कॉकरोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांची पहिली प्रतिक्रिया, “सुबह हो गयी मामू” राजीनाम्याच्या वृत्तानंतर अभिजीत दीपके म्हणाले की, येस वी हॅव डन इट

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर काही क्षणांतच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करण्यासाठी कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) संस्थापक अभिजीत दीपके यांनी शनिवारी ‘मुन्ना भाई एम.बी.बी.एस.’ मधील प्रसिद्ध डॉयलॉग वापरत, “सुबह हो गई मामू.” अशी पहिली प्रतिक्रिया दिल्लीच्या जंतर मंतर येथील मंचावरून दिली. त्यांच्या या वक्तव्याचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले आणि जल्लोष सुरू झाला. अभिजीत दीपके यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याला “लोकशाहीचा विजय” म्हटले.

आंदोलनस्थळी जमलेल्या शेकडो समर्थकांना संबोधित करताना, अत्यंत आनंदित झालेल्या अभिजीत दीपके यांनी सांगितले की, नीट पेपरफुटी प्रकरणावरून विद्यार्थ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आंदोलनांमुळे धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा साध्य झाला. या घडामोडीने शांततापूर्ण लोकशाही एकत्रीकरण आणि जनदबावाची ताकद अधोरेखित केली असल्याचे सांगितले.

अभिजीत दीपके पुढे म्हणाले की, ही लोकशाही आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे… लक्षात ठेवा, झुरळांशी पंगा घेऊ नका, त्यानंतर आनंद आणि भावनेच्या भरात ते गुडघ्यावर बसले. यावेळी उपस्थितांनी एकमेकांना मिठी मारली आणि ‘चक दे! इंडिया’ या देशभक्तीपर गीतावर नृत्य केले.

अभिजीत दीपके म्हणाले की, हा राजीनामा याचा पुरावा आहे की, जर तुम्ही लोक घाबरत नसाल, जर तुम्ही या सरकारपुढे झुकत नसाल, तर आम्ही कोणाचाही राजीनामा स्वीकारू शकतो, असेही सांगितले.

पंतप्रधान मोदींवर टीका करताना अभिजीत दीपके म्हणाले, धर्मेद्र प्रधान यांच्या राजीनाम्यामुळे मला हिरो कोणी करू नका आणि समजूही नका. ह्या हिरोपणामुळे देशाचा कबाडखाना झाला आहे. एका व्यक्तीला देशाच्या राज्यघटनेपेक्षा मोठे केले म्हणूनच त्या माणसाचे देशाचा कबाडखाना बनवू शकला. काय म्हणत होते, या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत. पण धर्मेद्र प्रधान यांचा अखेर राजीनामा झाला. नरेंद्र मोदीजी, लोकशाहीचा उदय झाला आहे, मामू. ही तर फक्त सुरुवात आहे, पहिली विकेट आहे. लढाई अजून संपलेली नाही असा इशाराही यावेळी दिला.

अभिजीत दीपके पुढे म्हणाले, लोक म्हणायचे की हे सरकार कधीही राजीनामे होत नाहीत. पण आज आम्ही दाखवून दिले आहे की पुरेसा दृढनिश्चय असेल तर अशक्य गोष्टही शक्य करता येते.

अभिजीत दीपके पुढे म्हणाले, “‘या सरकारमध्ये राजीनामे होत नाहीत असं म्हटलं जायचं. झुकती है दुनिया झुकानेवाला जाहिए., आम्ही ते करून दाखवलं आहे, असे सांगून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमधील हा पहिला राजीनामा असल्याचे नमूद केले.
कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) नेतृत्वाखालील आंदोलक एकमेकांना मिठी मारताना आणि ‘चक दे! इंडिया’ या देशभक्तीपर गीतावर मंचावर नाचताना दिसले.

कॉकरोच जनता पार्टीच्या नेत्याने आंदोलकांना ठाम राहण्याचे आवाहन केले आणि मंत्र्यांचा राजीनामा हा आंदोलनाच्या उद्दिष्टांपैकी केवळ एक असल्याचे सांगितले. अभिजीत दीपके यांच्या मते, जोपर्यंत सरकारकडून आणखी दोन मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहील.

