सर्जिया गोर यांची खळबळजनक महिती, पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे अशी भारताची विनंती फ्रान्समधील डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान मोदी यांच्या पत्रकार परिषदे दरम्यानची घटना

फ्रान्समधील जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भेटीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत प्रश्न विचारणे टाळावे, अशी भारताने अमेरिकेला विशेष विनंती केली होती, असा दावा अमेरिकेचे भारतातील राजदूत सर्जिओ गोर यांनी केला. डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरुवातीला सहमती दर्शवली, पण नंतर ते ही विनंती विसरल्यासारखे दिसले आणि त्यांनी प्रश्न विचारण्यासाठी आमंत्रित केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी त्यांच्या शेजारी बसूनच या भेटीचे ४५ मिनिटांच्या पत्रकार परिषदेत रूपांतर झाले, असे सर्जिया गोर यांनी शनिवारी ‘इकॉनॉमिक टाइम्स वर्ल्ड लीडर्स फोरम’मध्ये सांगितले.

सर्जिया गोर यांच्या दाव्यांना उत्तर देताना सरकारी सूत्रांनी सांगितले की, भारतीय बाजू केवळ कोणत्याही व्हीव्हीआयपी भेटीसाठी नवी दिल्लीद्वारे पाळल्या जाणाऱ्या मानक प्रोटोकॉलची माहिती देत ​​होती. पुढे सांगितले की, नेत्यांच्या सार्वजनिक उपस्थितीच्या व्यवस्थेवर चर्चा करणे हा अशा भेटींचा एक नियमित भाग आहे.

पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट १७ जून रोजी फ्रान्समधील एव्हियान-लेस-बेन्स येथे जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने झाली होती.

यावेळी बोलताना अमेरिकेचे राजदूत सर्जिया गोर म्हणाले की, आम्ही पडद्यामागे, मंचाच्या मागे होतो, आणि एका क्षणी तिथे फक्त राष्ट्राध्यक्ष आणि मीच होतो, आणि त्यांनी मला विचारले, भारतीय काय मुद्दे मांडणार आहेत. आम्ही काही विषयांवर चर्चा केली, बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत झालेल्या संभाषणाची आठवण सांगताना म्हणाले.

पुढे बोलताना सर्जिया गोर म्हणाले की, आणि ते म्हणाले, त्यांच्या काही मागण्या आहेत का? आणि परराष्ट्र मंत्रालयाची एक मागणी होती. ते म्हणाले, चला माध्यमांना बोलावूया, पण पूर्ण पत्रकार परिषद घेऊ नका, असेही यावेळी सांगितले.

सर्जिया गोर म्हणाले की, त्यांनी भारताची पसंती थेट अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना कळवली.

“मी राष्ट्राध्यक्षांना सांगितले, मी म्हणालो, भारतीयांना प्रश्न नको आहेत. ते म्हणाले, नक्कीच, काही हरकत नाही,” गोर यांनी आठवण सांगितली.

त्यानंतर पत्रकार आणि कॅमेऱ्यांच्या उपस्थितीत बैठकीला सुरुवात झाली. सर्जिया गोर म्हणाले की, जेव्हा मोदी आणि ट्रम्प एकमेकांसमोर बसून आपले प्रास्ताविक भाषण देत होते, तेव्हा खोलीत सुमारे ५० कॅमेरे होते.

“तर बैठक सुरू झाली, पत्रकार आत आले, तिथे सुमारे ५० कॅमेरे होते, राष्ट्रपती इथे बसले होते, पंतप्रधान तिथे बसले होते, ते दोघे काही मिनिटे बोलले, असे ते म्हणाले.

पण सुरुवातीचे भाषण संपताच, डोनाल्ड ट्रम्प कॅमेऱ्यांकडे वळले आणि त्यांनी पत्रकारांना विचारले, “काही प्रश्न आहेत का?”
सर्जिया गोर म्हणाले की, त्या प्रश्नामुळेच खऱ्या अर्थाने संवादाला सुरुवात झाली.

“आणि त्यामुळेच सर्व काही सुरू झाले,” असे राजदूत म्हणाले. पुढे ते म्हणाले की, त्यानंतर “४५ मिनिटांची पत्रकार परिषद” झाली, ज्यात “सर्व विषयांवर चर्चा झाली”.

मात्र, सरकारी सूत्रांनी सांगितले की, नेत्यांच्या व्यवस्थेबाबत अशा चर्चा होणे ही एक सामान्य बाब आहे आणि भारतीय बाजू केवळ प्रमाणित कार्यपद्धतीचे पालन करत होती.

“कोणत्याही व्हीव्हीआयपी भेटीपूर्वी नेत्यांच्या सार्वजनिक उपस्थितीच्या व्यवस्थेबाबत चर्चा करणे ही एक सामान्य प्रथा आहे. या संदर्भात, भारतीय बाजूने अशा भेटींसाठीची आपली प्रमाणित कार्यपद्धती कळवली होती,” असे सूत्रांनी सांगितले.

पूर्व फ्रान्समध्ये जी-७ शिखर परिषदेच्या निमित्ताने १७ जून रोजी पंतप्रधान मोदी आणि ट्रम्प यांची भेट झाली. होर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेच्या नौदलाने एका व्यापारी जहाजावर केलेल्या हल्ल्यात तीन भारतीय खलाशी ठार झाल्यानंतर काही दिवसांनी ही भेट झाली. या संवादादरम्यान मोदींनी संघर्षग्रस्त भागात कार्यरत असलेल्या भारतीय खलाशांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला.

“होर्मुझच्या सामुद्रधुनीतील अनेक भारतीय खलाशांची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची आहे,” असे पंतप्रधानांनी भेटीदरम्यान ट्रम्प यांना सांगितले.

तथापि, ट्रम्प यांनी खलाशीगिरीशी संबंधित धोके कमी लेखले आणि या व्यवसायाला “एक खडतर व्यवसाय” असे संबोधले.
दोन्ही नेत्यांनी होर्मुझच्या सामुद्रधुनीच्या आसपासची परिस्थिती आणि भारत-अमेरिका व्यापारी संबंधांवरही चर्चा केली.

डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दुसऱ्या देशाने हल्ला केल्यास अमेरिका भारताला पाठिंबा देईल. मोदींकडे बोट दाखवत ते म्हणाले, “जर कोणी त्या माणसावर हल्ला केला, तर आम्ही तिथे असू. आता, जर नवीन नेता आला, तर मला खात्री नाही.”

जूनमधील बैठक महत्त्वपूर्ण होती, कारण ती नवी दिल्ली आणि वॉशिंग्टन यांच्यात द्विपक्षीय व्यापार करारावर वाटाघाटी करण्याच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर झाली, तसेच पश्चिम आशियातील तणावामुळे जहाजवाहतूक आणि ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम होत होता. ट्रम्प यांनी असेही म्हटले की, दोन्ही देश व्यापार करार करण्याच्या “अतिशय जवळ” आहेत.

About Editor

Check Also

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांची स्पष्टोक्ती, आरक्षण ही घटनात्मक तरतूद कोणाच्या सांगण्याने ना संपवली ना कोणाला दिली

केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी शुक्रवारी सांगितले की, कोणाच्याही मागणीनुसार आरक्षण रद्द केले जाऊ शकत …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *