बृहन्मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुविधांचे मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून मुंबई पोलीस दल अधिक लोकाभिमुख, गतिमान, पारदर्शक होणार

पोलीस दलाच्या कामकाजात अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे निष्पक्षता, गतिमानता, पारदर्शकता आणि उत्तरदायित्व (Accountability) येण्यास मदत होणार आहे. स्मार्ट कार्ड, अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’ टॅब्लेट वितरण, मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली, सिटीझन ॲपच्या माध्यमातून पोलीस दलाची कार्यक्षमता वाढविणे, दैनंदिन कामकाज अधिक सुलभ करणे आणि नागरिकांना जलद व प्रभावी सेवा उपलब्ध करून देणे या उद्देशाने मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या वतीने विविध तंत्रज्ञानाधारित सुविधांची सुरुवात करण्यात आल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पोलिसांच्या कार्याचा गौरव केला.

सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित कार्यक्रमात मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या तंत्रज्ञानसंवर्धित विविध प्रकल्पांचे कार्यान्वयन व लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी कौशल्य, रोजगार, उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा, माहिती तंत्रज्ञान मंत्री अँड आशिष शेलार, गृह विभागाच्या अपर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर-पाटणकर, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव डॉ. श्रीकर परदेशी, पोलीस आयुक्त देवेन भारती यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले,’नशामुक्त भारत, नशामुक्त महाराष्ट्र’ अभियानांतर्गत अंमली पदार्थांविरोधातील कारवाईत गुणात्मक बदल घडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच एआयच्या मदतीने ‘तपास सारथी’ प्रणाली विकसित करण्यात येत आहे. एफआयआरपासून ते चार्जशीट आणि पुरावे व्यवस्थापनापर्यंतची संपूर्ण साखळी एआयच्या मदतीने एकाच दुव्यात आणली जात आहे. नवीन कायद्यांनुसार डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक पुरावे ग्राह्य धरले जात असल्याने ‘हॅश व्हॅल्यू’च्या आधारे ही संपूर्ण प्रक्रिया ‘एंड-टू-एंड डिजिटल’ करण्यावर भर देण्यात येत असून सीसीटीव्ही, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, ड्रोन, डेटा डिक्रिप्शन, सोशल मीडिया विश्लेषण करून गुन्हे रोखण्यासाठी मुंबई पोलीस दलाची डिजिटल पोलिसिंगच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले आहे.

दरम्यान बेलचे मुख्य व्यवस्थापक राकेश कुमार, वरिष्ठ मुख्य व्यवस्थापक अनिता के. एस., किशोर कुमार नारु, कॅप्सूल टेक्नॉलॉजीचे कार्यकारी संचालक नितीन कामत आणि अर्जुन के. आर.; स्केयुटेकचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदित्य प्रभू आणि दीपाली केळकर; तसेच मिनीटेकचे उपाध्यक्ष प्रीतम करवीर व प्रकल्प प्रमुख मयुर कुलकर्णी यांचा स्मृतिचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. तसेच अत्याधुनिक अँटी-नार्कोटिक्स व्हॅन’चा समावेश आहे. अँटी-नार्कोटिक्स सेलच्या (ANC) ताफ्यातील नवीन फॉरेन्सिक वाहनाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिरवा झेंडा दाखवून लोकार्पण केले.

लोकार्पण केलेल्या सेवा सुविधा

डिजी आयडी स्मार्ट कार्ड : मुंबई पोलीसांची अधिकृत ओळख करुन देणारे स्मार्ट ओळखपत्र.

टॅब्लेट वितरण : पोलीसांच्या विविध अधिकृत ॲप्लीकेशनचा वापर करण्यासाठी सर्व अंमलदार व अधिकारी यांना दैनंदिन कामकाज अधिक सुलभ, जलद आणि कार्यक्षम करण्यासाठी टॅब्लेटची सुविधा.

Anti-Narcotics Investigation Van : अंमली पदार्थविरोधी कारवाई आणि तपास अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी अत्याधुनिक तपास वाहन.

मुंबई पोलीस एकात्मिक कार्यप्रणाली (MPIS) : पोलीस दलातील विविध कामकाज एकाच डिजिटल प्रणालीद्वारे अधिक सुलभ, समन्वयपूर्ण आणि गतिमान करण्यासाठी एकात्मिक कार्यप्रणाली.

सिटीझन ॲप : नागरिकांना पोलीस विभागाच्या विविध सेवा व सुविधांचा डिजिटल माध्यमातून सहज लाभ घेता यावा यासाठी सिटीझन ॲपची सुविधा.

 

About Editor

Check Also

जात वैधतेच्या त्रुटी तातडीने दूर करण्याचे व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना आवाहन राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित झालेल्या विद्यार्थ्यांनी अर्जदार लॉगीनद्वारे ऑनलाइन त्रुटींची पूर्तता करावी

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये विविध व्यावसायिक पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश निश्चित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *