झीनत शबरीन यांची मागणी, नीट आंदोलनातील विद्यार्थ्यांविरोधातील एफआयआर मागे घ्या रिया यादव व मुस्कान कन्नौजियाला धमकी देण्याऱ्यांवर कारवाई करा

‘नीट’ (NEET) परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात मुंबईत झालेल्या आंदोलनादरम्यान पोलिसांची गाडी अडवणाऱ्या रिया अहिर या तरुणीला सोशल मीडियावर सतत धमक्या मिळत आहेत. पोलिसांकडे तक्रार करूनही धमक्या कमी झालेल्या नाहीत. सरकारविरोधात आवाज उठल्यामुळे रियाला प्रचंड त्रास दिला जात आहे. रियाला धमकी देणाऱ्यांना अटक करावी व आंदोलनात सहभागी झालेल्या तरुणांवरील गुन्हे गुन्हे रद्द करावेत अशी मागणी मुंबई युवक काँग्रेसने केली आहे.

मुंबई युवक काँग्रेसच्या अध्यक्ष झीनत शबरीन यांच्यासह राष्ट्रीय सरचिटणीस सुरभी द्विवेदी, ॲड. ऋषभ रंजन, हरगुन सिंग यांच्या शिष्टमंडळाने आज पोलीस सहआयुक्तांची भेट घेतली. या भेटीनंतर झीनत शबरीन म्हणतात की, “आज आम्ही पोलीस आयुक्त कार्यालयात जाऊन सह-पोलीस आयुक्त शर्मा यांची भेट घेतली. आम्ही त्यांच्यासमोर दोन मागण्या मांडल्या आणि त्या दोन्ही अत्यंत स्पष्ट आहेत.

झीनत शबरीन पुढे बोलताना म्हणाल्या की, आमची पहिली मागणी रिया अहिर हिच्याविरुद्ध दाखल करण्यात आलेल्या एफआयआरबाबत (FIR) आहे. मुंबईतील शिवाजी पार्क येथील आंदोलनादरम्यान ती युवाशक्तीचे प्रतीक बनली आहे. तिच्याविरुद्ध दाखल झालेला एफआयआर आणि विद्यार्थ्यांवरील इतर सर्व एफआयआर रद्द केले जावेत. रियाला धमक्या दिल्या जात आहेत त्याची पोलिसांनी दखळ घ्यावी. आम्ही या तरुण विद्यार्थ्यांवरील सर्व एफआयआर रद्द व्हावेत अशी मागणी केली आहे.”

पुढे बोलताना झीनत शबरीन म्हणाल्या की, रिया अहिर आणि मुस्कान कन्नौजिया यांसारख्या महिला ‘क्रिएटर्स’ना (content creators) बलात्काराच्या धमक्या देणाऱ्या, ऑनलाइन छळ करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांच्यावर खटला चालवावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. २७ वर्षीय रिया गेल्या सहा वर्षांपासून अभिनय आणि मॉडेलिंगच्या क्षेत्रात कार्यरत आहे.तिने २५ तारखेलाच सायबर गुन्हे विभागाकडे तक्रार नोंदवली होती, परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. सह-पोलीस आयुक्तांनी (Joint CP) आश्वासन दिले आहे की, धमक्या देणाऱ्यांची ओळख पटवून कारवाई करू, असे सांगितले.

About Editor

Check Also

आमदार रईस शेख यांचे बीएमसी आयुक्तांना पत्र, महापालिका शाळातील विद्यार्थ्यांची केशव सृष्टी येथे सहल नको केशवसृष्टीमध्ये विद्यार्थ्यांची सहल म्हणजे शिक्षणाचे भगवीकरण

बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळातील विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित केशव सृष्टी (उत्तन- भाईंदर ) येथील प्रस्तावित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *