राहुल गांधी यांची स्पष्टोक्ती, भाजपा आणि आरएसएसला काँग्रेसचे पराभूत करू शकतो गुजरात विरोधकांसाठी महत्वाचे राज्य

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी बुधवारी (१६ एप्रिल २०२५) म्हटले की, गुजरातमध्ये पक्षाचे कार्यकर्ते निराश दिसत असले तरी, केवळ त्यांचा पक्षच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (आरएसएस) आणि भाजपाला पराभूत करू शकतो.

एका आठवड्यात दुसऱ्यांदा गुजरात दौऱ्यावर असताना, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पश्चिमेकडील राज्यात जवळजवळ ३० वर्षांपासून सत्तेत असलेल्या आरएसएस आणि भारतीय जनता पार्टी (भाजपा) यांना पराभूत करण्याचे काम पूर्ण करण्याचा निर्धार राहुल गांधी यांनी यावेळी व्यक्त केला.

राहुल गांधी पुढे बोलताना गुजरातचे वर्णन करत म्हणाले की, जिथे काँग्रेस एकेकाळी एक शक्तिशाली राजकीय शक्ती होती, ते विरोधी पक्षासाठी सर्वात महत्वाचे राज्य आहे.

२०२७ च्या अखेरीस गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत. गुजरातमध्ये संघटनात्मक पुनर्बांधणीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून जिल्हा युनिट्स मजबूत करण्याच्या पायलट प्रोजेक्टचा शुभारंभ केल्यानंतर राहुल गांधी यांनी अरवल्ली जिल्ह्यातील मोडासा शहरात बूथ-स्तरीय काँग्रेस कार्यकर्त्यांना संबोधित करत होते.

यावेळी राहुल गांधी म्हणाले की, “गुजरात हे काँग्रेस पक्षासाठी सर्वात महत्त्वाचे राज्य आहे. आम्ही गुजरातमध्ये निराश दिसत आहोत, परंतु आम्ही त्यांना [भाजपाला] राज्यात पराभूत करू. मी तुम्हाला सांगण्यासाठी आलो आहे की ते कठीण नाही. आम्ही हे काम निश्चितपणे पूर्ण करू. फक्त काँग्रेस पक्षच आरएसएस आणि भाजपाला पराभूत करू शकतो, असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना राहुल गांधी म्हणाले की, अंबानी आणि अदानी हे देशातील दोन उद्योगपती जे पंतप्रधानांचे मित्र आहेत, या दोघांना जे काही वाटेल ते मिळते आणि देशातील सर्व गोष्टी उपलब्ध होत असतात. अदानीला वाटले मुंबईचा एअरपोर्ट पाहिजे होता, त्यांनी तो दुसऱ्याकडे होता. त्यावेळी सीबीआयची केस कोणाच्या मागे कशी लागली आणि मुंबईचा एअर पोर्ट अदानीला कसा मिळाला असेही यावेळी सांगितले.

राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेस पक्षाची सुरुवातही गुजरातमधूनच झालेली. काँग्रेसला महात्मा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल हे गुजरातनेच काँग्रेसला दिले. त्यामुळे काँग्रेससाठी गुजरात हे राज्य महत्वाचे असल्याचेही यावेळी सांगितले.

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, १ जुलैपासून वाहनांना एचएसआरपी बसविणे अनिवार्य नियमभंग केल्यास १ हजार रुपयांचा दंड

राज्यातील वाहन सुरक्षेला अधिक बळकटी देण्याबरोबरच वाहनांची ओळख अधिक सुरक्षित आणि पारदर्शक करण्याच्या उद्देशाने शासनाने १ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *