Tag Archives: नाना पटोले

नाना पटोले यांचा सवाल, मुंबईत सेलिब्रिटी आणि गावात सरपंच सुरक्षित नाही… काय अवस्था? अभिनेता सैफ अली खानवरील हल्ल्याला धर्माच्या दृष्टीकोनातून पाहू नका

महाराष्ट्रात जंगलराज निर्माण झाले आहे हे वेगळे सांगण्याची गरज नाही. दिल्लीत आज महाराष्ट्राची चर्चा जंगलराज म्हणून होत आहे हे दुर्दैवी आहे. भाजपा सरकारने महाराष्ट्राला कलंकीत करण्याचे काम केले असून सत्तेसाठी दहशत निर्माण करण्याचे काम भाजपाने थांबवले पाहिजे. राज्यातील कायदा सुव्यवस्था पूर्णपणे ढासळलेली असून मुंबईत सेलिब्रिटी सुरक्षित नाहीत आणि गावात सरपंच …

Read More »

नाना पटोले यांची टीका, सैफ अली खानवरील हल्ला कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर महाराष्ट्रातील वाढत्या गुन्हेगारी घटना हे सरकारचे अपयश, निष्क्रीय फडणविसांनी गृहमंत्रीपद सोडावे

पद्मश्री पुरस्काराने सन्मानीत सुप्रसिद्ध चित्रपट अभिनेता सैफ अली खान यांच्यावर झालेला खुनी हल्ला महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगणारा आहे. मुंबईतील वांद्रे या वर्दळीच्या भागात अशा घटना होत असतील तर मुंबईत कोण सुरक्षित आहे? मुंबई, पुणे, बीड, परभणी, नागपूरमधील वाढत्या गुन्हेगारी घटना पाहता राज्यात गृहमंत्री आहेत का? असा प्रश्न उपस्थित …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, बीड व परभणीतील घटना सरकार पुरस्कृत… मतदान चोरीचे पाप लपवण्यासाठीच केंद्रातील भाजपा सरकारचा नवीन कायदा

राज्यातील बीड व परभणी मधल्या घटना भाजपा युती सरकार पुरस्कृत असून सत्ताधारी पक्षाचे आमदार सरकारकडूनच माहिती घेऊन ती जाहीरपणे सांगत आहेत. भाजपा युती सरकार खेळ करत मुख्य आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. सरकारने हा खेळ थांबवावा व बीड घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष …

Read More »

डॉ मनमोहन सिंग यांच्या अंत्यसंस्कारासाठी राजघाटावर जागा न देणे हे भाजपाचे गलिच्छ राजकारण डॉ मनमोहन सिंग पंतप्रधान म्हणून कमजोर नाही तर कणखर होते हे जगाने पाहिले

“पंतप्रधान म्हणून मी कमजोर होतो की कणखर हे इतिहास ठरवेल” असे डॉ. मनमोहन सिंग म्हणाले होते. आज डॉ मनमोहन सिंग यांना सर्व जग श्रद्धांजली देत असताना त्याची प्रचिती येत आहे. गरिबीतून सुरुवात करुन बुद्धीमत्तेच्या जोरावर पंतप्रधान होऊन देशाला आर्थिक दिशा व आर्थिक शिस्त लावण्याचे काम डॉ मनमोहन सिंग यांनी केले …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, मुख्यमंत्र्यांकडून परभणी व बीड हत्या प्रकरण दाबण्याचा प्रयत्न भाजपा सरकार वस्तुस्थितीच मान्य करण्यास तयार नाही, चौकशीतून उत्तर काय मिळणार हे स्पष्ट आहे.

परभणी व बीडमधील घटनांवर सर्व स्तरातून कारवाईची मागणी केली जात असताना भाजपा युती सरकार मात्र गंभीर नसल्याचे दिसत आहे. सरकार कारवाईची भाषा करत असले तरी सरकार वस्तुस्थिती मान्य करायला तयार नाही, त्यामुळे चौकशीतून उत्तर काय मिळणार हे माहित आहे, असे सांगून बीड व परभणी हत्या प्रकरण दाबण्याचा मुख्यमंत्र्यांकडून प्रयत्न होत …

Read More »

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा प्रदेश काँग्रेसकडून राज्यभर ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर सन्मान मोर्चा’चे आयोजन

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा भाजपा नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अपमान केल्याने देशभर संताप व्यक्त करण्यात येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अवमानप्रकरणी अमित शाह यांनी देशाची माफी मागावी तसेच त्यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करावी या मागणीसाठी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस …

Read More »

सुर्यवंशी कुंटुंबियाची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी म्हणाले, दलित असल्यानेच सोमनाथची हत्या मुख्यमंत्री फडणवीस खोटे बोलतायत त्यांनी पोलिसांना संदेश देण्यासाठी ते वक्तव्य

परभणीतील राज्यघटनेची विटंबना झाल्याच्या प्रकरणी दलित चळवळीतील कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र या आंदोलनात चुकीच्या पद्धतीने सोमनाथ सुर्यवंशी यांना अटक केली. त्यानंतर पाच दिवसांनी सोमनाथ सुर्यवंशी याचा मृत्यू झाल्याची माहिती पोलिसांनी त्यांच्या घरच्यांना कळवली. या पार्श्वभूमीवर लोकसभेतील काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज परभणीत सोमनाथ सुर्यवंशी यांच्या घरी जात सोमनाथच्या …

Read More »

असा असणार राहुल गांधी यांचा परभणी दौरा…. सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी उद्या सोमवारी परभणीच्या दौ-यावर आहेत. परभणी दौ-यात राहुल गांधी हे सोमनाथ सुर्यवंशी व विजय वाकोडे यांच्या कुटुंबियांना भेटणार आहेत. सकाळी १२.३० वाजता राहुल गांधी यांचे विशेष विमानाने नांदेड येथे आगमन होईल, नांदेडहून ते मोटारीने परभणीला जातील. दुपारी २.१५ ते ३.१५ वाजता ते सोमनाथ सुर्यवंशी कुटुंबियांची …

Read More »

राहुल गांधी यांचा मराठवाडा दौराः परभणी आणि बीडमधील मस्साजोगला भेट देणार सोमनाथ सुर्यवंशी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेणार

विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनाच्या काही दिवस आधी बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली. तर परभणीतील राज्यघटनेच्या विटंबनेच्या प्रकरणी झालेल्या आंदोलनात पोलिसांनी अटक केलेल्या दलित कार्यकर्ता सोमनाथ सुर्यवंशी यांचा पोलिस तुरुंगात असताना मृत्यू झाला. या दोघांच्या कुंटुबियांची भेट घेण्यासाठी खास काँग्रेसचे लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे मराठवाड्याच्या दौऱ्यावर …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, युती सरकार शेतकरी, कामगार व गरीबांचे नाही तर श्रीमंतांचे सरकार सरकारने जनतेच्या तोंडाला पाने पुसली, विदर्भ व मराठवाड्याच्या प्रश्नांवर अधिवेशनात चर्चा नाही

विदर्भ व मराठवाड्याच्या जनतेला न्याय देण्यासाठी हिवाळी अधिवेशनात चर्चा होणे अपेक्षित होते पण अशी कोणतीच चर्चा झाली नाही. मविआ सरकार असताना याच अधिवेशनात शेतकरी कर्जमाफीची घोषणा केली होती पण भाजपा युती सरकारने शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन देऊनही कर्जमाफीची घोषणा केली नाही. गडचिरोलीत विपुल खनिज संपत्ती आहे ती लाडका उद्योगपती लुटत आहे. …

Read More »