वंचित’च्या उमेदवारांची पहिली यादी प्रकाश आंबेडकर यांच्याकडून जाहिर जाहीरनामाही लवकरच प्रसिद्ध , युतीचे अधिकृत नावही जाहिर करणार

विधानसभा निवडणूकीची प्रक्रिया सुरु होण्याला आता अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले असताना राज्यातील प्रमुख राजकिय पक्षांकडून आघाडी, जागा वाटप आदी प्रश्नांमध्ये व्यस्त आहेत. तसेच एकाही राजकिय पक्षाने किंवा महायुती-आघाडीने अधिकृत जागावाटपाची चर्चा जाहिर केलेली नसताना वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मात्र विधानसभा निवडणूकीचे उमेदवार जाहिर करण्यात आघाडी घेतली आहे. तसेच उमेदवारांची नावे जाहिर करत आदीवासी समाजाबरोबर असलेल्या आघाडीचे नावही जाहिर करणार असल्याची माहितीही वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिली.

वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आयोजित पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर बोलत होते. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी आज मुंबई येथ विधानसभा निवडणुकीतील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. पहिल्या यादीत ११ जणांची घोषणा करण्यात आली आहे.

यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आमच्या पवित्र विचारधारेशी खंबीर राहून, खरे प्रतिनिधित्व आणि राजकीय सत्ता मिळवण्याचा आणि काही कुटुंबाचे वर्चस्व मोडून आम्ही वंचित बहुजन समूहांना प्रतिनिधित्व दिले आहे. रावेर मतदारसंघासाठी तृतीयपंथी कार्यकर्त्या शमिभा पाटील यांना उमेदवारी देण्यात आली असून, पारधी समजातील किसन चव्हाण यांना शेवगावमधून उमेदवारी देण्यात आली असल्याचे सांगितले.

ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, वंचितचे सहयोगी पक्ष भारत आदिवासी पार्टी आणि गोंडवाना गणतंत्र पार्टी या पक्षांच्या दोन उमेदवारांची घोषणा केली. सुनील गायकवाड (भारत आदिवासी पार्टी) हे चोपडा मतदार संघातून आणि हरीश उईके (गोंडवाना गणतंत्र पार्टी) हे रामटेकमधून उमेदवार असतील असेही यावेळी सांगितले.

पुढे बोलताना प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, दोन बौद्धांव्यतिरिक्त, धीवर, लोहार, वडार, मुस्लिम या वंचित जाती समूहांना प्रतिनिधी देखील पहिल्या यादीत दिले आहे. येत्या काही दिवसांत दुसरी यादी जाहीर करण्यात येणार असून आणखी काही पक्ष लवकरच आमच्या आघाडीत सामील होतील, असेही यावेळी सांगितले.

ॲड. प्रकाश आंबेडकर पुढे बोलताना म्हणाले की, आदिवासी मतदार संघातूनच आदिवासींनी लढले पाहिजे. ही मानसिकता इथल्या राजकारण्यांनी केली होती. ती आम्ही या निवडणुकीत मोडत आहोत. आदिवासी समाजातील उमेदवार हा सर्वसाधारण जागेवर सुद्धा लढू शकतो यासाठी आम्ही सुरुवात केली आहे. संयुक्त जाहीरनामा आणि वंचित बहुजन आघाडीचा जाहीरनामा निवडणुकीची सूचना येण्याआधीच आम्ही प्रसिद्ध करणार असल्याचेही यावेळी सांगितले.

वंचितचे ते ११ उमेदवार आणि त्यांचे मतदारसंघ खालील प्रमाणेः-
रावेर मतदासंघातून शमिभा पाटील (तृतीय पंथी/ लेवा पाटील), सिंदखेड राजा मतदार संघातून सविता मुंढे (वंजारी), वाशिम मतदासंघातून मेघा किरण डोंगरे (बौद्ध), धामणगाव रेल्वे मतदासंघातून नीलेश विश्वकर्मा (लोहार), नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघातून विनय भांगे (बौद्ध), साकोली मतदासंघातून डॉ. अविनाश नन्हे (धीवर), नांदेड दक्षिण मतदासंघातून फारूक अहमद (मुस्लीम), लोहा मतदारसंघातून शिवा नारांगले (लिंगायत), औरंगाबाद पूर्व मतदासंघातून विकास दांडगे (मराठा), शेवगाव मतदासंघातून किसन चव्हाण (पारधी), खानापूर संग्राम माने ( वडार) यांना पहिल्या यादीत स्थान मिळाले आहे.

कोणालाही पाठिंबा देणार नाही
शेवटी बोलताना प्रकाश आंबेडकर म्हणाले की, मागच्या वेळी काँग्रेसमधील काही उमेदवारांनी पाठिंबा मागितला. आम्ही पाठिंबा दिला. आता या निवडणुकीत कोणीही पाठिंबा मागितला तर आम्ही देणार नसल्याचे यावेळी स्पष्ट केले.

 

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची माहिती, काँग्रेसच्या नगरपालिका, नगरपंचायत उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण शिबिर पहिल्या टप्प्यात कोकण विभागातील तीन दिवसीय निवासी शिबिर २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च रोजी चिपळूणमध्ये

राज्यात नुकत्याच पार पडलेल्या नगरपालिका व नगर पंचायत निवडणुकांमधील काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांसाठी निवासी प्रशिक्षण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *