विशेष बातमी

मदन शर्मा हे नौदलातील कि मालवाहतूक जहाजावर काम करणारे ? सोशल मिडियावरील माहितीने खळबळ

मुंबई: विशेष प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याविषयी अवमानकारक कार्टून व्हॉट्सअॅपवरून पाठविल्यामुळे शिवसैनिकांनी मारहाण प्रकरण केलेले मदन शर्मा हे संरक्षण विभागाच्या नेव्ही अर्थात नौदलातील अधिकारी नव्हे मर्चंट नेव्ही अर्थात मालवाहतूक जहाजावरील अधिकारी असल्याची माहिती सोशल मिडियातून फिरत आहे. तर दुसऱ्याबाजूला त्याचे मिळालेल्या ओळखपत्रावरून ते सैन्य दलात असल्याची माहिती पुढे येत …

Read More »

कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती

मुंबई: विशेष प्रतिनिधी पुणे जिल्ह्यातील कोरेगांव भीमा येथे झालेल्या दंगलीची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कोरेगांव भीमा चौकशी आयोगाला तीन महिन्याची मुदतवाढ देण्यात आहे. ज्या दिवशी आयोग आपले कामकाज सुरु करेल त्या दिवसापासून पुढे तीन महिने मुदतवाढ देण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मराठी ई-बातम्या.कॉमशी बोलताना दिली. …

Read More »

मंत्रालयात ई-फाईल, ई-लीव्ह, एमआयएस प्रणाली सुरू होणार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे ई-ऑफिस सुरु करण्यासंदर्भात आदेश

मुंबई : प्रतिनिधी प्रशासकीय व्यवस्था गतिमान करतानाच जनतेलाही चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी ई-ऑफिस प्रणाली आणखी सक्षम करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले. त्यानुसार मंत्रालयातील नस्ती व्यवस्थापन ई-फाईल, रजा व्यवस्थापन ई-लीव्ह, ज्ञान व्यवस्थापन केएमएस, माहिती व्यवस्थापन एमआयएस या प्रणाली कार्यान्वित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील ई-ऑफिस प्रणालीबाबत सादरीकरण तसेच आढावा बैठक मुख्यमंत्री …

Read More »

मुख्यमंत्र्याचे मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याची निनावी धमकी राज्य मंत्रिमंडळ बैठकीत व्यक्त केली चिंता

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मुंबईतील मातोश्री निवासस्थान बॉम्बने उडवून देण्याच्या निनावी धमकीबद्धल आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत चिंता व्यक्त करण्यात आली तसेच या कृतीचा तीव्र निषेधही करण्यात आला. सदरहू प्रकरण खूप गंभीर असून केंद्र सरकारने देखील याची तातडीने दखल घ्यावी व यामागे जे कुणी असतील त्यांना शोधून कठोर शासन …

Read More »

कोरोनाने घालवली सत्ताधारी आणि विरोधकांची एक संधी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला असलेल्या संकेत आणि प्रथा पहिल्यांदाच मोडित

मुंबई: विशेष प्रतिनिधी देशात सांसदीय कार्यप्रणालीनुसार कामकाज चालत असल्याने पावसाळी, हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काही गोष्टींचे आयोजन राज्य सरकारकडून करण्यात येते. त्या गोष्टींना हजेरी लावायचे कि नाही याचा निर्णय राजकिय विरोधकांनी घेण्याचे स्वातंत्र्यही आहे. मात्र यावेळी पहिल्यांदाच कोरोनामुळे अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला ना कोणती राजकिय गरमागरमी ना कोणत्या प्रथा आणि संकेताचे पालन अशी …

Read More »

जिप शाळेचा शिक्षक २०० देशातील विद्यार्थ्यांबरोबर करतोय शैक्षणिक देवाण घेवाण अहमदनगर आणि मुंबईतील दोन शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

नवी दिल्ली : प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील गोपाळवाडी जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक नारायण मंगलाराम आणि मुंबई येथील भाभा अणुशक्तीकेंद्र शाळेच्या शिक्षिका संगीता सोहनी यांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी आज राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते दूरदृष्य प्रणालीच्या माध्यमातून राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रीय शिक्षक दिनानिमित्त कोवीड19 च्या पार्श्वभूमीवर दूरदृष्य प्रणालीद्वारे ‘राष्ट्रीय …

Read More »

खुषखबर : उद्यापासून महाराष्ट्रातील रेल्वे बुकिंग आणि प्रवास सुरु राज्य सरकारच्या missionbeginagain च्या मार्गदर्शक तत्वानंतर रेल्वेची माहिती

मुंबई: प्रतिनिधी नुकतेच राज्य सरकारने राज्यातल्या राज्यात प्रवास करण्यासाठी असलेली ई-पासची अट काढून टाकल्यानंतर महाराष्ट्रात प्रवास करण्यासाठी रेल्वेनेही परवानगी देत उद्यापासून बुकिंग करता येणार आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी रेल्वे प्रवासास परवानगी दिली नव्हती. त्यामुळे अनेकजणांना कामानिमित्त बाहेरगावी आणि इतर ठिकाणी जाता येत नव्हते. मात्र रेल्वेच्या निर्णयामुळे आता राज्यातल्या …

Read More »

केंद्राकडून अनलॉक-४ मध्ये सवलतींचा वर्षाव मात्र missionbeginagain वर शांतता ? निर्णयाची अंमलबजावणी करणार की संघर्ष

मुंबई: विशेष प्रतिनिधी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जाहीर केलेल्या लॉकडाऊनमधून केंद्र सरकारकडून आता सवलती देण्यात येत असून अनलॉक-४ अंतर्गत सिनेमा थिएटर, सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमासाठी १०० नागरिकांच्या उपस्थितीसह मेट्रो प्रवासास परवानगी देण्याचा निर्णय घेत त्याविषयीची मार्गदर्शक तत्वे जाहीर केली. तसेच राज्य सरकारांनी स्वतंत्र लॉकडाऊन जाहीर करण्यास अटकाव केला. यासंदर्भात राज्य सरकारकडून अधिकृत …

Read More »

घर खरेदी, जमिन व्यवहार आता ऑफिशियली स्वस्त: २०२१ पर्यत सवलत मुद्रांक शुल्क सवलतीचा शासन निर्णयाचे गॅजेट झाले प्रसिध्द

मुंबई: प्रतिनिधी राज्यात कोरोनामुळे सर्वच व्यवहार ठप्प झालेले असल्याने आर्थिक उलाढाल मंदावली आहे. यापार्श्वभूमीवर आर्थिक व्यवहारांना चालना देण्यासाठी राज्य सरकारने घर खरेदी, जमिन खरेदी-विक्री व्यवहारावर लागणाऱ्या मुद्रांक शुल्कावर सवलत देण्याचा निर्णय नुकताच घेतला. त्यानुसार आज त्यासंदर्भातील गॅजेट सरकारकडून प्रसिध्द करण्यात आले. राज्य सरकारच्या निर्णयानुसार १ सप्टेंबर २०२० पासून घर खरेदी-जमिन …

Read More »

राज्यातील या ८ जणासह दोन संस्थांना राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी क्रीडा क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरीसाठी राष्ट्रीय क्रीडा पुरस्कार प्राप्त खेळाडुंचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांना जयंती निमित्त अभिवादन करतानाच, राज्यातील क्रीडा जगताला राष्ट्रीय क्रीडा दिनाच्याही शुभेच्छा दिल्या आहेत. केंद्रीय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्यावतीने जाहीर करण्यात आलेल्या या पुरस्कारांचे आज भारताचे राष्ट्रपती …

Read More »