याच ट्विटमुळे भाजपाशासित राज्यात अभिनेत्री कंगना विरोधात गुन्हा दाखल होणार कर्नाटकातील न्यायालयाचे पोलिसांना आदेश

बंगलोर : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी संसदेत केंद्र सरकारने मंजूर केलेल्या कृषी कायद्यानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर विरोध दर्शविण्यास सुरुवात केली. त्या विरोधावर टीका करताना बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणावत हीने शेतकऱ्यांना लक्ष्य करत ट्विट्द्वारे आंतकवादी असल्याची टीका केली. त्यावर तुमकुरू जिल्हा न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असता त्यावरील सुणावनी दरम्यान न्यायालयाने कंगना हिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश स्थानिक पोलिसांना दिले. महाराष्ट्र राज्य आणि बॉलीवूड विरोधात भूमिका घेणाऱ्या कंगनाला भाजपाने पाठबळ देत तीला वाय सुरक्षा पुरविली. त्याच भाजपाच्या राज्यात तिच्या विरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

राणावत हिने केलेल्या ट्विटच्या अनुषंगाने स्थानिक वकील रमेश नाईक यांनी प्रथम मॅजिस्ट्रेटकडे यासंदर्भात याचिका दाखल केली. त्यावर सदर न्यायालयाने कंगना राणावत हिच्या विरोधात एफआयआर दाखल करून सखोल चौकशी करण्याचे आदेश दिल्याचे नाईक यांनी सांगितले.

About Editor

Check Also

कॉकरोच जनता पार्टीकडून विभागवार नेत्यांची-पदाधिकाऱ्यांची देशभरात नियुक्ती देशभरात संघटनात्मक बांधणी करण्याचे लक्ष्य पण राजकारणात उरण्याचे कोणतीही उद्दीष्ट नाहीदेशभरात संघटनात्मक बांधणी करण्याचे लक्ष्य पण राजकारणात उरण्याचे कोणतीही उद्दीष्ट नाही

‘कॉकरोच जनता पार्टी’- सीजेपी CJP ही संघटना, जी सुरुवातीला केवळ निषेध दर्शवण्याचे एक व्यासपीठ म्हणून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *