राज्य सरकारकडून कर्मचाऱ्यांच्या घरभाडे, सिटी अलाऊन्सवर डल्ला मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय सेवेतील कर्मचाऱ्यांकडून आपल्या विविध मागण्यासाठी सामूहीक रजा आंदोलनाची घोषणा केली. कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाची धार बोथट करण्याच्या उद्देशाने राज्य सरकारकडून १ जानेवारी २०१६ पासून सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली. परंतु एकाबाजूला सातवा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा करतानाच …
Read More »५ जानेवारीला शासकिय कार्यालये सुरू असून बंद राहणार ?
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेत काम करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी पाच दिवसांचा आठवडा पूर्ण करावा या प्रमुख मागणीसाठी प्रथम व द्वितीय श्रेणीतील अधिकारी सामूहीक रजेवर जाण्याचा इशारा दिलेला आहे. त्यातच या अधिकाऱ्यांच्या सामूहीक रजेच्या आंदोलनात तृतीय आणि चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी सहभागी होण्याची तयारी इतर संघटनांनीही केल्याने ५ जानेवारी २०१९ रोजी सर्व …
Read More »जवानांच्या नावे राजकारण करणाऱ्या भाजप सरकारला सैनिकांचाच विसर वाटपासाठी महसूल मंत्री पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीसांना जमिनच मिळेना
मुंबई : गिरिराज सावंत केंद्र आणि राज्यातील सत्ता मिळविण्यासाठी अतिरेक्यांच्या हल्ल्यात लष्करातील हुतात्मा सैनिकांच्या बलिदानाचा वापर भाजपने केला. परंतु सत्तास्थानी विराजमान झाल्यापासून भाजपच्याच महाराष्ट्रातील भाजप सरकारला या लष्करी सैनिकांचाच विसर पडला असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली असून विविध युध्दात आपल्या कर्तबगारीने देशाच्या विजयात मानाचा तुरा खोवणाऱ्या सैनिकांना उपजिविका आणि निवाऱा …
Read More »मंत्र्यांनी सांगूनही सामाजिक न्याय विभागांतील अधिकाऱ्यांचा आचरटपणा बैठकीत चुकीच्या माहितींचा अधिकाऱ्यांकडून पाऊस
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दलित, दिव्यांग, ज्येष्ठ नागरीक आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी राज्य सरकारच्या सामाजिक न्याय विभागाकडून विविध योजना राबविल्या जातात. या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी विभागातील सर्व अधिकाऱ्यांना तशा सूचना दिल्या. परंतु यातील अनेक योजनांची सविस्तर माहिती किंवा त्याचा इतिहासच या …
Read More »मेगा भरती आधी कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम करा महाराष्ट्र कंत्राटी कर्मचारी महासंघाकडून उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारच्या विविध विभागात १ लाख ५० हजार पदे रिक्त असून यातील ७२ हजार रिक्त पदांसाठी मेगा भरती घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र त्या आधी राज्यातील कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत समाविष्ट करावे या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य कंत्राटी कर्मचारी महासंघाच्यावतीने उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आल्याची …
Read More »महात्मा फुले, डॉ. आंबेडकर चरित्र साधने समितीवरील सदस्यांना कोणी ओळखता का? लिंबाळे, गवस व्यतीरिक्त एकाचीही माहिती उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडे नाही
मुंबई : गिरिराज सावंत-खंडूराज गायकवाड राज्याला समतेच्या मार्गावर चालण्यासाठी दिशा दाखविणारे महात्मा फुले आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन कार्य आणि विचार नव्या पिढीला समजावे यासाठी राज्य सरकारकडून डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले चरित्र साधने प्रकाशन समितीच्या माध्यमातून त्यांचे साहित्य प्रकाशित केले जाते. या महापुरूषांची योग्य ते विचार समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी आणि …
Read More »दुष्काळ आणि आपत्तीसाठीचा १४ हजार कोटींचा निधी सरकारकडून इतर कामावर खर्च मराठवाडा अनुशेष निर्मुलन आणि विकास मंचचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी राज्यात यंदा तीव्र दुष्काळ असताना जिल्हास्तरावर आपत्ती व्यवस्थापनाचे बँक खाते उघडून त्यातील रकमेच्या आधारे दुष्काळासाठी मदत निधी उपलब्ध करणे राज्य सरकारवर बंधनकारक आहे. तरीही राज्य सरकारने जिल्हापातळीवर खाते उघडण्याऐवजी राज्याच्या आपत्ती निवारणासाठी राखीव असलेली १३ हजार ५०० कोटी रूपयांची रक्कम मागील चार वर्षापासून इतर कामावर खर्च करण्यात …
Read More »जलसंधारण विभागाचे प्रणेते अरुण बोंगीरवार यांचे निधन मुख्यमंत्र्यांसह अनेकांनी वाहीली श्रध्दांजली
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळाचा सामना करण्यासाठी सुक्ष्म जलसंधारण प्रकल्पाची कामे सुरु करत त्यासाठी स्वतंत्र संकल्पनेच्या माध्यमातून जलसंधारण विभागाचे प्रणेते ठरलेल्या आणि राज्याचे माजी मुख्य सचिव राहीलेले अरुण बोंगीरवार यांचे आज शुक्रवारी पहाटे दीर्घ आजाराने वयाच्या ७६ व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा पियुष, कन्या दीप्ती आणि गार्गी असा परिवार आहे. मुख्यमंत्र्यांचे …
Read More »महसूल विभागाच्या गलथान कारभारामुळे सरकारला ५० हजारांचा दंड भारत-पाक युध्दातील जवान असूनही जमिनीच्या प्रतिक्षेत
मुंबई : प्रतिनिधी राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात शहीद आणि जवानांच्या नावावरून राजकारण करणाऱ्या राज्यातील भाजप सरकारच्या गलथान कारभाराचा फटका एका भारत-पाक युध्दात मर्दमुकी गाजविणाऱ्या सैनिकाला बसला आहे. तसेच या कारभारामुळे मुंबई उच्च न्यायालयाने ५० हजार रूपयांचा दंड ठोठावून तीन महिन्यात या शुरवीर सैनिकाला जमिन देण्याचे आदेश सरकारला देवून ११ महिने …
Read More »जमिन विक्री घोटाळ्याप्रकरणी माजी आमदार सुरेश जैन हाजीर हो १९ डिसेंबर ला जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे जिल्हा न्यायालयाचे आदेश
जळगांव : प्रतिनिधी घरकूल योजना राबविताना आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी यापूर्वी तुरुंगवास भोगलेल्या सुरेश जैन यांच्या अडचणीत आता नव्याने भर पडली आहे. शहरातीलच रेल्वेलगतच्या जमिनीच्या नकाशात फेरफार करून सदर जमिन विकल्याप्रकरणी खान्देश बिल्डरच्या संचालकांसह माजी आमदार सुरेश जैन यांना जळगांव जिल्हा न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले. शहरातील दूध फेडरेशन आणि रेल्वे …
Read More »
Marathi e-Batmya