कोल्हापूरमध्ये होणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडियम विकासवाडी येथील १२ हेक्टर ७६ आर जमीन देणार कोल्हापूर जिल्ह्यातील मौजे विकासवाडी (ता. करवीर) येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रिकेट स्टेडीयम उभारणी करण्यासाठी १२ हेक्टर ७६ आर इतकी शासकीय जमीन विनामुल्य देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. शालेय शिक्षण व …
Read More »राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारी पासून अर्थसंकल्प ६ मार्च रोजी सांसदीय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत निर्णय
राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधान परिषद सभापती प्रा.राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री …
Read More »सिंचन प्रकल्पांसाठी साडेसात हजार कोटींचे कर्जास मंत्रिमंडळाची मान्यता राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
राज्यातील अपूर्ण ५७ सिंचन प्रकल्प पूर्ण करणे, कालवे आणि वितरण प्रणालीमध्ये सुधारणा करण्यासाठी नाबार्डकडून साडेसात हजार कोटी रुपयांचे कर्ज घेण्यास मंगळवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. कर्ज उपलब्ध होऊन प्रत्यक्ष कामे मार्गी लागल्यास राज्यात आठ लाख हेक्टर जमीन सिंचनाखाली येणार आहे. राज्यात बांधकाम सुरू असलेले जलसिंचन प्रकल्प पूर्ण करण्यासाठी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे आवाहन प्रशासकीय सुधारणांचा लाभ थेट सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवावा प्रशासकीय सुधारणांचा ‘जीपीआर 2.0’ उपक्रम
राज्यातील प्रशासकीय कामकाजात आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी शासनाने ‘जीपीआर 2.0’ हा महत्त्वाकांक्षी प्रशासकीय सुधारणा उपक्रम हाती घेतला आहे. महाराष्ट्राच्या या अभिनव उपक्रमाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विशेष कौतुक करत देशातील इतर राज्यांनाही याच धर्तीवर कार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रशासकीय सुधारणांचा प्रत्यक्ष लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी सर्व शासकीय विभागांनी …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, राज्यात ७० हजार पदांची लवकरच एमपीएससी मार्फत नोकरभरती नव्या पद्धतीने होणार नोकर भरती
राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे २० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »टीईटी परिक्षे दरम्यान महिलांना मंगळसूत्र-दागिने काढायला लावले, अंबादास दानवे यांचा संताप संभाजी नगरमधील घटनेवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचे उत्तर
राज्यात टीईटी परिक्षा होत आहे. परिक्षेसाठी परिक्षार्थी परिक्षा केंद्रावर जमा झाले. छत्रपती संभाजी नगर मध्ये मात्र काही महिला परिक्षार्थींना मात्र वेगळ्याच समस्यांना सामोरे जावे लागले. परिक्षा केंद्रातील नियम म्हणून त्यांना त्यांच्या गळातील मंगळसूत्र आणि इतर दागिने काढून ठेवण्यास सांगितल्याने एकच गोंधळ निर्माण झाला. या प्रकरणावरून विधान परिषदेचे आमदार अंबादास दानवे …
Read More »हिमंता बिस्वा सरमा यांचा गंभीर आरोप, गौरव गोगाई आणि त्यांच्या पत्नीचे पाकिस्तानी एजंटशी संबध आसाम निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते गोगाई यांच्यावर आरोप
काँग्रेस खासदार गौरव गोगोई, त्यांची ब्रिटिश पत्नी एलिझाबेथ कोलबर्न आणि पाकिस्तानी नागरिक अली तौकीर शेख यांच्यात ‘गहन संबंध’ आहेत आणि आयबीकडून मिळालेली माहिती गुप्तपणे शेजारील देशाला पुरवण्यात आली असल्याचा आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी रविवारी केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी असाही …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही, आगामी काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर येत्या २-३ महिन्यांत भविष्योन्मुख धोरणे आणणार, अॅडव्हांटेज विदर्भ परिषद-२०२६
येत्या काळात महाराष्ट्राचा भर धोरण आधारित विकासावर राहणार आहे. यासाठी आम्ही अनेक धोरणे आखली असली, तरी काही धोरणे जुनी झाली असल्याने भविष्यातील गरजा, बदल आणि आव्हाने लक्षात घेऊन येत्या दोन-तीन महिन्यात विविध क्षेत्रांतील भविष्योन्मुख (फ्युचर रेडी पॉलिसी) धोरणे आणली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे दिली. असोसिएशन …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदर्भाच्या सर्वांगीण विकासावर भर केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ‘खासदार औद्योगिक महोत्सव- ॲडव्हान्टेज विदर्भ’चे थाटात उद्घाटन
गडचिरोली येथे जगातील सर्वात मोठे ग्रीन स्टिल हब, नागपुरात सोलर मॉडयुल आणि अमरावतीमध्ये आशिया खंडातील सर्वात मोठे वैमानिक प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले पडली आहेत. निर्मिती आणि सेवा क्षेत्रात विदर्भाची घोडदौड सुरु आहे. महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीसोबत झालेल्या सामंजस्य करारातून नागपूरमध्ये ऑटोमोबाईल उद्योगाचे पदार्पण झाले आहे, या सर्व प्रयत्नांतून येत्या ५ …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासासाठी कॅनडाची भागीदारी गृहनिर्माणासह पायाभूत विकासात कॅनडाचे सहकार्य राज्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल
महाराष्ट्राच्या विकासात योगदान देण्यासाठी कॅनडा उत्सुक आहे.कॅनडियन इन्फ्रास्ट्रक्चर बँकेच्या सहभागातून गृहनिर्माण व पायाभूत क्षेत्रातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीद्वारे या सहकार्याची सुरुवात केली जाईल. कॅनडाच्या वित्तीय व तांत्रिक सहकार्यामुळे महाराष्ट्रातील पायाभूत विकासाला नवी दिशा मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी कॅनडा इन्फ्रास्ट्रक्चर बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सेबास्टियन यांच्याशी …
Read More »
Marathi e-Batmya