महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच विविध राजकीय पक्षांमधील कार्यकर्त्ये आणि नेत्यांची उमेदवारीसाठी धावपळ सुरु झाली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत शेवटच्या क्षणी तिकीट नाकारण्यात आलेले भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र सरकारमधील माजी कॅबिनेट मंत्री राज के पुरोहित यांनी संपूर्ण राजस्थानी समाजालाच नव्हे तर या विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या उमेदवारीला पाठिंबा देण्याचे आवाहन …
Read More »भाजपाच्या व्होट जिहादमुळे अजित पवार गटाचे उमेदवार धोक्यात निवडणूक आयोगाकडूनही व्होट जिहाद शब्दावर आक्षेप
नवीनकुमार लोकसभा निवडणूकीच्या काळात भाजपाने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र राज्यातील महाविकास आघाडी आणि राष्ट्रीयस्तरावरील इंडिया आघाडीने भाजपाचा वारू रोखून धरला. त्यामुळे भाजपाने मुस्लिम समुदायाला लक्ष्य करण्यासाठी व्होट जिहाद चा मुद्दा निर्माण केला. लोकसभा निवडणुकीत मुस्लिम समाजाने इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीला एक गठ्ठा मते दिली. त्याचा फायदा महाविकास …
Read More »वर्षा गायकवाड यांचे आशिष शेलार यांना आव्हान, धारावी प्रकरणी चर्चेची तयारी धारावी प्रकल्पाच्या नावाखाली मुंबईत सर्वात मोठा जमीन घोटाळा, भाजपा नेते अदानीचे एजंट आहेत का ?
पंतप्रधानांच्या लाडक्या उद्योगपतीला मुंबई विकण्याचे षडयंत्र असून मागील महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठका ह्या अदानीला जमीन देण्यासाठीच घेतल्या का, अशी शंका येत आहे. मुंबईतील हा मोठा जमीन घोटाळा असून एका व्यक्तीसाठी केंद्र व राज्य सरकार काम करत आहे. भाजपा नेते आशिष शेलार यांचा धारावी प्रकल्पाचा अभ्यास नाही, त्यांनी अभ्यास करून बोलावे …
Read More »भाजपाकडून या पाच ते सात आमदारांना विधानसभा निवडणूकीत नारळ राम कदम, पराग शहा, तमिल सेल्वन,भारती लव्हेकर, सनिल राणे रेड झोनमध्ये
विधानसभा निवडणुकी दरम्यान भाजपाकडून मुंबईत आमदारांची तिकिटे कापली जाणार असल्याचे सांगण्यात असून मुंबईतील विद्यमान आमदारांपैकी पाच ते सात उमेदवारांचे तिकीट नाकारले जाणार असल्याची चर्चा भाजपाच्या गोटात सुरु आहे. यापैकी सर्वात मोठा धक्का घाटकोपर पश्चिमचे आमदार राम कदम यांना बसणार आहे. सुमार कामगिरीमुळे राम कदम यांचे तिकीट कापले जाण्याची शक्यता आहे. …
Read More »प्रविण दरेकर यांचे आव्हान, धमक असल्यास जरांगेंनी निवडणूक लढवावी देवेंद्र फडणवीस यांच्या नावची काविळ
सगळ्या आंदोलनातून जरांगे भरकटल्या सारखे वाटताहेत. आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाचे हित हेच सर्वोच्च प्राधान्य असेल असे वाटले होते. मराठ्यांचे आरक्षण आणि त्यांचे प्रश्न यावर न बोलता जरांगे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने आक्रोश, टाहो फोडताना दिसताहेत हे दुर्दैवी आहे. कुणाची तरी सुपारी घेतल्यासारखे जरांगे यांचे बोलणे सुरू आहे. त्यांच्यात धमक असेल …
Read More »सुधांशू त्रिवेदी यांचा आशावाद, महायुती सरकारच्या विकास कामांची पावती मतदार देणार वक्फ मुद्यावरून विरोधक गप्प का?
छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पार्टी काम करत आहे. भाजपा सरकारने देशात- राज्यात विकासाचा मोठा टप्पा पार केल्याने भारत जगातील पाचवी मोठी अर्थव्यवस्था असलेला देश झाला आहे. महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेने ५०० बिलीयन डॉलर्सचा टप्पा गाठला आहे. राज्यात महायुती सरकारने केलेल्या विकास कामांची पावती मतदार आगामी …
Read More »आशिष शेलार यांचा आरोप, निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहरी नक्षलवाद्यांचें प्रवक्ते आशिष शेलार यांचा आरोप, धारावीतील ३७ एकरचा नेचर पार्कचा भूखंड उबाठाला हडप करायचाय
ज्या पध्दीतीने मुंबईतील अनेक भूखंड उबाठा सेनेने बळकावले तसेच धारावीमध्ये असणारा नेचर पार्कचा ३७ एकरचा भूखंड दुस-या मुलाचे निसर्ग व प्राणी प्रेम दाखवून घराजवळची ही जागा बळकावयाची आहे, म्हणूनच धारावीकरांची माथी भडकवली जात आहेत. निर्बुध्द आदित्य ठाकरे हे शहर नक्षलवाद्यांचें प्रवक्ते झाले आहेत, असा गंभीर आरोप मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार …
Read More »आदित्य ठाकरे यांची टीका, महायुतीचे रिपोर्ट नाहीतर गुजरातला पाठवण्याचा डीपोर्ट कार्ड लाडक्या बहिणीला दीड हजारापेक्षा जास्त पैसे देऊ आश्वासन
महायुती सरकारच्या वतीने मागील अडीच तीन वर्षात केलेल्या कामाचे रिपोर्ट कार्ड जाहिर केले. या रिपोर्ट कार्डवरून शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी हे रिपोर्ट कार्ड नसून हे डिपोर्ट कार्ड असल्याची टीका केली. आदित्य ठाकरे यांनी आज मातोश्री येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी महायुती सरकारच्या भ्रष्ट कारभारावर …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, लाडक्या बहिणीला हात लावाल तर करेक्ट कार्यक्रम… महायुतीच्या पहिल्याच पत्रकार परिषदेत विरोधकांवर टीका
राज्यातील महायुती सरकारने सुरु केलेल्या माझी लाडकी बहिण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांकडून सातत्याने आरोप-प्रत्यारोप करण्यात येत आहेत. त्यातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लाडकी बहिण योजनेतील रकमेत महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर वाढ करणार असल्याचे जाहीर केले. तर दुसऱ्याबाजूला मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी डिसेंबर अखेरपर्यंत बहिणींना …
Read More »मनोज जरांगे पाटील म्हणाले, वाटलं नव्हतं फडणवीस असं वागाल, आता तुमचा सुफडा… मराठ्यांच्या माय माऊलींनी रात्री मुलांला जवळ घेऊन बसा आणि विचार करा
निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होण्यापूर्वी मराठ्यांना आरक्षण जाहिर करा अन्यथा आम्ही आमची भूमिका आचारसंहितेनंतर जाहिर करू अशी घोषणा मराठा आरक्षण समर्थक आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केली होती. त्यानुसार आज राज्यातील विधानसभा निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर होत राज्यातील आचारसंहिताही आजपासून लागू करण्यात आली. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की, मराठा समाजाच्या …
Read More »
Marathi e-Batmya