राज्यात महिला सुरक्षितता ही महत्वाची आहे, पण राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहे. राजकारण बाजूला ठेवून गंभीर केस मध्ये तपास योग्य झाला पाहिजे. स्वारगेट बस डेपोला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. स्वारगेटची घडलेली घटना ज्यापद्धतीने हाताळली गेली, तेही अतिशय असंवेदनशील आहे, महाराष्ट्रात महिला सुरक्षा धोक्यात आलेली आहे. प्रचंड गुन्हेगार राज्यात वाढली असून यात महिलांवरील अत्याचार मोठ्या प्रमाण वाढलेले आहेत. चाकण मध्ये पोलिस अधिकारी यांच्यावर कोयत्याने हल्ला झाला, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड हे गंभीर प्रकरण आहे. स्वारगेट केस योग्य प्रकारे हाताळली गेली नाही. सरकारने संवेदनशील राहणे आवश्यक आहे, अशावेळी पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे.असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
खासदार सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, महाराष्ट्रामध्ये प्रचंड गुन्हेगारी वाढली आहे. महिलांवरील अत्याचारांमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे. चाकणमध्ये एका पोलिस अधिकाऱ्यावर कोयत्याने हल्ला झाला, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड झाली, त्याआधी स्वारगेट बसस्थानकात एक तरुणीवर अत्याचार झाला. हे सगळी प्रकरणं गंभीर असून मी या सर्व घटनांचा निषेध करते. राज्यात महिलांची सुरक्षितता ही महत्त्वाची आहे, परंतु महिलांची सुरक्षितता धोक्यात आली आणि राज्य सरकार त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही यावेळी केला.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, स्वारगेटसारख्या अनेक घटना सातत्याने महाराष्ट्रात होत आहेत. या खूप दुर्देवी आहेत.ज्या पद्धतीने ही घटना घडली आहे, त्या घटनेला ज्या दिशेनं नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. ते खूप दुर्देवी आहे. ही घटना अंधारात, कोपऱ्यात झाली नाही. त्या मुलीला प्रंचड भीती दाखवली गेली. समाज म्हणून आपण सर्वांनी महिलांवरील कोणत्याही प्रकारच्या अत्याचाराचा जाहिर निषेध केला पाहिजे, असेही मतही यावेळी व्यक्त केले.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, बदलापूरची घटना घडली तेव्हाही मी फडणवीसांना विनंती केली होती की, महाराष्ट्राने देशासमोर एक उदाहरण द्यावं, बलात्कार आणि अत्याचार या सारखी प्रकरणे फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून या घटनांमधील आरोपींना भर चौकात फाशीची शिक्षा देण्यात यावी. आताही हीच मागणी करतेय, असेही त्या म्हणाल्या.
सुप्रिया सुळे पुढे बोलताना म्हणाल्या की, हे धक्कादायक आहे. मी याचा जाहीर निषेध करते. मी महाराष्ट्र सरकारला विचारते, तुम्ही तुमच्या लाडक्या बहिणींबद्दल एवढं बोलता, इतका कळवला दाखवता. मग स्वारगेट प्रकरणात सरकारकडून जे काही स्टेटमेंट आला ते योग्य आहे का? असा सवाल करत सरकारने संवेदशील राहणे आवश्यक आहे, पदावर असणाऱ्या व्यक्तीने जबाबदारीने बोलणे आवश्यक आहे. महिला बाबत आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य करणाऱ्यांनी माफी मागावी अन्यथा आम्ही संबंधितांच्या घराबाहेर आंदोलन करू, असा इशारा दिला.
यावर शेवटी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की,बीड हा कष्टकरी यांचा जिल्हा आहे पण गलिच्छ राजकारणामुळे देशात पुणे आणि बीड यांचे नाव बदनाम झाले आहे. अनेक गुन्हे करून ही वाल्मीक कराड आणि त्यांचे आका यांनी कोणती गोष्ट सरकारला दिली, ज्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत नाही? असा सवाल उपस्थित केला. ओएसडी आणि खासगी सचिव ठेवताना मुख्यमंत्री हे मंत्री यांना अधिकार न देता त्यावर हक्क गाजवत आहे. मंत्री हे लोकप्रतिनिधी आहेत, असेही सांगितले.
Marathi e-Batmya