनाने कितीही माफी मागितली तरी त्यांचा गुन्हा कमीच आहे. पीडित महिला ही कुणाची तरी आई आहे, कुणाची तरी बहीण, पत्नी मुलगी आहे. त्यामुळे समाजात आणि रुग्णालय प्रशासनात काही माणुसकी उरली आहे की नाही? असा संतप्त सवाल देखील यावेळी उपस्थित केला.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, ज्या पद्धतीने पिडित महिलेला रुग्णालयाने वागणूक दिली, त्याचा करावा तितका निषेध थोडा आहे. त्यामुळे रुग्णालयावर कारवाई व्हायला पाहिजे. हॉस्पिटल सेवा दिली पाहिजे, आम्ही लोक प्रतिनिधी हे तुम्हा नागरिकांचे सेवक आहोत. भारताल लोकं खूप विश्वासाच्या नात्याने येतात, आणि आपल्याकडे डॉक्टरांना देव मानतात. आपण सगळ्यांनी कोरोना काळात अनुभवलं आहे. त्यामुळे एका हॉस्पिटलमुळे किंवा एका डॉक्टरमुळे सर्वच वाईट नसतात, पण या प्रकरणात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच जबाबदार आहे आणि त्यांना ही जबाबदारी घ्यावी लागेल. माझ्या माहितीप्रमाणे, ही जागा शरद पवार मुख्यमंत्री असताना आणि श्रीनिवास पाटील हे कलेक्टर असताना ही जागा देण्याबाबत प्रोसेस झाली. आणि लतादीदींच्या पुढाकाराने हे हॉस्पिटल उभारण्यात आलं. हा त्याचा इतिहास असल्याचे सांगितले.

पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, नागरिक हॉस्पिटलमध्ये जात होते, त्याकाळातही अधूनमधून तक्रारी येत होत्या. शेवटी हॉस्पिटल असल्यामुळे सगळ्यांनी तेव्हा मदतीची भुमिका बजावली. पण दुर्दैव आहे की, एवढं मोठं नाव आहे त्या हॉस्पिटलला आणि त्याच्यात मंगेशकर कुटुंबाची काही चुक नाहीय, कारण ते त्या हॉस्पिटलच्या प्रशासनात नाहीय, फक्त ते ट्रस्टी आहेत. त्यामुळे आपण त्यांनाही विनंती करु की, दीनानाथ मंगेशकरांचं नाव दिलेल्या हॉस्पिटलमध्ये अशी घटना होतेय, हे अतिशय धक्कादायक आहे. मंगेशकर कुटुंबाचं या देशात एवढं मोठं योगदान आहे. मात्र दीनानाथ रुग्णालयाबाबत कुठलेही राजकारण न आणता या संबंधित प्रशासनावर कारवाई केली पाहिजे, अशी मागणीही यावेळी केली.

सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून रुग्णालय प्रशासनाला फोन जातो आणि रुग्णालयाकडून  त्यावर काहीही उत्तर मिळत नाही, हे धक्कादायक आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी विचार केला पाहिजे. मुख्यमंत्र्याच्या कार्यालयाची यंत्रणा आणि रुग्णालय प्रशासनने तर यावर हमखास बोललं पाहजे. राज्यात कायदा आणि माणुसकी उरली आहे की नाही? घडलेली घटना अतिशय दुर्दैवी असल्याचेही यावेळी सांगितले.

शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, सामान्य लोकांनी टॅक्स भरला नाही तर त्यांच्या घरापुढे तुम्ही बँड वाजवता. मात्र या संस्थेने इतक्या कोटींचा कर थकवला असताना महापालिका प्रशासन कोणतीच ठोस का भूमिका घेत नाही. सामान्य लोकांसाठी एक न्याय आणि अशा या संस्थेला दुसरा न्याय का? लावता असा सवाल करत पुणे महानगरपालिकेने मंगेशकर हॉस्पिटल संदर्भात प्रॉपर्टी टॅक्स बाबत ४८ तासात काही निर्णय केला नाही तर महानगरपालिकेमध्ये आंदोलन करणार असल्याचा इशाराही यावेळी दिला.

About Editor

Check Also

एकनाथ शिंदे यांच्या भावना, “नदी म्हणजे नारीशक्ती… गोदा ते नर्मदा जलयात्रेतून नवीन विकास मॉडेल!” “ इतिहास, अध्यात्म, विकास आणि नारीशक्तीचा हा महासंगम!”

नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ती ऊर्जा, शक्ती, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *