आता शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात इन्फल्यूएंझाग्रस्तांसाठी कक्ष

राज्यात इन्फल्यूएंझाबाबत राज्याच्या आरोग्य विभागाच्यावतीने विविध प्रतिबंधात्मक व उपचारात्मक उपाययोजना राबविण्यात येत आहे. इन्फल्यूएंझाबाबत नियमित रूग्ण सर्वेक्षण, सहवासितांच्या सर्वेक्षणाच्या सूचना देण्यात आल्या आहेत. फ्ल्यू सदृष्य रूग्णांवर वर्गीकरणानुसार विनाविलंब उपचार करण्यात येत आहे. तसेच राज्यातील शासकीय रूग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयांच्या रूग्णालयात विलगीकरण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे.

रूग्णालयांमध्ये आवश्यक औषधोपचार व साधनसामग्रीचा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. राज्यातील सर्व शासकीय व खासगी डॉक्टरांचे क्लिनीकल मॅनेजमेंटबाबत राज्यस्तरावरून पुर्नप्रशिक्षण ऑगस्ट २०२२ मध्ये घेण्यात आले आहे. राज्यात २०२३ मध्ये २८ नोव्हेंबरपर्यंत एकूण संशयीत रूग्ण १५ लाख ९७ हजार २३४ होते, तर बाधीत इन्फ्लुएंझा ए (एच 1 एन 1 + एच 3 एन 2) ३२२२ रूग्ण आहेत. सध्या रूग्णालयात १४ रूग्ण दाखल आहेत. तर ८ रूग्णांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती सहसंचालक, आरोग्य सेवा डॉ. प्रतापसिंह सारणीकरण यांनी दिली.

About Editor

Check Also

प्रकाश आबिटकर यांचे निर्देश, औषध गुणवत्ता तपासणीसाठी उपकरणांचा प्रभावी वापर करा औषधांच्या गुणवत्तेशी तडजोड नको

राज्यातील नागरिकांना गुणवत्तापूर्ण औषधे उपलब्ध करून देताना औषधांच्या गुणवत्तेशी कोणत्याही प्रकारची तडजोड करू नये. सार्वजनिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *