भारतातील उद्योग आणि गुंतवणूक क्षेत्रासाठी महाराष्ट्र गेटवे-ऑफ-इंडिया’ असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विधान खरे ठरवणारे तब्बल १४ लाख ५० हजार कोटींचे गुंतवणूक करार पहिल्याच दिवशी करण्यात आले. या गुंतवणूकीसोबतच राज्यात १५ लाख रोजगार संधी निर्माण होणार आहेत. राज्य शासनाच्या उद्योग, गुंतवणूक आणि सेवा विभागाच्या माध्यमातून यंदा विविध विभागांनी आणि विविध …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचा विश्वास, विदेशी गुंतवणूकीसाठी महाराष्ट्र भारताचे गेट वे राज्याच्या सर्व भागासाठी, वैविध्यपूर्ण क्षेत्रात गुंतवणूक येणार
‘महाराष्ट्र विश्वासार्ह आहे. आम्ही जे सांगतो. ते करतो. त्यामुळेच जगभरातील उद्योजक, गुंतवणूकदारांचा महाराष्ट्रावर विश्वास वाढला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत वाटचालीसाठी पार्श्वभूमी निर्माण केली आहे. एक ईकोसिस्टिम तयार केली आहे. त्याआधारे यंदाही महाराष्ट्रात प्रचंड प्रमाणात गुंतवणूक येईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. महाराष्ट्र हे भारतात …
Read More »वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर
महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ …
Read More »नाना पटोले यांची मागणी, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घ्या राज्य निवडणूक आयुक्त व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली मागणी
राज्यात नुकत्याच झालेल्या २९ महानगरपालिका निवडणुकांनी निवडणूक व्यवस्थेचा बुरखा पुर्णतः फाटलेला आहे. शहरातील अत्यल्प मतदानाची टक्केवारी ही केवळ मतदार उदासिन नसून निवडणूक प्रक्रियेवरचा जनतेचा विश्वास कमी होत असल्याचे निर्दशक आहे. देशातील अनेक राज्यांनी जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी तसेच वाद टाळण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ईव्हिएम EVM ऐवजी बॅलेट पेपरवर घेण्याचा निर्णय …
Read More »राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतले हे महत्वाचे निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़
राज्यातील २९ महानगरपालिकांच्या निवडणूकीचा नुकताच निकाल जाहिर झाला. त्यानंतर आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. या बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. तर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मात्र आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपस्थित नव्हते. त्यामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली निर्णय़ घेण्यात आले. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत यवतमाळमधील बेंबळा …
Read More »वाहनधारकांना मोठा दिलासा: अटल सेतूच्या पथकरात आणखी एक वर्ष सवलत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई व नवी मुंबईला जोडणाऱ्या अटल बिहारी वाजपेयी शिवडी – न्हावाशेवा अटल सेतूच्या वापराकरिता पथकरात पन्नास टक्के सवलत देण्याचा निर्णय कायम ठेवण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. तसेच ईलेक्ट्रीकल मोटार कार, बसेस यांनाही अटल सेतूच्या पथकरातून पूर्ण सूट देण्याबाबतचा मुद्दाही अधिसूचनेत …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, सुशासन, विकास आणि पारदर्शकतेचा विजय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपा प्रदेश कार्यालयात विजयोत्सव साजरा
मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या महापालिका निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी सर्वाधिक जागा जिंकत क्रमांक एकचा पक्ष ठरला आहे. भाजपा-महायुतीच्या विकास, सुशासन आणि पारदर्शक कारभाराला मुंबई आणि इतर महापालिका क्षेत्रातील जनतेने स्पष्ट कौल दिल्याबद्दल मतदारांचे आभार मानतो, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी केले. भाजपा प्रदेश कार्यालयात साज-या झालेल्या विजयोत्सवावेळी मुख्यमंत्री …
Read More »महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे केले अभिनंदन राज्यभरातील २९ महानगरपालिकांमध्ये भाजपा अव्वल
अत्यंत प्रतिष्ठेची निवडणुक ठरलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकीत भाजप शिवसेना रिपाइं महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज वर्षा बंगल्यावर भेट घेवून हार्दिक अभिनंदन केले. राज्यातील २९ महापालिकांपैकी २६ महापालिकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाल्याबद्दल रामदास आठवले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »महानगरपालिका मतदानावेळी गोंधळात गोंधळ, नावे गायब, शाई पुसली जाण्याचा प्रकार नवा विरोधकांकडून गोंधळावर भाष्य करताच, सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांची खिल्ली
जवळपास ७ वर्षानंतर राज्यातील २९ महानगरपालिकांसाठी निवडणूकीसाठी आज मतदानाची प्रक्रिया पार पडत होती. मात्र राज्यातील अनेक निवडणूक केंद्रावर भल्या सकाळीच ईव्हीएम मशिन्स बंद पडल्या त्यामुळे उशिराने मतदानाची प्रक्रिया सुरु झाली. यामध्ये मुंबईतील मतदान केंद्रांपासून ते विदर्भातील काही मतदान केंद्रापर्यंत अशा घटना घडल्याचे पाह्यला मिळाले. तसेच अनेक ठिकाणी मतदारांची नावे दरवेळीच्या …
Read More »नाना पटोले यांची मागणी, शेतकऱ्याला बुटाने मारहाण करणाऱ्या मुजोर कृषी अधिकाऱ्यावर कारवाई करा मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी
वाशिम जिल्ह्यातील गोगरी परिसरात मनरेगा योजने अंतर्गत संत्रा फळबाग अनुदान रखडल्याबाबत विचारणा केल्याने एका शेतकरी बांधवाला कृषी अधिकाऱ्याने बुटाने मारहाण केल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. या प्रकरणाची तातडीने सखोल चौकशी करून संबंधित मुजोर अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करावी आणि पीडित शेतकऱ्याला तात्काळ न्याय द्यावा, अशी मागणी काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष आमदार नाना …
Read More »
Marathi e-Batmya