अभिजीत दिपके पुढे म्हणाले की, घाबरण्याची गरज नाही. ही लोकशाही आहे. त्यांनी राजीनामा दिला आहे, पण आमच्या आणखी दोन मागण्या आहेत. आम्ही असेच जाणार नाही. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे. पण ज्या मुलांनी आत्महत्या केली त्यांच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. त्यांना ती मिळालीच पाहिजे. त्या सर्व कुटुंबांना एक कोटी रुपयांची नुकसान भरपाई. आणि दुसरे म्हणजे, २० तारखेला कारवाई करणारे हे पोलीस गुंड. त्यासाठी त्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई झालीच पाहिजे, या मागणीचा पुर्नरुच्चारही यावेळी केला.

ही बातमी समोर आली तेव्हा सीजेपीचे प्रवक्ते आशुतोष रांका आणि सौरभ दास हे देखील जंतर मंतर येथील आंदोलनस्थळी उपस्थित होते. यावर प्रतिक्रिया देताना, आषुतोष रांका यांनी शिक्षण क्षेत्रात सुधारणा करण्याच्या पक्षाच्या व्यापक उद्दिष्टाचा पुनरुच्चार केला आणि हे आंदोलन संपूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्था सुधारण्याच्या उद्देशाने असल्याचे सांगितले.

दरम्यान, सौरव दास यांनी विद्यार्थी आणि तरुणांच्या चिंतांकडे दुर्लक्ष न करण्याचा इशारा देत एक आव्हानपूर्ण भूमिका घेतली. “तरुण पिढीशी खेळू नका,” असे म्हणाले.

सीजेपी नेतृत्वाने असेही सांगितले की, पक्षाने सरकारसमोर तीन प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत आणि लेखी आश्वासन मिळाल्यानंतरच आंदोलन मागे घेतले जाईल. आशुतोष रांका म्हणाले की, सायंकाळी ६ वाजता शांततापूर्ण देशव्यापी कँडल मार्चसाठी परवानगी मागण्यात आली आहे.
जर तुम्ही आमच्या तीन मागण्या लेखी स्वरूपात मान्य केल्या, आम्ही घरी जाऊ. आम्ही देशभरात शांततापूर्ण कँडल मार्च काढण्याची परवानगी मागितली आहे, असे आशुतोष रांका म्हणाले. पक्षाचे उद्दिष्ट संपूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे असल्याचेही सांगितले.

सौरव दास म्हणाले की, सरकारने पक्षाला दुपारी ३.३० वाजता चर्चेच्या दुसऱ्या फेरीसाठी आमंत्रित केले आहे, परंतु जोपर्यंत सर्व मागण्या लेखी स्वरूपात मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलक आंदोलनस्थळ सोडणार नाहीत, यावर त्यांनी ठाम भूमिका घेतली. “जोपर्यंत आमच्या सर्व मागण्या पूर्ण होत नाहीत आणि त्या लेखी स्वरूपात दिल्या जात नाहीत, तोपर्यंत आम्ही कुठेही जाणार नाही. हा एक मोठा विजय आहे, असेही सांगितले.

आपल्या भाषणादरम्यान एका भावनिक क्षणी, अभिजीत दीपके यांनी नीट पेपरफुटी प्रकरणानंतर आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांच्या नावांचे स्मरण केले आणि उपस्थितांना त्यांच्या स्मरणार्थ दोन मिनिटे मौन पाळण्याचे आवाहन केले.

केंद्र सरकार आणि सीजेपी यांच्यात वाटाघाटींची तिसरी फेरी होणार होती, त्याच्या काही तास आधीच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा आला. शिक्षणमंत्र्यांना पदावरून हटवणे ही “न बदलता येणारी” अट असून, सुरू असलेल्या आंदोलनातील प्रमुख मागण्यांपैकी एक असल्याचे आंदोलन नेत्यांनी वारंवार सांगितले होते.

About Editor

Check Also

सौदी अरेबियाचे राजकुमार अब्दुल्ला यांचा लंडनच्या आलिशान हॉटेलमध्ये मृत्यू दारू, ड्रग्जच्या अतिसेवनानंतर डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधाच्या सेवनामुळे मृत्यू झाल्याची माहिती

लंडनच्या एका आलिशान हॉटेलमध्ये दारू, पार्टी ड्रग्स आणि डॉक्टरांनी लिहून दिलेल्या औषधांच्या घातक मिश्रणाचे सेवन …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *