राज्यात सत्तेची ताकद राखण्यासाठी शिवसेना उबाठामध्ये भाजपाने तोडफोड केली. त्यानंतर शिवसेना फोडताना जी पद्धत वापरण्यात आली. तीच पद्धत राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी भाजपाकडून वापरण्यात आली. फरक फक्त इतकाच की भाजपाचे आर्थिक पुठवठादार गौतम अदानी यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची किमान दोन वेळा भेट घेतली. त्यानंतर पक्ष फुटीची पार्श्वभूमीवर तयार करण्यात आली. त्यातून शरद पवार यांच्या नेतृत्वाच्या विरोधात त्यांचे पुतणे स्व. अजित पवार यांनी बंड करत वेगळी चुल मांडली. मात्र २०२४ च्या निवडणूकीच्या तोंडावर अजित पवार यांनी त्यांचा गट पुन्हा एकदा मूळ राष्ट्रवादीत विलीन करण्याच्या हालाचाली सुरु केल्या. तसेच त्याबद्दल सुतोवाच त्यांनी काही ठिकाणच्या भाषणातही व्यक्त केली. मात्र तत्पूर्वीच अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. मात्र त्यानंतरच शरद पवार यांच्यानंतर पक्षाचे नेतृत्व कोणाकडे अशी चर्चा सुरु झाली.
शरद पवार यांच्यानंतर कोण अशी चर्चा सुरु झाली. त्यावेळी अजित पवार हे गेल्याने पक्षाचा वारसा सुप्रिया सुळे यांच्याकडे हस्तांतरीत करण्यास अनेक कार्यकर्त्ये आणि नेते उत्सुक नसल्याचे दिसून येवू लागले. त्याबद्दलची चर्चा पक्षात सुरुही झाली. परंतु त्यासंदर्भात उघड चर्चा कोणी करेनासे झाले. दरम्यान राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाचा मुद्दा उपस्थित करत अंतर्गत कलह शांत करण्याचे प्रयत्न सुरु केले. परंतु त्यावर अंतिम तोडगा निघेनासा झाला. त्यामुळे ही चर्चाच अखेर सुप्रिया सुळे यांच्या वक्तव्याने स्थगित झाली.
नेमक्या याच काळात शरद पवार यांचे आजारपण बळावण्यास सुरुवात झाली. मध्यंतरी शरद पवार हे बारामतीत असताना अचानक पुण्याच्या रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करावे लागले. त्यानंतर पुन्हा काही काळ आलबेल गेले. मात्र पुन्हा शरद पवार यांना मुंबईच्या ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुन्हा काही दिवस जाताच पुन्हा एकदा शरद पवार यांना डिहायड्रेशनचा त्रास सुरु झाला. आणि शरद पवार पुन्हा दवाखान्यात भरती व्हावे लागले.
दरम्यानच्या काळात केंद्रातील भाजपा सरकारमध्ये सहभागी होण्यासाठी शरद पवार यांच्या गटातील काही नेत्यांकडून जोराच्या हालचाली सुरु झाल्या आणि ज्या नेत्याकडून या हालचाली सुरु झाल्या. त्या नेत्याकडूनच या हालचाली सुरु झाल्याची चर्चा पक्षांतर्गत सुरु झाली. तसेच या नेत्याकडून पक्षाची सारी सुत्रे हाती असावीत यासाठी आणि अजित पवार गटाची सारी सुत्रेही त्यांच्याच पक्षाच्या हाती असावीत यासाठी प्रयत्नशील असल्याने काही नेत्यांचा या विलिनीकरणास विरोध सुरु झाला. त्यातूनच अजित पवार गटाच्या नेत्यांनी परस्पर भाजपा नेते अमित शाह यांची भेट घेतली.
मात्र भाजपाच्या जवळ जाण्यासाठी म्हणून राष्ट्रवादीतील त्या नेत्याने भाजपाच्या डिलीमिटेश विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाला पाठिंबा देण्याचे स्विकारले आहे. मात्र या त्या नेत्याच्या धोरणास दस्तूरखुद्द शरद पवार यांच्यासह पक्षातील काही नेत्यांचा विरोध आहे. परंतु पक्षाची सुत्रे हाती असावीत यासाठी या नेत्याने मात्र शरद पवार यांचे मतही फारसे विचारात घेताना दिसत नसल्याची चर्चाही पक्षात आहे.
या नेत्याच्या धोरणाचा भाग म्हणून पक्षातील दुसरे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज खुलेपणाने पक्षाचा निर्णय झालेला असून डिलीमिटेशन विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय झाल्याचे अधिकृतरित्या जाहिर केले. तसेच त्या अनुषंगाने पक्षाच्या वतीने खासदारांसाठी व्हिप जारी केल्याचेही जाहिर केले. त्यामुळे राष्ट्रवादी शरद पवार यांच्या गटाचा निर्णय झाले असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. मात्र त्यानंतर काही वेळातच सुप्रिया सुळे यांनी युटर्न घेत डिलीमिटेशनचे विधेयक हाती आल्यानंतर त्यावर निर्णय घेतल्याचे जाहिर केले. त्यामुळे शरद पवार यांच्या गटातील त्या नेत्याचे पुरोगामीत्वाचा मुखवटा घालणाऱ्याचे मनसुबे यशस्वी होणार की शरद पवार यांच्या मतांप्रमाणे भाजपाच्या पाठी न जाता स्वतंत्र अस्तित्व राखायचे याचा उलघडा काही दिवसातच उघडकीस येणार आहे. तोपर्यंत राष्ट्रवादी भाजपासोबत जाणार की काँग्रेससोबत महाविकास आघाडीतच राहणार याचे उत्तर लवकरच मिळणार तोपर्यंत राज्याच्या आणि देशाच्या राजकारणातील चर्चा मात्र सुरुच राहणार असल्याचे दिसून येणार आहे.
Marathi e-Batmya