उदयनराजे भोसलेंचा ८३ हजाराने लोकसभा पोटनिवडणूकीत पराभव माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील ४ लाख ८३ हजार मतांनी विजयी

मुंबईः प्रतिनिधी
सातारचे खासदार उदयनराजे भोसले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपात प्रवेश करत पोटनिवडणूक लढविली. मात्र त्यांच्या या पक्षप्रवेशाने नाराज झालेल्या सातारकरांनी उदयनराजेंना पराभव करत राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राष्ट्रवादीचे उमेदवार श्रीनिवास पाटील यांना विजयी केले.
या पोटनिवडणूकीत श्रीनिवास पाटील यांना ४ लाख ८२ हजार ९४७ मते मिळाली. तर भाजपाचे उदयनराजे भोसले यांना ४ लाख ७४४ मते मिळाली. उदयनराजेंना मिळालेल्या मतांपेक्षा जास्तीची ८२ हजार ९४७ मते श्रीनिवास पाटील यांना मिळाल्याने ते विजयी ठरले.

About Editor

Check Also

शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *