डॉ.आंबेडकर जयंतीसाठी जमा केलेला निधी हातावर पोट असणाऱ्यांना द्या वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड. प्रकाश आंबेडकरांचे आवाहन

मुंबई: प्रतिनिधी

दलित, वंचित बहुजनांच्या अस्तित्वाचा लढा उभारणाऱ्या महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १४ एप्रिल रोजी जयंती आहे. तसेच हा जयंती उत्सव किमान दिड महिना तरी चालतो. त्यामुळे या जयंतीच्या निमित्ताने जमा केलेला निधी जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या सफाई कामगार, आरोग्य सेवक तसेच हातावर पोटावर असणाऱ्या कामगारांना द्या असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अँड.प्रकाश आंबेडकर यांनी फुले-शाहू-आंबेडकरी अनुयायांना केले.

या सर्व लोकांच्या घरातील चूल वीझणार नाही याची काळजी आपल्याला घ्यावी लागणार असून त्यांचे संरक्षण करणे ही आपली जबाबदारी आहे. जयंतीसाठी जमा केलेल्या निधीतून या गरजू नागरीकांना अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तू देण्यात याव्यात असे आवाहन करावे असे आवाहनही त्यांनी केले.

यंदाची जयंती आपण घरातूनच साजरी करावी. घरातील जयंतीचे फोटोज, व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून इतरांनीही ती घरातून साजरी करावी यासाठी आवाहन करावे अशी सूचनाही त्यांनी समाजाला केली.

About Editor

Check Also

१५ मार्च – जागतिक ग्राहक दिन ; ग्राहकांना अधिकार देणारा दिवस अमेरिकेचे अध्यक्ष जॉन एफ केनेडी यांनी ग्राहकांच्या अधिकाऱाचा पहिल्यांदा प्रश्न मांडला

आधुनिक अर्थव्यवस्थेत ग्राहक हा केंद्रबिंदू मानला जातो. बाजारपेठेत वस्तू आणि सेवा तयार करणारे उत्पादक, व्यापारी, …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *