अमित शाह यांची माहिती, २०२९ पर्यंत भाजपाशासित २१ राज्यांमध्ये समान नागरीक कायदा असेल मुंबईतील एका कार्यक्रमात बोलताना दिली माहिती

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी सांगितले की, ‘समान नागरी कायदा’ (UCC) – ज्याद्वारे धर्मनिरपेक्षपणे विवाह, घटस्फोट, वारसाहक्क आणि दत्तकविधान यांसारख्या बाबींसाठी एकसमान वैयक्तिक कायदे लागू करण्याचा उद्देश आहे – तो २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची (NDA) सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये लागू केला जाईल.

अमित शाह पुढे बोलताना म्हणाले की, आम्ही अनेक राज्यांमध्ये समान नागरी कायदा (UCC) आणला आहे. मला विश्वास आहे की, २०२९ पूर्वी भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएची सत्ता असलेल्या सर्व २१ राज्यांमध्ये आम्ही समान नागरी कायदा अर्थात uniform civil code- UCC लागू करू, असे जाहिर केले.

पुढे बोलताना अमित शाह म्हणाले की, सरकारच्या सुरक्षा धोरणावरही प्रकाश टाकला. सर्जिकल स्ट्राइक, एअर स्ट्राइक आणि ‘ऑपरेशन सिंदूर’ यांसारख्या कृतींमुळे दहशतवादाबाबत ‘झिरो टॉलरन्स’ (मुळीच खपवून न घेण्याचे) धोरण प्रस्थापित झाले आहे, तसेच सर्व क्षेत्रांमध्ये सुरक्षेला प्राधान्य दिले गेले आहे, असे नमूद केले.

शेवटी बोलताना अमित शाह म्हणाले की, सरकारने कलम ३७०, नक्षलवाद आणि ईशान्येकडील परिस्थिती यांसारख्या अनेक दशकांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यांवरही उपाययोजना केल्या आहेत; हे मुद्दे अनेक दशकांपासून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी आव्हाने ठरले होती असेही यावेळी स्पष्ट केले.

About Editor

Check Also

झारखंडमध्ये अदानी पॉवर प्रकल्पात तांत्रिक बिघा़ड, बांग्लादेशात वीजेचे संकट अदानी प्रकल्प पूर्ववत होण्यास काही दिवस लागू शकतात

झारखंडमधील अदानी पॉवरच्या औष्णिक वीज प्रकल्पात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे बांग्लादेशातील वीज संकट अधिकच गडद झाले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *