दुबईहून प्रियकराला भेटण्यासाठी ‘ती’ आली भारतात पण…. प्रियकराला भेटण्यासाठी आलेल्या प्रेयसीला भारतात पोहचताच बसला धक्का

दुबईहुन एक तरुणी आपल्या प्रियकराचा शोध घेत उत्तर प्रदेशात त्याच्या घरी पोहोचली. प्रेयसीला पाहताच प्रियकराच्या कुटुंबीयांनी घराला कुलूप लावून घरातून पळ काढला. प्रेयसी गेल्या ७ दिवसांपासून प्रियकराच्या घराबाहेर राहत असून संपूर्ण परिसरात ही घटना चर्चेचा विषय बनली आहे. या संदर्भात एका हिंदी न्युज चॅनेल ने बातमी दिली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, दुबौलिया पोलीस स्टेशन हद्दीतील रामनगर गावात राहणारा राजकुमार याची जालंधर, पंजाब येथील एका मुलीशी दुबईतील भेट झाली होती. तेथे दोघेही गेल्या तीन वर्षांपासून एकत्र कुकिंगचं काम करत होते. याच दरम्यान दोघेही प्रेमात पडले आणि लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले अशी माहिती समोर आली आहे.

महिनाभरापूर्वी राजकुमारने घरी आला आणि त्याने तरुणीशी बोलणं बंद केलं. त्यानंतर तरुणीला काळजी वाटू लागली आणि तिचं प्रेम शोधण्यासाठी ती दुबईहून भारतात आली. ती काही दिवस लखनौच्या हरैया येथील हॉटेलमध्ये राहिली. तीन दिवस तिच्या धाकट्या बहिणीच्या घरी राहिली. यानंतर प्रियकर राजकुमारच्या घरी पोहोचली.

प्रेयसी म्हणते की, ती मरेपर्यंत तिच्या प्रियकराची वाट पाहत राहील. उपाशी राहून ती वाट पाहत आहे. तिने प्रशासनाकडे मदतीचं आवाहनही केलं आहे. तिने सांगितले की, ती तीन वर्षांपूर्वी तिच्या प्रियकराला भेटली होती. तिने त्याच्यासाठी करवा चौथचा उपवासही ठेवला. ती तिच्या प्रियकराच्या दारात दिवस काढत आहे. तिला विश्वास आहे की एक दिवस तिचा प्रियकर नक्कीच येईल आणि तिला आपल्यासोबत राहायला देईल.

About Marathi E Batmya

Check Also

MP Budget: मध्य प्रदेशचा अर्थसंकल्प खोट्या आकड्या आणि पोकळ दाव्यांनी भरलेला आहे: उमंग सिंघर

विरोधी पक्षनेते उमंग सिंघर यांनी मध्य प्रदेश विधानसभेत अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री जगदीश देवदा यांनी सादर …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *