निवडणूक आयोगाद्वारे सुरू असलेल्या मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरीक्षण’ (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेत मोठ्या प्रमाणावर नावे वगळल्याचा आणि कथित अनियमितता झाल्याचा आरोप करत, विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतर विरोधी नेत्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या आहेत. या याचिकांवर गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाने भारतीय निवडणूक आयोग (ECI) आणि मुख्य …
Read More »मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्यासाठी मनसे आणि शिवसेना उबाठाच्यावतीने शिवाजी पार्कवर आंदोलन ठाकरे बंधू रस्त्यावर, 'एक सही संतापाची' मोहीम सुरू
दिल्लीत इंडिया आघाडी आणि काँग्रेसच्या नेतृत्वात राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे, समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखाली सर्वोच्च न्यायालयापर्यंत मोर्चा काढत तेथील सर्वोच्च न्यायालयात मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात मतचोरीची आणि एसआयआरच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आली. त्याच मुद्यावरून मुंबईतही मनसे प्रमुख राज ठाकरे, अमित ठाकरे आणि शिवसेना उबाठाचे …
Read More »सर्वोच्च न्यायालयाच्या प्रवेशद्वारावर पोहोचण्यापूर्वीच इंडिया आघाडीचा मोर्चा रोखला न्यायालयात ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात याचिका दाखल
काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी वाड्रा आणि AISA च्या अध्यक्षा नेहा बोरा यांच्या नेतृत्वाखाली हजारो निदर्शक मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात कारवाई आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत टिळक मार्गावरून सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने (सुमारे २ किमी अंतरावर) कूच करत आहेत. मतदार याद्यांच्या ‘विशेष सखोल पुनरावृत्ती’ (SIR) प्रक्रियेत …
Read More »टीएमसीच्या ममता बॅनर्जी आणि आपचे अरविंद केजरीवाल यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक अटकेनंतर तुरुंगात केली रवानगी
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सुरू असलेल्या निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर, शनिवारी दिल्लीत पश्चिम बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि त्यांच्याशी निष्ठावान असलेल्या तृणमूल काँग्रेसच्या पाच नेत्यांना (ज्यामध्ये राज्यसभा खासदार डेरेक ओ’ब्रायन आणि डोला सेन यांचा समावेश आहे) ताब्यात घेण्यात आले. त्याच सुमारास, ‘आप’ (AAP) प्रमुख आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री …
Read More »घाबरलेल्या दिल्ली पोलिसांनी सीजेपीच्या अभिजीत दीपके, रांका, दास यांना विमानातूनच केली अटक मुंबईहून एअर इंडिया विमानाने दिल्लीला पोहोचताच दिल्ली पोलिसांची कारवाई
सर्वोच्च न्यायालयाने नुकतेच निवडणूक आयोगाच्या संदर्भात दाखल याचिकांवर सुनावणी घेताना एसआयआर वेळी फॉर्म ६ मध्ये न्यायालयाच्या संमतीशिवायच सुधारणा केल्याचे स्पष्ट केले. त्यानंतरही केंद्र सरकारने योग्य तो निर्णय न घेताच मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावर कायम ठेवले. त्यानंतर कॉकरोच जनता पार्टी (CJP) ने १० ऑक्टोंबर रोजी आंदोलनाचा नारा सीजेपीने …
Read More »राहुल गांधी यांनी भाजपला स्वतःवरच निशाणा साधण्यासाठी दोन शस्त्रे कशी दिली? एलॉन मस्क यांच्या आरोपावर एसआयआरमधील अनियमततेवरून केला सवाल
सलग तीन दिवस राहुल गांधी यांनी चर्चेची सूत्रे आपल्या हाती ठेवली होती. ‘एसआयआर’ (SIR) मधील अनियमिततेवरून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात त्यांनी केलेल्या अनपेक्षित आंदोलनामुळे सत्ताधारी भाजप बचावात्मक पवित्र्यात आला होता. त्यानंतर त्यांनी एलॉन मस्क यांच्या समर्थनार्थ एक पोस्ट केली; एलनम्स्मस्क यांनी भारतात ‘स्टारलिंक’च्या व्यावसायिक लाँचिंगबाबत (प्रारंभाबाबत) तीव्र …
Read More »सीजेपीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीकडे येणाऱ्या ट्रेन, मेट्रो बंद करण्याच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दिल्ली अशी पूर्ण बंद करता येणार नाही अशी, सर्वोच्च न्यायालयाची याचिका
मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी १० ऑक्टोबर रोजी राजधानीत विविध विरोधी पक्ष आणि युवा संघटनांनी निदर्शने आयोजित केली आहेत. या पार्श्वभूमीवर, दिल्ली मेट्रो स्थानके बंद करणे आणि दिल्लीकडे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या रद्द करणे यांसारख्या कृतींविरोधात अनेक याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. शुक्रवारी दुपारी …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, ज्ञानेशकुमारांची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा मोदी व शाहांनी देशाची माफी मागावी, निवडणूक आयोगातील व्होटचोरी व भ्रष्ट कारभाराविरोधात काँग्रेसचे राज्यभर ‘लोकशाहीचा काळा दिवस’ आंदोलन
भारतीय जनता पक्ष, पंतप्रधान नरेंद्र मोदी व अमित शाह यांनी संगनमत करून निवडणूक आयोगाच्या मदतीने व्होटचोरी केली आहे. या व्होटचोरीतूनच मोदी सरकार सत्तेत आले आहे, ही व्होटचोरी उघड झाली असून मोदी-शाह व भाजपाला मदत करणारे भ्रष्ट निवडणूक आयुक्त ज्ञानेशकुमारची हकालपट्टी करून देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा, व्होट चोर ज्ञानेश कुमारला महाराष्ट्रात पाय ठेवू देणार नाही आला तर तोंडाला काळे फासणार; निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात काँग्रेसचा आक्रमक इशारा
देशाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी व्होटचोरी करून भाजपाला निवडणूका जिंकून देण्यात मदत केली आहे हे आता स्पष्ट झाले आहे. देशभरात व्होटचोर ज्ञानेशकुमार आणि त्याचे आका मोदी शाह यांच्याविरोधात देशभरात प्रचंड संताप आहे. त्यामुळे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आपले उत्तर प्रदेश आणि छत्तीसगड मधील कार्यक्रम रद्द केले …
Read More »काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी वाड्रा यांचा आरोप, माझ्याकडील सर्व गोष्टी पोलिसांनी खेचून घेतल्या पोलिसांनी जबरदस्तीने केली अटक
बुधवारी मध्य दिल्लीत मोठा तणाव निर्माण झाला. ‘इंडिया’ (INDIA) आघाडीचे विरोधी पक्षनेते आणि खासदार मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यासाठी जंतरमंतरकडे जात असताना, पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त लावून त्यांना अडवले आणि अनेक नेत्यांना ताब्यात घेतले. राहुल गांधी यांना ताब्यात घेऊन आंदोलनस्थळावरून नेण्यात आले, तर प्रियंका गांधी वाड्रा …
Read More »
Marathi e-Batmya