सोनियां गांधीच्या नेतृत्वावरून प्रदेश काँग्रेसमध्ये दोन गट बाळासाहेब थोरातांचे राहुल गांधींना साकडे तर गायकवाड आणि देशमुख यांचे सोनियां गांधीना

मुंबई: विशेष प्रतिनिधी

देशात भाजपाच्या वाढत्या प्रभावाला रोखण्यासाठी काँग्रेसकडून म्हणावे तितके प्रयत्न होत नाहीत. त्यातच पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या प्रकृती अस्वस्थामुळे त्यांच्यावर मर्यादा येत असल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी नुकतीच पक्षातील नेत्यांनी एका पत्राद्वारे केली. मात्र राज्यातील प्रदेश काँग्रेसमध्ये सोनिया गांधीनी कि राहुल गांधी यांनी नेतृत्व करावे याप्रश्नांवरून दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या नेतृत्वाची धुरा राहुल गांधी यांनी हाती घ्यावी याकरिता ट्विटरच्या माध्यमातून राहुल यांना आवाहन केले. तसेच त्यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस पक्ष पुन्हा उभारी घेईल अशी आशा व्यक्त केली.

तर राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी सोनिया गांधी यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत त्यांनीच पक्षाची धुरा सांभाळावी असे आवाहन करत त्यांनी आतापर्यत पक्षासाठी मोठा त्याग केला आहे. तसेच प्रसंगी रक्तही सांडले आहे. त्यामुळे पक्षाच्या नेतृत्व त्यांनीच करावे असे आवाहन केले.

वर्षा गायकवाड यांच्याबरोबरच वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनीही काँग्रेसचे नेतृत्व सोनिया गांधीनीच करावे अशी मागणी करत त्यांच्या नेतृत्वावर पूर्ण विश्वास व्यक्त केला आहे. त्यामुळे काँग्रेसचे नेतृत्वावरून सोनिया गांधी कि राहुल गांधी यांवरून तट पडल्याचे दिसून येत आहे.

 

 

About Editor

Check Also

माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या भाचीची गळफास घेऊन आत्महत्या नैराश्याने ग्रस्त असल्याने केली आत्महत्या

पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भाची मंगळवारी बीरभूम जिल्ह्यातील तिच्या घरी गळफास घेतलेल्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *