Tag Archives: anil deshmukh

मुख्यमंत्री कार्यालय म्हणते, परमबीर सिंग नावाचे पत्र मिळाले पण त्यावर सही नाही ई मेलवरून प्राप्त झाल्याने त्याची सत्यता तपासणार

मुंबई: प्रतिनिधी आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांच्या सही नसलेले पत्र समाजमाध्यमात व्हायरल झाल्याने त्यावर एकच राजकिय गदारोळ उडाला. या पत्रावर सही नसल्याने आणि अधिकाऱ्यांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून सदरचे पत्र मुख्यमंत्री कार्यालयास प्राप्त झाल्याचा खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाने करत सदर पत्राची सत्यता तपासणार असल्याचे रात्री उशीराने प्रसारमाध्यमांना सांगितले. गृहरक्षक दलाचे कमांडट जनरल …

Read More »

देशमुखांवरील आरोपाची केंद्रीय यंत्रणेमार्फत किंवा कोर्ट मॉनिटर तपास करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची मागणी

नागपूर : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि विद्यमान महासंचालक, होमगार्ड परमबीर सिंग यांनी लिहिलेले हे पत्र केवळ खळबळजनक नाही, तर अतिशय धक्कादायक आहे. एखादा विद्यमान अधिकारी थेट राज्याच्या गृहमंत्र्यांबद्दल अशाप्रकारचे पत्र लिहिण्याची ही महाराष्ट्राच्या इतिहासातील पहिलीच वेळ आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाचा केंद्रीय यंत्रणांमार्फत वा न्यायालयाच्या देखरेखीखाली तपास व्हावा …

Read More »

गृहमंत्री देशमुख म्हणाले, परमबीर सिंगाचा आरोप स्वत:चा बचावासाठी आरोप खोटे असल्याचा दावा

मुंबई: प्रतिनिधी महिन्याला १०० कोटी रूपये वसुली करून द्यावे आणि खासदार मोहन डेलकर मृत्यूप्रकरणाचा तपासावरून आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोपामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. परंतु परमबीर सिंग यांनी केलेले आरोप हे स्वत:च्या बचावासाठी करण्यात आलेले असून ते आरोप खोटे असल्याचा खुलासा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. विशेष …

Read More »

गृहमंत्री देशमुखांनी १०० कोटींचे टार्गेट दिले, हवे तर वाझेचा फोन तपासा आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचे पत्र व्हायरल सत्येतेबाबत शंका

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडी सरकार आधीच पोलिस अधिकारी सचिन वाझे आणि मनसुख हिरे मृत्युप्रकरणावरून आधीच अडचणीत आले असतानाच आयपीएस अधिकारी तथा तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांचे एक पत्र व्हायरल झाले असून या पत्रात त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महिन्याला बीअरबार आणि हुक्का पार्लरवाल्यांकडून १०० कोटी रूपयांच्या खंडणी …

Read More »

केवळ पोलीस आयुक्तांची बदली नको, गृहमंत्र्यांचा राजीनामा घ्या भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

मुंबईः प्रतिनिधी सचिन वाझे यांची पाठराखण करणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारने आता मुंबई पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करून मोठी कारवाई केल्याचा आव आणला असला तरी ही कारवाई म्हणजे वरवरची मलमपट्टी आहे. राजकीय आशिर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचे चित्र निर्माण झाले असून राज्यातील कायदा …

Read More »

मुंबईचे नवे पोलिस आयुक्त हेमंत नागराळे तर परमबीर सिंग गृहरक्षक प्रमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांची ट्विटरद्वारे माहिती

मुंबईः विशेष प्रतिनिधी अॅटालिया बंगल्याच्या बाहेर स्फोटकांनी भरलेल्या गाडी आढळून आल्याप्रकरणी मुंबई पोलिस दलातील सहाय्यक पोलिस निरिक्षक सचिन वाझे यांना एनआयएने अटक करण्यात आल्यानंतर मुंबई पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांची उचलबांगडी होणार असल्याचे संकेत देण्यात येत होते. अखेर आज मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबरोबर गृहमंत्री अनिल देशमुख यांची बैठक झाल्यानंतर मुंबईच्या …

Read More »

मुनगुंटीवारांचा चिमटा तर गृहमंत्री देशमुखांकडून गजल गाऊन दुःखावर फुंकर विधानसभेतील चिमट्यांनी एकच हास्यकल्लोळ

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्य विधिमंडळाचे अधिवेशन सुरु असून मागील दोन दिवसांपासून सतत मनसुख हिरेन प्रकरणावरून विधानसभेत भाजपाने आक्रमक पवित्रा स्विकारला. त्यावरून मंत्रिमंडळात गृहमंत्री पद आपल्यालाच का मिळाले? दुसरे खाते का मिळाले नाही? असा प्रश्न कदाचित गृहमंत्री अनिल देशमुख यांना पडला असेल. तसेच मागील दोन दिवस सुरु असलेल्या गदारोळावरून तुमचे दुःख …

Read More »

गृहमंत्री देशमुखांच्या विरोधात फडणवीसांनी मांडला विशेषाधिकार हक्कभंग अन्वय नाईकप्रकरणी गृहमंत्र्यांची दिशाभूल करणारी माहिती

मुंबईः प्रतिनिधी आर्किटेक्ट अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी विधानसभेत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वक्तव्य करत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केस दाबून ठेवल्याचा आरोप केला. तसेच याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला असतानाही त्याबाबतची माहिती सभागृहास चुकीच्या पध्दतीने दिल्याने गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात आपण विशेषाधिकार हक्कभंग मांडत असल्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र …

Read More »

भाजपाच्या भूमिकेत बदलः हिरेनप्रकरणी वाझेंचा राजीनामा नव्हे तर बदली विधान परिषदेत गृहमंत्री देशमुख तर विधानसभेत अनिल परब यांची माहिती

मुंबई : विशेष प्रतिनिधी मनसुख हिरेन हत्याप्रकरणी वरिष्ठ पोलिस अधिकारी सचिन वाझे यांची भूमिका संशयास्पद असल्याच्या मागणीवरून त्यांच्यावर 201 अन्वये खाली गुन्हा दाखल करून अटक करावी आणि पदावरून तात्काळ निलंबित करावे या मागणीवरून विधानसभेत देवेंद्र फडणवीस तर विधान परिषदेत प्रविण दरेकर यांनी काल मंगळवारी मागणी लावून धरली. तसेच विधानसभेचे कामकाज …

Read More »

अखेर भाजपाने निर्माण केली नवी सशक्त विरोधी पक्षाची प्रतिमा आव्हान महाविकास आघाडीसमोरील कि फक्त शिवसेनेसमोरील

मुंबई : विशेष प्रतिनिधी मागील पाच वर्षात राज्यात भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार असताना राज्यात आणि केंद्रात प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस सह राष्ट्रवादी काँग्रेसचा आवाज क्षीण राहीला. त्यामुळे अनेकवेळा विरोधक कुठे आहेत? प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जात स्व. ग.प्र. प्रधान, स्व.एस.एम.जोशी यांच्यासह स्व.गोपीनाथ मुंडे, छगन भुजबळ सारख्या विरोधी पक्षनेत्यांची आठवण काढली …

Read More »