WWF Wrestler द ग्रेट खली आता राजकिय आखाड्यात लोकप्रिय खेळप्रकारातील डब्लूडब्लूएफ या मुष्टी कुस्तीतील पैलवान

मराठी ई-बातम्या टीम

सध्या उत्तराखंड, पंजाब, उत्तर प्रदेश, गोवा आणि मणिपूर राज्यातील विधानसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु असतानाच डब्लूडब्लूएफ या मुष्टी कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चितपट करत आस्मान दाखविणारा खेळाडू द ग्रेट खली यांने आज दिल्लीत भाजपात प्रवेश केला. त्यामुळे मुष्टी कुस्तीतून थेट राजकिय आखाड्यात त्यांने प्रवेश केल्याने त्याच्या प्रवेशामुळे भाजपाला आता चितपट करण्यात यशस्वी होते की नाही हे पहावे लागेल.

द ग्रेट खली यांचे खरे नाव दिलीप सिंग राणा असे असून तो मध्यंतरीच्या काळात पोलिस दलात कार्यरत असल्याची चर्चाही रंगली होती. वास्तविक पाहता त्या उंच शरीर यष्टी आणि धिप्पाड शरीरयष्टीमुळे डब्यू डब्लु या कुस्ती प्रकारात त्याच्याकडे सर्वांचेच लक्ष जात होते. परंतु कालांतराने तो भारतीय असल्याची माहिती पुढे आल्यानंतर त्याला सुरुवातीला अनेक चित्रपट निर्मात्यांनी चित्रपटाच्या ऑफर्स देवू केल्या. परंतु त्याने एखादं-दुसऱ्याच चित्रपटाच्या स्विकारल्या. त्यानंतर त्याला अनेक जाहीरातींच्या ऑफर्स मिळण्यास सुरुवात झाली.

गेल्या वर्षी जवळपास १४ महिने दिल्लीच्या सीमेवर सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनासही त्याने पाठिंबा जाहिर केला होता. त्यानंतर त्यांने आता ऐन निवडणूकीच्या तोंडावर भाजपात प्रवेश केला.

दरम्यान, खली यास या प्रवेशमागील कारण विचारले असता तो म्हणाला की, मी भाजपामध्ये प्रवेश केला याचा मला आनंद होतोय. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळे ते योग्य पंतप्रधान ठरतात. त्यामुळे मी विचार केला की आपण देशाच्या विकासातील त्यांच्या कामाचा हिस्सा का बनू नये? भाजपाच्या राष्ट्रीय धोरणांमुळे प्रभावित झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला.

WWE मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी खली पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यानंतर WWE मध्ये त्यानं जेतेपदाला देखील गवसणी घातली. खलीनं हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला. तसेच २०२१मध्ये खलीचा WWE हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला.

About Editor

Check Also

विलास तरे यांची मागणी, परकीय चलनवाढीसाठी शेतकऱ्यांनी निर्यातक्षम शेतमालाचे उत्पादन करावे भारताचा परकीय चलन साठ्यात वाढ करण्यासाठी केली मागणी

भारताच्या परकीय चलन साठ्यात वाढ होण्यासाठी देशातील शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीबरोबरच निर्यातक्षम शेतीमाल उत्पादनाकडे लक्ष केंद्रित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *