Tag Archives: रुग्णालय

रुग्णालयांच्या उपचारांचे दरपत्रक ठळकपणे प्रदर्शित करण्याचे आवाहन वैद्यकीय व आयुष व्हिसावर भारतात येणाऱ्या परदेशी रुग्णांसाठीही पॅकेजचे शुल्क पारदर्शक ठेवण्याचे आवाहन

रुग्णालये आणि वैद्यकीय संस्थांमध्ये उपलब्ध उपचार, सेवा व सुविधांचे शुल्क ठळकपणे प्रदर्शित करण्याची व्यवस्था सुनिश्चित करावी, असे आवाहन केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केले आहे. यासंदर्भात केंद्रीय आरोग्य सचिव पुण्या सलीला श्रीवास्तव यांनी सर्व राज्यांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून संबंधित नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले आहेत. रुग्णांना …

Read More »

रुग्णालयाच्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यावर शिंदे गटाच्या शिवसैनिकांचा पुन्हा एकदा हल्लाबोल दही हंडीच्या दिवशी जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरमधील रुग्णालयातील घटना

जखमी गोविंदाला डिस्चार्ज देण्यावरून पालघरच्या रुग्णालयात रात्री उशिरा शिवसेना (शिंदे गट) कार्यकर्त्यांचा डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी संघर्ष अर्थात मारहाण केली. ज्यामुळे वाद विकोपाला गेला. रिलीफ हॉस्पिटलमधील सीसीटीव्ही फुटेजमध्ये शिवसेना पालघर शहर प्रमुख राहुल घरात एका रुग्णालय कर्मचाऱ्याला मारहाण करताना दिसत आहेत, तर एक महिला कर्मचारी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत असताना तिला …

Read More »

वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयाला स्वायतत्ता देण्यासाठी समिती स्थापन माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांच्या नेतृत्वाखाली समिती

मुंबईतील ग्रॅन्ट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालय तसेच नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या संस्थांना स्वायत्तता देण्यासंदर्भात सविस्तर धोरणात्मक आराखडा तयार करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली. या समितीच्या अध्यक्षपदी राज्याचे माजी मुख्य सचिव जयंत कुमार बांठिया यांची नियुक्ती …

Read More »

आता शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात इन्फल्यूएंझाग्रस्तांसाठी कक्ष

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृष्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व …

Read More »

महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारणार सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. तानाजी सावंत यांची घोषणा

रायगड जिल्हा मोठा असून डोंगराळ प्रदेशाचा आहे. या जिल्ह्यात नागरिकांना सहज आरोग्य सुविधा उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जिल्ह्यात आरोग्य सुविधा वाढविण्याच्या अनुषंगाने महाड येथे २०० खाटांचे रूग्णालय उभारण्यासाठी कार्यवाही करण्याचे निर्देश सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रा. डॉ. तानाजी सावंत यांनी दिले. मंत्रालयीन दालनात महाड येथे रूग्णालय …

Read More »