मुंबईतील विधानभवनासह महत्त्वाच्या ठिकाणांना बॉम्बने उडवून देण्याची धमकी विधानभवन केले रिकामे, प्रशासनात खळबळ

आंतरराष्ट्रीयस्तरावर अमेरिका आणि इस्रायलने इराण देशाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे. त्याचा परिणाम महाराष्ट्रासह संपूर्ण भारतावर होत आहे. त्या परिणामातून बाहेर पडण्यासाठी केंद्र सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. तसेच संसदेचे आणि महाराष्ट्रात विधिमंडळाचे अर्थसंकल्पिय अधिवेशन सुरु आहे. मात्र या घडामोडीच्या पार्श्वभूमीवर विधिमंडळ अधिवेशऩाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सगळी कडेकोट सुरक्षा असताना मुंबईतील विधानभवनासाह सार्वजनिक ठिकाण म्हणून ओळखल्या जाणारी ठिकाणी बॉम्बने उडवून देण्याची धमकी निनावी ई मेल द्वारे देण्यात आली आहे. तसेच ही ठिकाणे क्षेपणास्त्र आणि बॉम्बने उडवून देण्याची धमकी दिली. त्यामुळे सकाळी विधानभवनाचे कामकाज सुरु होण्यापूर्वीच संपूर्ण विधानभवन रिकामे करत संपूर्ण इमारत आणि परिसराची कसून चौकशी पोलिस यंत्रणांनी केली.

धमकी नेमकी काय ?

​मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ईमेल सकाळी ६:५७ वाजता पाठवण्यात आला होता. यामध्ये ‘खलिस्तान नॅशनल आर्मी’ या संघटनेचा उल्लेख असून, दुपारी विविध वेळेत स्फोट घडवून आणण्याचा इशारा देण्यात आला आहे. धमकीमध्ये खालील ठिकाणांचा उल्लेख आहे:

​विधानसभा (विधानभवन): दुपारी ३:११ वाजता

​शेअर बाजार (Stock Exchange): दुपारी १२:११ वाजता

​बँका: दुपारी १:११ वाजता

​न्यायालय (Courts): दुपारी २:११ वाजता

​मेट्रो स्थानके: रात्री ९:११ वाजता

नेत्यांना लक्ष्य करण्याची धमकी

​धमकी देणाऱ्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे खलिस्तान जनमत चाचणीला पाठिंबा देण्याची मागणी केली आहे. तसे न केल्यास गंभीर परिणामांना सामोरे जाण्याचा इशारा दिला असून, देशाच्या सर्वोच्च नेत्यांना (मोदी-शाह-जयशंकर) लक्ष्य करण्याच्याही उल्लेख या पत्रात आहे.

सुरक्षा यंत्रणा सतर्क

​हा ईमेल समोर आल्यानंतर मुंबई पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली आहेत. विधानभवन परिसर, शेअर बाजार आणि महत्त्वाच्या मेट्रो स्थानकांवर सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली असून ‘बॉम्ब शोधक व नाशक पथक’ (BDDS) पाचारण करण्यात आले आहे. हा ईमेल खोडसाळपणा आहे की खरोखर काही धोका आहे, याचा तपास सायबर सेल करत आहे.

मिळालेला ई-मेल खालील प्रमाणे—–

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *