मुंबई-चंद्रपूर: प्रतिनिधी राज्यातील भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, दोन्ही सभागृहातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि प्रविण दरेकर यांच्याबरोबरच माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना पुरविण्यात आलेल्या सुरक्षेत कपात करण्यात आली. या कपातीच्या पार्श्वभूमीवर मुनगंटीवार यांनी राज्य सरकारला धन्यवाद देत नक्षलवाद संपलेला दिसतोय असा उपरोधिक टोला लगावला. विशेष म्हणजे भाजपाकडून सुरक्षा कपातीच्या निर्णयावर …
Read More »“माझीही सुरक्षा काढून घ्या”, आमचे नेते पवारसाहेबांचा मला फोन गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील भाजपा (bjp) नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली म्हणून एकाबाजूला राज्य सरकारवर टीकेची झोड उठविली असताना दुसऱ्याबाजूला राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad pawar) यांनी मला वैयक्तिक फोन करून माझी सुरक्षा काढून घ्या असे सांगितले. तसेच यासंदर्भात मला पत्रही लिहिल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी …
Read More »कायद्याच्या सशक्तीकरणासाठी महिला, वकील संघटनासोबत करणार चर्चा गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी महिला व बालकांवर होणाऱ्या अत्याचारांच्या तक्रारींवर प्रभावी आणि गतिमान पद्धतीने कार्यवाही व्हावी या दृष्टीने प्रस्तावीत शक्ती कायद्याची चौकट अधिक बळकट करण्यासाठी राज्यातील निमंत्रित महिला तसेच वकील संघटनांसोबत शक्ती कायद्यासंदर्भातील विधीमंडळ समितीच्या बैठका घेण्यात येणार असल्याची माहिती समितीचे अध्यक्ष तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. मुंबई, औरंगाबाद व …
Read More »स्त्रीयांच्या संरक्षणासाठी हा कायदा सशक्त करायचाय, मग पाठवा सूचना-सुधारणा गृहमंत्री अनिल देशमुखांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी माता-भगिनी बालकांवर अन्याय, अत्याचार करणाऱ्यांविरुद्ध अधिक कठोर कारवाई करता यावी, याकरिता ‘शक्ती’ हा कायदा करण्यात येत आहे. हा कायदा अधिक प्रभावी व्हावा याकरिता नागरिकांनी आपल्या सूचना, सुधारणा पाठवाव्यात असे आवाहन समिती प्रमुख तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले. हे विधेयक विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहातील सदस्यांच्या संयुक्त समितीकडे पाठविण्यात आलेले आहे. या समितीचे …
Read More »पुण्यातील या पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय
मुंबई: प्रतिनिधी पुणे शहरात नव्याने समाविष्ट होणाऱ्या गावांसह वाढते शहरीकरण लक्षात घेऊन पुणे शहर आणि ग्रामीण पोलीस दलातील पोलीस ठाण्यांच्या विभाजनाला मान्यता देण्यात आली. तसेच कायदा-सुव्यवस्था राखण्याच्यादृष्टीने पुणे जिल्ह्यातील वाघोली, ऊरळीकांचन, बाणेर, काळेपडळ, खराडी, फुरसुंगी, म्हाळुंगे, रावेत आणि शिरगाव या नवीन पोलीस ठाण्यांना मंजूरी देण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या …
Read More »३१ डिसेंबरला अलविदा करून नववर्षाचे स्वागत करायचेय? मग या सूचना वाचा राज्य सरकारकडून मार्गदर्शक सूचना जारी
मुंबई : प्रतिनिधी मदत व पुनर्वसन विभागाने एका आदेशान्वये राज्यात २२ डिसेंबर,२०२० ते ५ जानेवारी, २०२१ या कालावधीत रात्री ११.०० ते सकाळी ६.०० वाजेपर्यंत रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. कोविड -19 मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता त्याचप्रमाणे वरील आदेशान्वये दिलेल्या सूचना विचारात घेता ३१ डिसेंबर २०२० व नूतन वर्षाचे स्वागत अत्यंत साधेपणाने करणे अपेक्षित आहे. त्या दृष्टीने खालीलप्रमाणे मार्गदर्शक सूचना देण्यात येत आहेत. कोरोनाच्या …
Read More »या ९६ पोलिस निरिक्षकांना मिळाल्या तात्पुरत्या पदोन्नत्या गृहविभागाकडून पदोन्नतीचे आदेश जारी
मुंबई: प्रतिनिधी मागील तीन वर्षापासून रखडलेल्या ९६ पोलिस निरिक्षकांच्या रखडलेल्या पदोन्नतीचे आदेश आज गृहविभागाने जारी केले. या ९६ अधिकाऱ्यांमध्ये २०१७-१८ आणि २०१८-१९ आणि २०१९-२० या तीन वर्षातील निवड सूचीतील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यातील पोलिस निरिक्षकांना उप अधिक्षक आणि सहाय्यक पोलिस आयुक्त पदावर पदोन्नती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे या सर्व …
Read More »सरकारी खरेदी केंद्रांवर परराज्यातून धान आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश
मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारने सुरु केलेली धानखरेदी केंद्रे ही आपल्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी असून या केंद्रांवर परराज्यातलं धान विक्रीसाठी येऊ नये, त्यातून राज्याचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणासारख्या परराज्यांच्या सीमांवरील नाक्यांवर कडक तपासणी मोहिम राबवावी. परराज्यातून किंवा व्यापाऱ्यांकडून राज्यातील केंद्रांवर अवैध मार्गाने धान विक्रीसाठी आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल …
Read More »भाजप, रासपाच्या कार्यकर्त्याबरोबर भिवंडीतील या नेत्यांनी केला राष्ट्रवादीत प्रवेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत झाला सोहळा
मुंबई: प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दौंड तालुक्यातील भाजप व रासपाच्या कार्यकर्त्यांनी मुंबई येथे आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपालीताई चाकणकर व माजी आमदार रमेश थोरात यांच्या पुढाकाराने दौंड येथील तात्यासाहेब ताम्हाणे, पोपटराव बोराटे, …
Read More »खबरदार! महिला व बालकांवर अत्याचार कराल तर थेट फाशीवर लटकाल अधिवेशनात मांडण्यात येणार असल्याची गृहमंत्री अनिल देशमुख यांची माहिती
मुंबईः प्रतिनिधी राज्यातील महिला व बालकांवरील अत्याचार रोखण्यासाठी दिक्षा कायद्याच्या धर्तीवर शक्ती कायदा आगामी अधिवेशनात विधिमंडळात मांडण्यात येणार असून आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. या कायद्याअंतर्गत दाखल झालेल्या गुन्ह्यात आरोपीला तात्काळ अटक करून १५ दिवसात तपास करण्याचा कालावधी निश्चित करण्यात आला आहे. …
Read More »
Marathi e-Batmya