Tag Archives: ashish shelar

आशिष शेलार यांची घोषणा, गणेशोत्सव आता महाराष्ट्र राज्याचा महोत्सव सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांची विधानसभेत घोषणा

१०० वर्षाहून अधिक मोठी परंपरा असलेल्या सार्वजनिक गणेशोत्सवाला “महाराष्ट्र राज्य महोत्सव” म्हणून आज घोषित करण्यात आले. राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा विधानसभेत केली. विधानसभेत निवेदन करताना मंत्री आशिष शेलार म्हणाले की, महाराष्ट्रात सार्वजनिक गणेशोत्सव १८९३ साली लोकमान्य टिळकांनी सुरू केला, या उत्सवाची पार्श्वभूमी ही सामाजिक, राष्ट्रीय, …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल,.. भाजपा संपलेला भाजपा खासदार निशिकांत दुबे यांच्या वक्तव्यावरून केली टीका

मराठी माणसांसोबत गुण्या गोविंदाने राहणाऱ्या अन्य भाषिकांनीही दोन्ही भाऊ एकत्र आल्याबद्दल आनंद व्यक्त करत तुम्ही चांगले केल्याचे असल्याच्या प्रतिक्रिया अनेकांनी दिल्या. परंतु भाजपाच्या बुडाला आग लागणे साहजिक आहे. भाजपाचे राजकारण तर तोडा, फोडा आणि राज्य करा असे झालेले आहे. लोकांच्या घरांच्या होळ्या पेटवायच्या त्यावर आपल्या राजकारणाची पोळी भाजून घ्यायच्या हाच …

Read More »

आशिष शेलार यांची ठाकरे बंधूवर टीका, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं अप्रासंगिक महाराष्ट्रात कायदेशी राहणाऱ्याला कोणी कारण नाही

दोन भाऊ एकत्र झाले खूप छान झालं. दोन कुटुंब एकत्र झाली आम्हाला आनंदच आहे, कारण हिंदू जीवन पद्धती आणि हिंदू व्यवस्था यामध्ये कुटुंबाचं महत्त्व खूप आहे आणि हे मानणारी आमची विचारधारा आहे. त्यांच्या भाषणाबद्दल सांगायचंच झालं तर, एकाचं भाषण अपूर्ण आणि दुसऱ्याचं भाषण अप्रासंगिक तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव, अशी टीका …

Read More »

दादासाहेब फाळके चित्रनगरीतील निकृष्ट कामाचे अखेर त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण डेमोक्रॅटिक आरपीआयच्या आंदोलनाची दखल

मराठी भाषा दिनी मोठ्या दणक्यात खर्च करून सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उदघाटन केलेल्या गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीतील स्टुडिओला अवकाळी पावसातच लागलेल्या गळती प्रकरणाचे त्रयस्थ संस्थेमार्फत लेखापरीक्षण करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. व्यवस्थापनाच्या या आदेशनानंतर या प्रकरणी आंदोलन करण्याचा इशारा देणाऱ्या डेमोक्रॅटीक आरपीआयने आपले आंदोलन तात्पुरते स्थगित केले. …

Read More »

आशिष शेलार यांचे निर्देश, पारंपारिक गोंदण कलेचा समावेश कला अभ्यासक्रमात करा अभ्यास गटाची स्थापना करण्यासाठी पावले उचला

पारंपारिक गोंदणकलेचा समावेश कला शिक्षण अभ्यासक्रमात करण्याकरता पावले उचलावीत तसेच गोंदणकलेच्या संदर्भातील सर्वंकष संशोधनासाठी एक अभ्यासगट तातडीने स्थापन करावा असे निर्देश आज सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज येथे दिले. आज मंत्रालयात महाराष्ट्रातील पारंपारिक गोंदणकलाकारांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या बैठकीत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी हे निर्देश दिले. यावेळी सांस्कृतिक कार्य …

Read More »

आशिष शेलार यांची स्पष्टोक्ती, महाराष्ट्रात सक्ती फक्त मराठीची, हिंदीची सक्ती नाही राज्यातील चर्चा अवास्तव, अवाजवी आणि अतार्किक

महाराष्ट्रात फक्त मराठीची सक्ती असून राज्यात पहिलीपासून हिंदी भाषेची तिसरी भाषा म्हणून सक्ती करण्यात आलेली नाही, तर पुर्वीपासून पाचवी ते आठवी पर्यंत असलेली हिंदीची सक्ती आमच्या सरकारने काढून पर्यायी ऐच्छिक भाषा म्हणून हिंदी उपलब्ध करुन दिली व अन्य पर्याय उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे राज्यात सध्या सुरू असलेल्या चर्चा या अवाजवी, अतार्किक …

Read More »

दादासाहेब फाळके चित्रनगरीत मराठी कलाकारांचा ‘योगा’ चा उत्सव सांस्कृतिक कार्यमंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांच्या उपस्थितीत योगदिनानिमित्त विशेष उपक्रम

योग ही केवळ शारीरिक कसरत नसून ती भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे. याच योगविद्येच्या जागृतीसाठी आज आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त गोरेगाव येथील दादासाहेब फाळके चित्रनगरीत ‘सेलिब्रिटी योगा’ या विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाला राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड आशिष शेलार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती …

Read More »

१५ जिल्ह्यात मानधन निवड समिती नसल्याने जेष्ठ कलावंतांची शेकडो प्रकरणं धुळ खात "मान ना सन्मान"मुळे समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात वाद रंगला

“मान ना सन्मान ” या कारणाने  राजर्षी शाहू महाराज जेष्ठ साहित्यिक व कलावंत मानधन निवड समिती सदस्य विरुद्ध जिल्हाधिकारी यांच्यात नवीन वाद सध्या  अनेक जिल्ह्यात जोरदार रंगलेला असताना, पंधरा जिल्ह्यात पालक मंत्र्यानी जिल्हा मानधन निवड समिती गठीत  केली नसल्याने,शेकडो मानधन मंजूरीची प्रकरणं जिल्हाधिकारी कार्यालयात धुळ खात पडली आहेत. यामुळे राज्यातील …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांनी छत्रपती शिवाजी महाराज सर्किट रेल्वेला दाखवला हिरवा झेंडा छत्रपती शिवाजी महाराज गौरव सर्किट हा प्रेरणादायी प्रवास

भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे छत्रपती शिवाजी महाराज सर्किट अंतर्गत भारत गौरव रेल्वेच्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती …

Read More »

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ११४४ कोटींच्या योजनांचा आढावा आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली

मुंबई उपनगर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री तथा माहिती, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक कार्य मंत्री अ‍ॅड.आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या बैठकीत २०२४-२५ च्या योजनांची अंमलबजावणी, खर्चाचे विश्लेषण तसेच २०२५-२६ च्या नव्या योजनांची आखणी यावर सविस्तर चर्चा झाली. गेल्या आर्थिक वर्षात मंजूर कामांसाठी उपलब्ध असलेल्या ₹१०८८.७७ कोटींपैकी ९९.८ टक्के म्हणजेच ₹१०८६.७५ कोटी …

Read More »