शिक्षकांना दिलासा: कोविड कामातून मुक्त तर सरप्लस शिक्षकांना शाळेत बोलविणार शालेय शिक्षण विभागांचे शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील कोविड प्रसार रोखण्यासाठीच्या कामासाठी नियुक्त करण्यात आलेल्या शिक्षकांना स्थानिक प्रशासनाशी चर्चा करून त्या कामातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने शिक्षण अधिकाऱ्यांना आदेश देत सरप्लस अर्थात अतिरिक्त शिक्षकाना त्यांच्या जवळच्या किंवा मूळ शाळांमध्ये बोलावून ऑनलाईन शिक्षणासाठी त्यांचा उपयोग करण्याचे आदेश शालेय शिक्षण विभागाने आज राज्यातील सर्व शिक्षणाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिले. तसेच यासंदर्भात शासन निर्णय जारी करत त्यांना या कामातून मुक्त करण्यासाठी कायदेशीर अधिकार दिले.

सरप्लस असणाऱ्या व सद्यस्थितीत कोणत्याही आस्थापनेवर समायोजन न झालेल्या शिक्षकांना ते रहात असलेल्या ठिकाणाजवळील शाळेत बोलावून त्यांचा उपयोग ऑनलाईन शिक्षणासाठी करण्यात यावा असा निर्णय आज घेण्यात आला आहे. राज्यातील कोरोना संबंधित कामासाठी ज्या शिक्षकांच्या सेवा अधिग्रहित केलेल्या आहेत, त्या शिक्षकांना संबंधित कामातून कार्यमुक्त करण्याबाबतच्या प्रक्रियेबाबतचा निर्णय आज शासनाने निर्गमित केल्याचे त्यांनी सांगितले.

यानिर्णयानुसार राज्यातील अतिरिक्त बेकार बसलेल्या शिक्षकांच्या हाताला काम मिळणार असून कोरोनाच्या कामावर नियुक्त असलेल्या शिक्षकांची मुक्तता होणार असून त्यांना दिलासा मिळणार आहे.

About Editor

Check Also

उपमुख्यमत्री सुनेत्रा अजित पवार यांचे आदेश, पुणे, पिंपरी-चिंचवड विषारी दारू प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करा सखोल चौकशी करण्याचे प्रशासनाला आदेश

पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू झाल्याची घटना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *