Tag Archives: भाजपा

उद्धव ठाकरे म्हणाले, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पीएम केअर फंडातून पैसे आणा शेतकऱ्यांसाठी सरकारकडे ३ मोठ्या मागण्या

मराठवाड्यातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी शिवसेना उबाठाचे प्रमुख तथा  माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (२५ सप्टेंबर) धाराशिवच्या  दौऱ्यावर गेलो होते. धाराशिवमधील गावांना भेट देऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. या दौऱ्यादरम्यान अनेक शेतकरी उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन आपलं गाऱ्हाणं मांडले. तसेच आम्हाला सरकारकडून मदत पाहिजे, अशी मागणी उद्धव ठाकरे …

Read More »

वर्षा गायकवाड यांचे जुहू गल्लीतील भूखंड घोटाळ्यावरील चर्चेचे शेलारांना आव्हान आशिष शेलारांनी वेळ व ठिकाण सांगावे, सरकारचे पाप लपविण्यासाठी बिनबुडाचे आरोप करू नका

जुहू गल्ली येथील बीएमसीच्या मालकीचा शेकडो कोटींचा आरक्षित भूखंड देवाभाऊ सरकारने, शासन आणि बीएमसी अधिकाऱ्यांना हाताशी धरून, आपल्या लाडक्या बिल्डर मित्राला भेट चढवल्याचा महाघोटाळा मुंबई काँग्रेसने उघडकीस आणल्या नंतर भाजपचे धाबे दणाणले आहेत. भाजपा नेते आशिष शेलार आणि अमित साटम यांनी मूळ मुद्द्यापासून लक्ष हटवण्यासाठी बिनबुडाचे व अर्थहीन आरोप केले …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, आमदार फोडण्यासाठी पैसै पण शेतकऱ्यांसाठी नाही केंद्र सरकारकडून पैसे विशेष पॅकेज आणा

राज्यातील परिस्थिती अतिवृष्टी व पुरामुळे अत्यंत विदारक झाली आहे, खरीप हंगाम पुरता वाया गेला आहे. शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान झाले आहे परंतु प्रशासनाचा एकही अधिकारी पाहणी करण्यासाठी फिरकला नाही. दसरा, दिवाळी सण जवळ आले आहेत, मुख्यमंत्री फक्त आकडेवारी फेकत आहेत, पण ठोस निर्णय काही घेत नाहीत. ओला दुष्काळ आहे हे स्पष्ट दिसत असतानाही सरकार त्याकडे डोळेझाक करत …

Read More »

सोनम वांगचूक यांचा इशारा, अटक केल्यास जास्त समस्या निर्माण होऊ शकतात समाजवादी पार्टीचे अखिलेश यादव यांची टीका

बुधवारी (२४ सप्टेंबर २०२५) चीनच्या सीमेवरील लडाख प्रदेशाला राज्याचा दर्जा आणि आदिवासी दर्जा मिळावा यासाठी सुरू असलेल्या निदर्शनांमध्ये हिंसक वळण लागले. केंद्रीय गृह मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे की, एका बेशिस्त जमावाने सार्वजनिक मालमत्तेची नासधूस केली आणि पोलिसांवर हल्ला केला, ज्यामध्ये सुमारे ३० सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. पोलिसांना गोळीबार करावा …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, राज्यात ओला दुष्काळ जाहीर करुन सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या शेतकरी मोठ्या संकटात असताना सरकारच्या फक्त कोरड्या गप्पा; पंचनामे व सर्वे सोडा आणि तात्काळ मदत करा

राज्यात यावर्षी सरसरीपेक्षा दुप्पट, तिप्पट पाऊस पडला आहे. ३६ जिल्हे व ३५८ तालुक्यापैकी ३० जिल्हे व जवळपास ३०० तालुके अतिवृष्टी आणि पूरग्रस्त आहेत. राज्यभरात जवळपास १४३ लाख हेक्टरवरील शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. पाऊस सातत्याने पडत असून शेतकरी हवालदिल झाला आहे परंतु राज्यातील महायुती सरकारला शेतकऱ्यांची चिंता नाही, पालकमंत्र्याने पाहणी सुद्धा केली …

