नुकतेच मुंबई महापालिका निवडणूकीच्या अनुषंगाने रिपाईचे अध्यक्ष तथा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुतीबाबत जागा वाटपाच्या संदर्भात नाराजी व्यक्त करत भाजपाकडे किमान १६ जागा मागितल्या. परंतु भाजपाचे विधान परिषदेतील गटनेते प्रविण दरेकर यांनी रामदास आठवले यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. मात्र आज रामदास आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्यावतीने ३९ उमेदवारांची यादी जाहिर केली. त्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्या नाराजीची तातडीने दखल घेत प्रविण दरेकर यांना आठवलेंची भेट घेण्याचे आदेश दिले.
रामदास आठवले यांनी जाहिर नाराजी व्यक्त केल्यानंतरही भाजपाकडून फारसा प्रतिसाद दिला नव्हता. त्यामुळे उमेदवारांची यादी थेट जाहिर करताच मुख्यमंत्री फडणवीस यांनी रामदास आठवले यांच्या नाराजी दख घेतली. त्यानंतर भाजपाचे आमदार प्रविण दरेकर यांना रामदास आठवले यांची नाराजी दूर करण्याचे आदेश दिले. त्यानुसार प्रविण दरेकर यांनाही रामदास आठवले यांची भेट घेऊन त्यांची नाराजी दूर करणार असल्याचे जाहिर केले. तसेच यासंदर्भात लवकरच आठवले यांची भेट घेणार असल्याचे सांगितले.
दरम्यान, रामदास आठवले यांनी कार्यकर्त्यांचा अपमान सहन करणार नसल्याचे मत व्यक्त करत रिपाईचे उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याचे जाहिर केले.
परंतु रामदास आठवले यांनी महायुतीकडे १६ जागा मागितल्या होत्या. परंतु आता त्यांनी ३९ उमेदवारांची यादी जाहिर केली आहे. त्यामुळे प्रविण दरेकर यांच्या भेटीनंतर रामदास आठवले त्यांच्या ३९ उमेदवारांच्या यादीवर कायम राहणार की १६ जागांवर तडजोड झाल्यानंतर माघार घेणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रामदास आठवले यांच्या पक्षाने जाहिर केलेल्या उमेदवारांची यादी-

Marathi e-Batmya