दशकांपासून, केरळमचे आखाती देशांशी असलेले संबंध परदेशातून पाठवलेल्या पैशांवर (रेमिटन्सवर) अवलंबून राहिले आहेत. परदेशात काम करणाऱ्या मल्याळी लोकांच्या कथा म्हणजे घरी पाठवलेले पैसे, त्यातून बांधलेली घरे आणि आखाती देशांतील कमाईमुळे ज्या कुटुंबांचे जीवन बदलले आहे, त्यांच्याबद्दल होत्या. परंतु जागतिक बँकेच्या एका अभ्यासाने त्या स्थलांतराचा एक “चिंताजनक” पैलू समोर आणला आहे. …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मंत्रिमंडळ व विधिमंडळाचा प्रस्ताव सादर करूनही मोदी सरकारकडून दि बा पाटील यांचे नाव देण्यास टाळाटाळ नाव देण्यास विलंब, स्थानिकांमध्ये नाराजी व संताप
मुंबई, नवी मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि नाशिक जिल्ह्यांमधील प्रकल्पग्रस्त नागरिक आणि मूळचे आगरी-कोळी समाजबांधव, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला ‘लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ’ असे नाव देण्यात यावे, अशी मागणी दीर्घकाळापासून करत आहेत. महाराष्ट्र मंत्रिमंडळ आणि राज्य विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांनी (विधानसभा व विधान परिषद) २९ जून २०२२ रोजी एकमताने …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, आंदोलक विद्यार्थ्यांना धमकाविणाऱ्या पोलिसाला निलंबित करा पोलिसाला तात्काळ निलंबित करून चौकशी करा
नीट NEET पेपरफुटी विरोधात हजारो विद्यार्थी आंदोलनात सहभागी होत असून सरकार विरोधात आपला आक्रोश व्यक्त करत आहेत. लोकशाही व्यवस्थेत आंदोलन करण्याचा त्यांना हक्क आहे पण काही पोलीस जाणीवपूर्वक या विद्यार्थ्यांना मारहाण करत आहेत, धमक्या देत आहेत. मुंबईत एक पोलीस काही विद्यार्थ्यांना ड्रग्जच्या खोट्या गुन्ह्यात अडकून आयुष्य बरबाद करण्याची धमकी देत …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, मंत्र्यांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्यास लाज वाटते का ? नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस व त्यांच्या मंत्र्यांनी आधी काटकसर करावी व मग दुस-यांना उपदेश द्यावे. परदेश प्रवास टाळा म्हणणारेच परदेश दौऱ्यावर!
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पेट्रोल, डीजल वापर कमी करणे तसेच मेट्रो सारख्या सार्वजनिक वाहतुकीचा वापर करण्याचे आवाहन केले असले तरी त्यांच्या पक्षाचे मुख्यमंत्री व मंत्री त्याकडे कानाडोळा करत आहेत. मंत्र्यांच्या ताफ्यातील गाड्यांची संख्या अर्धी करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला आहे पण मुंबई सारख्या शहरात मेट्रो, बेस्ट, लोकल रेल्वे सेवा आहे तर इतर …
Read More »केंद्राच्या नव्या वक्फ बोर्ड कायद्यावर सर्वोच्च न्यायालय १५ सप्टेंबरला निर्णय देणार सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पूर्ण
वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ च्या अंमलबजावणीला स्थगिती देण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालय सोमवारी (१५ सप्टेंबर २०२५) निकाल देणार आहे. या याचिकेचे वर्णन १०० हून अधिक याचिकाकर्त्यांनी मुस्लिम मालमत्तेचे “जोरजोरात अधिग्रहण” असे केले होते तर सरकारने सार्वजनिक आणि खाजगी मालमत्तेवरील “अतिक्रमण” विरुद्ध आवश्यक प्रतिकार म्हणून बचाव केला होता. सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश …
Read More »वर्षा गायकवाड यांचा इशारा, भाजपा सरकारने पुन्हा सक्तीचे उद्योग करू नये लढा फक्त एका जीआरपुरता नव्हे तर मराठीच्या मान-सन्मानचा ; महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळू नका महागात पडेल...
राज्यातील महाराष्ट्रद्रोही मराठी विरोधी सरकारला अखेर इयत्ता पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीचा निर्णय मागे घ्यावा लागला. याविरोधात उभा महाराष्ट्र पेटून उठला होता. मराठी माणूस एकवटल्याने सरकारला माघार घ्यावी लागली. महाराष्ट्राचा स्वाभिमान, अभिमान व ओळख मराठी आहे आणि मराठीच राहील. कोणत्याही परिस्थितीत मराठीचा आवाज दाबता येत नाही आणि येणारही नाही, असा इशारा मुंबई काँग्रेस …
Read More »वर्षा गायकवाड यांचा सवाल, आरोग्य विभागाचा ७ हजार कोटींचा निधी जातो कुठे ? नालेसफाईत हातसफाई, मिठी नदीत अजून गाळ तसाच, मुंबईची तुंबई करणाऱ्या अधिकारी-ठेकेदारांवर कारवाई कधी?
मुंबई महानगरपालिका ही देशातील सर्वात श्रीमंत महानगरपालिकांपैकी एक आहे. महानगरपालिकेने यावर्षी ७४ हजार कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला, त्यात आरोग्य विभागासाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद केलेली असूनही मुंबईतील उपनगरीय आरोग्य सेवांची अवस्था अत्यंत बिकट आहे. रुग्णांना मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होऊ शकत नसतील, तर महापालिकेचा पैसा नेमका जातो कुठे? …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, बेस्ट बसची दुप्पट भाडेवाढ करून सरकारकडून मुंबईकरांची लुट बेस्टला संपवण्याचा भाजपा सरकार व बीएमसीचा हेतू, आर्थिक नुकसानीस वेट लीज खासगीकरण मॉडेल जबाबदार
भारतीय जनता पक्ष युतीच्या सरकारमध्ये आधीच महागाईने कहर केला आहे, सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्कील झाले असताना सरकारला त्याचे काही देणेघेणे नाही. महागाईने होरपळत असलेल्या मुंबईकरांवर बेस्ट बसच्या तिकिटदरात दुप्पट वाढ करून जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. मुंबईकरांचा या भाडेवाढीस विरोध असतानाही सरकारने त्याकडे दुर्लक्ष करून मुंबईकरांची लुट सुरु केली आहे, असा …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट जैन समाजाला विश्वासात घेऊन त्याच ठिकाणी मंदिर पुनर्बांधण्याचे महानगरपालिका आयुक्तांचे आश्वासन
विलेपार्ले पूर्व येथील दिगंबर जैन मंदिर प्रकरण न्यायालयात असताना न्यायालयाच्या निकालाची वाट न पहाता बीएमसी अधिकाऱ्यांनी मंदिर जमीनदोस्त केले. जैन मंदिर पाडताना जैन तीर्थंकरांच्या मूर्ती, जिनवाणी आणि आदरणीय ग्रंथ आणि धर्मग्रंथांचाही घोर अपमान करण्यात आला. विलेपार्लेतील दिगंबर जैन मंदिर पाडणे हा पूर्वनियोजित कट असून भाजपा युतीचे ‘बुलडोझर सरकार’च जबाबदार असल्याचा …
Read More »वर्षा गायकवाड यांची मागणी, कोस्टल रोड लगतची जागा विकास आराखड्यासाठी आरक्षित करा सार्वजनिक उद्यान व किनारी वन म्हणून विकास आराखड्यात आरक्षित करा
मुंबई कोस्टल रोडच्या निर्मितीसाठी अरबी समुद्रातून १११ हेक्टरपेक्षा जास्त जमीन समुद्र किनारी भरावाद्वारे विकसित करण्यात आली आहे. ही नव्याने विकसित झालेली जमीन मुंबईकरांच्या हक्काची आणि हिरवळीची जागा म्हणून जपली गेली पाहिजे, त्यासाठी या जमिनीला ‘सार्वजनिक उद्यान’ आणि ‘किनारी वन’ म्हणून मुंबईच्या विकास आराखड्यात राखीव करण्यात यावे, अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार प्रा. वर्षा गायकवाड यांनी …
Read More »
Marathi e-Batmya