Read More »

सुनिल तटकरे यांची स्पष्टोक्ती, आमचे नेते फडणवीस आणि अजित पवार मुंडेंबाबत निर्णय घेतील धनंजय मुंडे यांच्या विनंतीचे अर्थ वेगवेगळे निघतात

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड यास अटक करण्यात आली. तसेच या अटकेनंतर देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून धनंजय मुंडे हे सुद्धा संशयाच्या भोवऱ्यात आले. त्यामुळे धनंजय मुंडे यांना आपल्या मंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. या सगळ्या घडामोडीत प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या कार्यक्रमात धनंजय मुंडे यांनी …

Read More »

एकनाथ शिंदे म्हणाले, जीएसटी दरातील बदल देशात महासत्तेची घटस्थापना नवीन जीएसटी बदल म्हणजे गृहस्थी 'सर्वनाश' नव्हे तर ग्रोथ सक्सेस आणि 'गृहस्थी सेव्हिंग टॅक्स', राहुल गांधींच्या टीकेला शिंदेचे प्रत्युत्तर

देशातील जीएसटी दरांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेले बदल म्हणजे सर्वसामान्य माणूस, महिला भगिनी आणि छोट्या दुकानदारांना मोठा दिलासा देणारे निर्णय असून मोदींचा हा खरा मास्टर स्ट्रोक असल्याचे मत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले आहे. जीएसटी दरांमध्ये केलेल्या बदलामुळे जीवनावश्यक वस्तूंच्या दरामध्ये मोठे बदल होणार असून त्यामुळे लोकांच्या बचतीत …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, जीएसटी…पंतप्रधानांनी ८ वर्षातील लुटीची जबाबदारी घ्यावी वाढीव दराने देशाची लुट केल्याचा केला आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात पुन्हा एकदा आपल्या सवयीप्रमाणे जीएसटी GST दर कपातीचे श्रेय घेण्याचा प्रयत्न केला. २०१७ मध्ये मोदीजींनीच स्वतः प्रचंड वाढीव दराने जीएसटी GST आणून देशातील उद्योग, व्यापारी आणि सामान्य नागरिक यांना त्रस्त केले, त्यांची प्रचंड आर्थिक लूट केली. तेच मोदीजी आज जीएसटी GST …

Read More »

जीएसटी, वाढ रोखणारा कर, काँग्रेसची टीका दिर्घकालीन समस्या सोडविण्यात कमी पडले

काँग्रेसने रविवारी सरकारच्या ताज्या जीएसटी सुधारणांवर टीका केली आणि वस्तू आणि सेवा कराला “वृद्धी-दमन कर” असे म्हटले आणि अलीकडील सुधारणा दीर्घकालीन समस्यांचे निराकरण करण्यात कमी पडल्या. नवरात्रीपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला संबोधित केल्यानंतर, पुढील पिढीतील कर सुधारणांचा शुभारंभ केल्यानंतर आणि “जीएसटी बचत उत्सव” (बचत उत्सव) सुरू होण्याची घोषणा केल्यानंतर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी, दसऱ्याला सीमोल्लंघन करत मोहन भागवतांनी आरएसएस बरखास्त करावा रामराज्याची भाषा करता तर अग्निपरिक्षेला का घाबरता?

आरएसएस अर्थात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने १०० वर्षात देशाला नरेंद्र मोदी व देवेंद्र फडणवीसांसारखी भ्रष्ट माणसे दिली. जातीवाद व भांडवलशाहीचा विळखा आणखी घट्ट झाला आहे, ही मनुवादाची देण आहे. आता १०० वर्ष होत असताना पंचागानेही चांगला मुहूर्त दिला असून २ ऑक्टोबर रोजी दसरा, गांधी जयंती व रा. स्व. संघाची शंभरी असा …

Read More »