Tag Archives: भाजपा

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, हिरव्या व भगव्या रंगावरून काही शक्तींचा राजकीय स्वार्थ साधण्याचा डाव तिरंगा देशाची आन, बान आणि शान; महाराष्ट्रात सर्वदूर तिरंगा पोहचवण्याचा संकल्प करा

तिरंगा देशाची आन, बान आणि शान आहे, तिरंग्यासाठी अनेकांनी आपले रक्त सांडले आहे पण सध्या काही जातीवादी व धर्मांध शक्ती आपल्या स्वार्थी राजकारणासाठी हिरव्या व भगव्या रंगाचे राजकारण करून सामाजिक सलोखा बिघडवण्याचे काम करत आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांनी व संविधानवादी लोकांनी मात्र भारतासह संपूर्ण महाराष्ट्रात मनामनात, घराघरात तिरंगा पोहोचवण्याचा संकल्प करावा, …

Read More »

पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी, मागील सामंज्यस करारांवर श्वेतपत्रिका जाहीर करा दाव्होस दौऱ्यावर टीका नव्हे, तर पारदर्शकतेची मागणी

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या दाव्होस दौऱ्यावर केवळ टीका करणे योग्य नाही. जर खरोखर ३० लाख कोटी रुपयांचे सामंजस्य करार (MoU) झाले असतील, तर ही राज्यासाठी आनंदाची बाब आहे. राज्याच्या औद्योगिक प्रगतीसाठी परकीय गुंतवणूक येणे आवश्यकच आहे. मात्र, मोठे आकडे सांगून जनतेची दिशाभूल करणे योग्य नाही, कारण सत्य शेवटी बाहेर येतेच, असे मत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, चंद्रपूर काँग्रेसमध्ये कोणताही वाद नाही मुंबईत बिहार भवन तर पाटण्यात महाराष्ट्र भवन का नाही

महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस पक्षाला जनतेने राज्यात तिसऱ्या क्रमांकाचा पक्ष बनवले असून सर्वात मोठा विरोधी पक्ष बनवले आहे. आता चंद्रपूर, लातूरसह इतर शहरातील महापौरपदासाठी काम सुरु आहे. चंद्रपूरमध्ये पक्षात कोणताच वाद नाही, विधिमंडळ पक्षनेते विजय वडेट्टीवार व खासदार प्रतिभा धानोरकर यांच्यात योग्य समन्वय असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले. बुलढाणा …

Read More »

भाजपाला अखेर नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळाला, बिहारचे नितीन नबीन यांच्याकडे धुरा जे पी नड्डा यांना अखेर मिळाला पर्याय

भारतीय जनता पार्टीचे (भाजपा) कार्याध्यक्ष नितीन नबीन यांची पक्षाच्या नवीन राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय निवडणूक अधिकारी, डॉ. के. लक्ष्मण यांनी आज नवी दिल्लीतील भाजपा मुख्यालयात ‘संगठन पर्व’ कार्यक्रमात नितीन नबीन यांच्या नियुक्तीची घोषणा केली आणि त्यांना निवडणुकीचे प्रमाणपत्र सुपूर्द केले. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी …

Read More »

राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरणाचे केंद्रीय जलशक्ती मंत्र्यांसमोर सादरीकरण पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी मांडली राज्य शासनाची भूमिका

महाराष्ट्रातील नद्यांना प्रदूषणाच्या विळख्यातून मुक्त करण्यासाठी राज्य सरकारने ऐतिहासिक पुढाकार घेत ‘राज्य नदी पुनरुज्जीवन प्राधिकरण’ स्थापन करण्याची महत्त्वपूर्ण संकल्पना मांडली होती. राज्याच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग आणि पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांनी नवी दिल्ली येथे केंद्रीय जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन यासंदर्भातील प्रस्तावाचे सादरीकरण …

Read More »

नाना पटोले यांचा आरोप, नरेंद्र मोदींकडून राजमाता अहिल्याबाई होळकर व धनगर समाजाचा अपमान हिंदुच्या अस्मितेवर घाला घालणारे हे कसले हिंदुत्ववादी ?

राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी न्याय, धर्म आणि लोककल्याणासाठी राज्य केले, हिंदु धर्मासाठी पवित्र अशा काशी विश्वनाथ आणि सोमनाथ मंदिरांसह अनेक मंदिरांची पुनर्बांधणी केली. स्वतःला हिंदु धर्माचे रक्षक समजणाऱ्या नरेंद्र मोदी व योगी आदित्यनाथ यांनी मात्र आज अहिल्याबाईंनी काशीत बांधलेला पवित्र मणिकर्णिका घाट उद्धवस्थ केला, हा तमाम हिंदू तसेच धनगर समाजाचा …

Read More »

एकनाथ शिंदे यांची ग्वाही, मुंबई महानगरपालिकेत महायुतीचाच महापौर होणार जिथे युतीमध्ये लढलो तिथे महायुतीचा महापौर

शिवसेना आणि भाजप हे मुंबई महानगरपालिकेत महायुती एकत्र निवडणूक लढले असून मुंबईत महायुतीचा महापौर होईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. ठाणे, कल्याण-डोंबिवली, उल्हासनगर यासह महायुती म्हणून जिथे जिथे एकत्र निवडणूक लढलो, त्याठिकाणी महायुतीचाच महापौर बनवण्यात येईल असेही सांगितले. मुंबईमध्ये महानगरपालिकेच्या निवडणूकीमध्ये कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नसल्याने, …

Read More »

मुंबईच्या निवडणूक निकालात मुंबईचे राजकारण नेमके काय दिसले माहिती अधिकार कार्यकर्त्ये अनिल गलगलीच्या नजरेतून निवडणूकीचा निकाल

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) २०२५–२६ या सार्वत्रिक निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून, या निवडणुकीत मुंबईच्या राजकारणाचे स्पष्ट चित्र आकडेवारीतून समोर आले आहे. एकूण २२७ जागांसाठी झालेल्या या निवडणुकीत विविध राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षांनी आपली ताकद आजमावली. या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी (भाजपा) सर्वाधिक प्रभावी ठरली. भाजपाने ८९ जागांवर विजय मिळवत एकूण …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, गझनी प्रमाणेच नरेंद्र मोदींनी मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला अहिल्यादेवींच्या स्मृती पुसण्याचे भाजपा व मोंदींकडून घोर पाप, धनगर समाजाचा अपमान करणाऱ्या मोदींनी जनतेची जाहीर माफी मागावी

सोमनाथाचे मंदिर गजनीच्या मेहमुदने उद्धवस्थ केले त्याचपद्धतीने भारतीय जनता पक्ष व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवींनी बांधलेल्या मणिकर्णिका घाटावर बुलडोझर चालवला आहे. भाजपा व नरेंद्र मोदी यांना अहिल्यादेवींच्या स्मृती पुसून टाकायच्या आहेत म्हणूनच अत्यंत निर्दयी व विकृतपणे घाट व घाटावरील मूर्ती नष्ट करण्यात आल्या आहेत, असा घणाघाती हल्लाबोल …

Read More »

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम २०२६ साठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोसकडे रवाना ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’द्वारे जागतिक पातळीवर भारताच्या विकासगाथेचा गजर

महाराष्ट्राला १ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे नेण्याचा वेग अधिक वाढवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम (WEF) २०२६ मध्ये सहभागी होण्यासाठी स्वित्झर्लंडमधील दावोसकडे रवाना झाले आहेत. या परिषदेसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमवेत उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत तसेच प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. जागतिक व्यासपीठावर भारताचे विकास इंजिन म्हणून ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ …

Read More »