लोकसभा निवडणूकीत भाजपाचा महाराष्ट्रात दारुण पराभव झाल्यानंतर विधानसभा निवडणूकीत मात्र भाजपाप्रणित महायुतीला भरघोस जागा मिळाल्या. त्यानंतर त्यानंतर मुख्यमंत्री पदावर देवेंद्र फडणवीस विराजमान झाले. त्यानंतर शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची किमान तीन ते चार वेळा विधान भवनात भेट झाली. त्यानंतर शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांचीही मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट झाली. त्यावर चर्चाही चांगल्याच रंगल्या. मात्र अंतिमत काहीही निर्णय झाला नाही. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते तथा मंत्री चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना उबाठा चिमटा काढत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला सत्तेत यायचं आहे पण त्यांना घेत नाही असे सांगितले. त्यावर खोचक शब्दात शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी प्रतिक्रिया अमित शाह यांचे पाय चाटून तरी महाराष्ट्रात सत्तेत यायचं नाही असे सांगत चंद्रकांत पाटील यांच्या चिमट्यावर प्रतिक्रिया दिली.
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, अमित शाह याचं पाचशे पानी स्वतः तयार केलेलं पुस्तक आहे. ते शिवरांयांवर आहे. त्यांनी संदर्भ गोळा केलेले आहेत. पण ते पुस्तक त्यांच आहे. येत्या काही दिवसात ते पुण्यात प्रकाशित करायचं की दिल्लीत करायचं इतकाच मुद्दा राहिला आहे. त्या पुस्तकाचं वाचन केल्यावर संजय राऊत यांनाही चक्कर येईल, इतका अभ्यास अमित शाह यांनी केला आहे. अशा अमित भाई बद्दल केवळ तुम्ही सत्तेत नाही, पण तुम्हाला यायचं आहे, पण घेत नाहीत. म्हणून किती दुस्वास करणार असा सवालही यावेळी केला.
यासंदर्भात संजय राऊत यांना विचारले असता त्यांन त्यांच्या खास शैलीत उत्तर देत म्हणाले की, चंद्रकांत पाटील यांनी अजिबात चिंता करू नये. आमच्याकडे उमेदवार आहेत. त्यांनी अमेरिकेतील तुलसी गॅबॉर्ड यांनी ईव्हीएमबाबत भाष्य केलं आहे. तुलसी गॅबॉर्ड या अमेरिकेन इंटेलिजन्सच्या प्रमुख आहेत, त्यांनी सांगितलय की, ईव्हीएम हॅक होऊ शकतं. तसेच मोदींच्या मैत्रिणीने सांगितलय की महाराष्ट्रात कसा विजय मिळविला आहे. त्याच्यावर चिंतन करा, आमच्या पक्षाचं काय करायचं त्यासाठी आम्ही समर्थ आहोत. तसेच सत्तेसाठी आम्हाला अमित शाह यांचे पाय चाटायची गरज नसल्याचे खोचक शब्दात प्रत्युत्तर दिले.
पुढे बोलताना संजय राऊत म्हणाले की, अमित शाह यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केला. औरंगजेबाच्या कबरीला समाधीचा दर्जा दिला, त्यांच्याबरोबर आम्हाला सत्ता नको, संजय राऊत कधी सत्तेत गेले नाहीत. उद्धव ठाकरे यांनाही सत्तेत जायचं नाही. आम्ही इतके लाचार आणि नीच नाही. चंद्रकांत पाटील यांनी स्वतःची आणि पक्षाची चिंता करावी, लांड्या लबाड्या करून आपण सत्तेवर आला आहात. ती सत्ता तुम्हाला लखलाभ होतो, भ्रष्ट आणि चोर मंडळी तुमच्यासोबत आहेत तुम्ही त्यांनाच सांभाळत बसा असे खोचक उत्तर ही यावेळी दिले.
Marathi e-Batmya