Tag Archives: धाराशिव

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या घोषणेवर धाराशिवच्या शेतकऱ्याने १५०० रुपये कर्जाऊ घेत केली ५ हजाराची मनी ऑर्डर दीड एकर सोयाबीनच्या उत्पन्नात १५०० रुपयांच्या कर्जाची रक्कम एकत्रित करत पाठवले पाच हजार

धाराशिव तालुक्यातील सुर्डी येथील एका शेतकऱ्याने शासनाकडून जाहीर करण्यात आलेल्या पाच हजार रुपयांच्या अग्रीम मदतीवर नाराजी व्यक्त करत थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाच हजार रुपयांची मनीऑर्डर पाठवली. तसेच दीड एकर सोयाबीनच्या पिकासाठी तब्बल २५ हजार रुपये खर्च करूनही हातात अवघे ३ हजार ९०० रुपये आल्याने शेतकऱ्याने हे पाऊल उचलल्याचे …

Read More »

विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका, आग लगे बस्ती में, हम हमारे मस्ती में… नवरात्रीच्या कार्यक्रमात जिल्हाधिकाऱ्याने केला डान्स

राज्यात जवळपास सर्वच जिल्ह्यात पावसाने थैमान घातले आहे. प्रमाणापेक्षा जास्त पाऊस झाल्याने धरण नद्या नाले ओसंडून वाहत आहे. शेतात पाणी घरा दारात पाणी संसार वाहुन गेले. शेतकऱ्याच्या डोळ्यात पाणी, अशी परिस्थिती धाराशिव जिल्ह्यात असताना तेथील जिल्हाधिकारी किर्तीकुमार पुजार नवरात्रीच्या कार्यक्रमात नाचत आहेत, प्रशासनाला आणि राजकर्त्यांना याचं गांभिर्य नाही अशी घणाघाती …

Read More »

रामदास आठवले यांचे आश्वासन, पुरग्रस्तांना अधिकची मदतीसाठी विशेष पॅकेज मिळवून देणार पूरग्रस्तांसाठीही केली कविता

आसमानी संकट कोसळून मराठवाड्यातील शेतीचे अतोनात नुकसान झालेले आहे. शेतपिकांचे नुकसान झाल्यामुळे मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.  शेतकऱ्यांचे अश्रु पुसण्यासाठी आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे थेट शेताच्या बांधावर पोहोचले. मराठवाड्यात ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार …

Read More »

अतिवृष्टी, पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या जिल्ह्यांसाठी हेल्पलाईन जारी जिल्हा प्रशासनास तातडीने मदत; साधनसामग्री उपलब्ध

राज्यात सध्या सुरू असलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीत नागरिकांच्या मदत व बचाव कार्यासाठी संबंधित जिल्हा प्रशासनामार्फत सर्वोच्च प्राधान्य दिले जात आहे. अतिवृष्टी आणि पुरामुळे निर्माण होत असलेल्या परिस्थितीवर राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून लक्ष ठेवण्यात येत असून यासाठी जिल्हा प्रशासनास आवश्यक मदत व साधनसामग्री उपलब्ध करून दिली जात  असल्याने नागरिकांनी …

Read More »

राधाकृष्ण विखे पाटील यांची माहिती, दुष्काळमुक्त करण्यासाठी जलसिंचन क्षमता वाढवणार कृष्णेचे पाणी मराठवाड्याला देणार

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांमध्ये जलसिंचनाची क्षमता वाढवण्यासाठी शासन गंभीर असून, त्यासाठी महत्त्वाची पावले उचलण्यात येत आहेत, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे -पाटील यांनी विधान परिषदेत स्पष्ट केले. सदस्य रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी अर्धा तास चर्चेत वाढत्या पाण्याची मागणी पूर्ण करण्याची सूचना केली होती, त्यावेळी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी माहिती दिली. राधाकृष्ण …

Read More »

राज्यात धाराशिव जिल्ह्यात २४ तासात सर्वाधिक पाऊस ४२.२ मिमी पावसाची नोंद तर

मागील काही दिवसांपासून सातत्याने मान्सूनच्या पावसाने महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यात तर दररोज पावसाने हजेरी लावली आहे. मराठवाड्यात बीड, जालना तर पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि कोकणातील सिंधूदूर्ग जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. मागील २४ तासात  (३० मे रोजी सकाळपर्यंत) धाराशिव जिल्ह्यात सर्वाधिक ४२.२ मिमी पाऊस झाला आहे. …

Read More »

धाराशिवच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांचा इशारा, १५ तारखेपर्यंत न्याय द्या नाही तर… खंडणी प्रकरणातील आरोपीलाही मकोका लावा

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख आणि परभणीतील सोमनाथ सुर्यवंशी याा दोघाच्या प्रकरणातील दोषींवर राज्य सरकारने १५ तारखेपर्यंत कारवाई करावी अन्यथा राज्य बंद झालंच म्हणून समजा असा इशारा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिला. तसेच पुढे बोलताना संतोष देशमुख यांच्या ७ मारेकऱ्यांना जो मकोका कायदा लावला आहे त्यात …

Read More »

मुख्यमंत्री शिंदे यांची स्पष्टोक्ती, मुख्यमंत्री पदा पेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा… मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण योजना ‘सुपरहिट’

मला मुख्यमंत्री पदापेक्षा भाऊ हा शब्द जिव्हाळ्याचा वाटतो. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाच्या कार्यक्रमात अतिशय उत्साहाने सहभागी झालेल्या लाडक्या बहिणींच्या डोळ्यातील आनंद पाहून मनाला अतिशय समाधान मिळत आहे. त्यांच्या डोळ्यातील हा आनंद म्हणजे या योजनेच्या यशस्वीतेची पावती आहे. ही योजना ‘सुपरहिट’ ठरल्याचे यातून स्पष्ट होत असल्याची भावना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी …

Read More »