अभिजीत दीपके यांची घोषणा, ‘क्या बोलती पब्लिक’ देशव्यापी मोहिम सुरु करणार सप्टेंबर महिन्यापासून अभियानाला सुरुवात

कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजित दीपके यांनी गुरुवारी ‘क्या बोलती पब्लिक’ या देशव्यापी जनसंपर्क मोहिमेची घोषणा केली. अभिजित दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टीकडून सप्टेंबरपासून देशभरात प्रवास करून नागरिकांशी संवाद साधेल आणि बेरोजगारी, शिक्षण सुधारणा आणि सामाजिक न्याय यांसारख्या मुद्द्यांना आपल्या राजकीय अजेंड्याच्या केंद्रस्थानी ठेवेल.

दोन दिवसांच्या पक्षीय विचारमंथनानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, पक्ष राजकीय पक्षात रूपांतरित होण्याऐवजी दबाव गट म्हणून काम करत राहील. गेल्या महिन्यात नवी दिल्लीतील जंतर मंतर येथे झालेल्या सीजेपीच्या नेतृत्वाखालील ‘जनरेशन झेड’ आंदोलनाचा चेहरा म्हणून दीपके पुढे आले होते, ज्या आंदोलनामुळे तत्कालीन शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला होता.

ही घोषणा करताना अभिजीत दीपके म्हणाले की, या मोहिमेद्वारे लोकांच्या, विशेषतः तरुणांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा प्रयत्न केला जाईल.

अभिजीत दीपके म्हणाले की, दोन दिवसांच्या चर्चेनंतर आम्ही ठरवले आहे की, कॉकरोच जनता पार्टी सप्टेंबरमध्ये देशव्यापी मोहीम सुरू करेल. या मोहिमेचे नाव ‘क्या बोलती पब्लिक’ असेल,”. या मोहिमेद्वारे देशभरातील लोकांच्या आकांक्षा, अपेक्षा आणि चिंता समजून घेण्याचा आमचा उद्देश असल्याचे सांगितले.

भारताच्या तरुण लोकसंख्येकडे दुर्लक्ष झाले असल्याचा दावा करत अभिजीत दीपके म्हणाले की, देशाची जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, परंतु त्यांच्या समस्यांना मुख्य प्रवाहातील राजकीय चर्चेत स्थान मिळालेले नाही. भारताची जवळपास ६५ टक्के लोकसंख्या ३५ वर्षांखालील आहे, तरीही या सरकारला त्यांच्या समस्यांची पर्वा असल्याचे दिसत नाही. या मुद्द्यांवर कोणीही बोलायला तयार नाही. आम्ही लोकांपर्यंत पोहोचू, त्यांच्या अपेक्षा समजून घेऊ आणि त्यांना भेडसावणाऱ्या समस्या ऐकून घेऊ,असे ही यावेळी बोलताना स्पष्ट केले.

पुढे बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, शिक्षण अधिक परवडणारे आणि सर्वांसाठी सुलभ करण्याच्या उद्देशाने सीजेपी पक्ष शैक्षणिक सुधारणांसाठी प्रयत्न करेल. शिक्षणाचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे, त्यामुळे विद्यार्थ्यांना वाढीव शिक्षण शुल्काचा सामना करावा लागत आहे आणि कुटुंबांना मोठा शैक्षणिक खर्च सोसावा लागत आहेत. चांगल्या रोजगाराच्या संधींच्या अभावामुळे अनेक तरुण निराश झाले आहेत, असा युक्तिवाद करत त्यांनी बेरोजगारीला एक प्रमुख राष्ट्रीय मुद्दा बनवण्याचा प्रयत्न केला.

अभिजीत दीपके म्हणाले की, आपल्या देशात नोकऱ्या जवळजवळ नाहीतच. जंतर मंतर येथे जमलेले बरेच लोक बेरोजगार होते. नाइलाजाने स्विगी डिलिव्हरी एक्झिक्युटिव्ह किंवा डिलिव्हरी बॉय बनणे हे कोणाचेही स्वप्न किंवा आकांक्षा नसते. पदवी मिळवूनही मोठ्या संख्येने सुशिक्षित तरुण बेरोजगार राहतात, असा दावा करत अभिजीत दीपके म्हणाले, देशातील जवळपास ८० टक्के तरुण पदवी मिळवूनही बेरोजगार राहतात, ज्यांनी आपले शिक्षण कधीच पूर्ण केले नाही किंवा ज्यांच्याकडे पदवी नाही, तेच सरकार चालवत आहेत आणि “सुशिक्षित तरुणांचे भविष्य ठरवत आहेत असा उपरोधिक टीका केली.

अभिजीत दीपके म्हणाले की, मला आता बेरोजगारीला एक राष्ट्रीय मुद्दा बनवायचा आहे. सरकार म्हणून तुम्ही बेरोजगारीच्या संकटाकडे दुर्लक्ष करणे सुरू ठेवू शकत नाही,असेही यावेळी सांगितले.

पक्षाच्या वैचारिक भूमिकेचा पुनरुच्चार करताना अभिजीत दीपके म्हणाले की, कॉकरोच जनता पार्टी डॉ. बी. आर. आंबेडकर, महात्मा गांधी आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या आदर्शांनुसार वाटचाल करेल. आमची विचारधारा भारतीय संविधानाच्या मूल्यांमध्ये रुजलेली असेल. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. आम्ही लोकशाहीवादी आहोत आणि आम्ही सामाजिक न्यायासाठी काम करत राहू, असेही यावेळी स्पष्ट केले.

अभिजीत दीपके पुढे म्हणाले की, पक्ष महात्मा गांधींचा शांतता आणि अहिंसेचा संदेश, आंबेडकरांची सामाजिक न्यायाची दूरदृष्टी आणि जवाहरलाल नेहरूंचे आधुनिक भारताचे स्वप्न” यांपासून प्रेरणा घेईल. राजकीय बदलासाठी विद्यार्थ्यांना श्रेय दिले आणि असा आरोप केला की, अलीकडील घडामोडींपूर्वी देशाने अनेक वर्षे दमन आणि हुकूमशाही अनुभवली होती.

शेवटी बोलताना अभिजीत दीपके म्हणाले की, विद्यार्थ्यांनीच या सरकारला राजीनामा देण्यास भाग पाडले. गेल्या १४ वर्षांत देशाने दमन आणि हुकूमशाही अनुभवली. ती भीती आता संपली आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, लोकांना आता भीती वाटत नाही, असेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

डॉ मोहन भागवत यांची स्पष्टोक्ती, आंदोलन हा लोकशाहीचा अविभाज्य भाग जनरेशन झेडवर डोळे झाकून विश्वास

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) प्रमुख डॉ मोहन भागवत यांनी गुरुवारी भारताच्या तरुण पिढीवर विश्वास व्यक्त …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *