Tag Archives: bjp

राज्यसभेसाठी “या” उमेदवारांनी भरला उमेदवारी अर्ज; असे असणार मतांचे गणित प्रफुल पटेल, डॉ.बोंडे, महाडिक, गोयल, प्रताप गढी या पाच उमेदवारांनी भरला

महाराष्ट्रातून राज्यसभेवर जाणाऱ्या सहा जागांसाठी आज पाच उमेदवारांनी आज विधानसभेत जावून उमेदवारी अर्ज भरला. यामध्ये भाजपाच्या तीन उमेदवारांचा तर काँग्रेस एक आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका उमेदवारांनी अशा एकूण पाच उमेदवारांनी आज आपला उमेदवारी अर्ज भरला. अर्ज भरण्यासाठी ३१ मे ही शेवटची तारीख असून अर्ज माघारीची तारीख ३ जून आहे. या …

Read More »

जयंत पाटील म्हणाले, भाजपाला जशी मते कमी पडतात तशी आम्हालाही… राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांचा उमेदवारी अर्ज भरल्यानंतर दिली माहिती

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी जाहिर करण्यात आल्यानंतर भाजपाकडून माजी खासदार धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहिर केली. त्यामुळे राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी मोठ्या प्रमाणावर घोडेबाजार होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की, अपक्षांची बेरीज केली तर आमचा कोटा पूर्ण होतो. …

Read More »

हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेणाऱ्या डॉ अनिल बोंडेना बढती; राज्यसभेसाठी उमेदवारी भाजपाकडून यादी जाहिर

अमरावती जिल्ह्यातील मोर्शी विधानसभा मतदारसंघातून पराभवाला सामोर जावे लागल्यानंतर माजी कृषी मंत्री डॉ.अनिल बोंडे यांच्यावर भाजपाने राष्ट्रीय किसान सभेच्या राष्ट्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली. मात्र मागील काही दिवसांपासून डॉ. अनिल बोंडे हे सातत्याने हिंदूत्वावरून आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात केल्याने त्यांची दखल जवळपास सर्वच पक्षांनी घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे भाजपामधील श्रेष्ठींनी …

Read More »

देवेंद्र फडणवीस म्हणाले, किडक्या डोक्याचे लोक संभाजी राजेंना… श्रीमंत शाहु महाराजांना चुकीची माहिती देत आहेत

राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजेंच्या उमेदवारी नाट्याप्रकरणी श्रीमंत शाहु महाराजांनी भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांना जबाबदार धरले. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपली बाजू मांडण्यासाठी चक्क राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधताना किडक्या लोकांनी महाराजांना स्क्रिप्ट तयार करून चुकीची माहिती दिल्याचा आरोप करत त्या लोकांना समजत …

Read More »

श्रीमंत शाहु महाराजांच्या भेटीनंतर संजय राऊतांचा पलटवार, असा अपमान बरा नव्हे फडणवीसांच्या टीकेला दिले प्रत्युत्तर

संभाजी राजे यांच्या उमेदवारी नाट्यावर श्रीमंत शाहु महाराजांनी शिवसेनेची पाठराखण करत राज्यसभा निवडणूक लढवणे हा संभाजीराजेंचा व्यक्तिगत निर्णय होता. त्यात छत्रपती घराण्याचा अपमान होण्याचा मुद्दा येत नाही अशी भूमिका मांडली. त्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. यानंतर शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी आज सकाळी शाहु महाराजांच्या न्यु पॅलेस येथील निवासस्थानी …

Read More »

फडणवीसांच्या टीकेवर नाना पटोले म्हणाले, श्रीमंत शाहु महाराजांचे वक्तव्य स्पष्ट शरद पवार आणि फडणवीसांमधील संबध आपल्याला माहित नाही

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर संभाजी राजे आणि भाजपाने शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यानंतर दस्तुरखुद्द श्रीमंत शाहु महाराज यांनीच याप्रश्नावर संभाजीराजे यांचे कान टोचत त्या सगळ्या खेळामागे देवेंद्र फडणवीस हेच असल्याची शक्यता वर्तविली. त्यानंतर फडणवीसांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केल्यानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना …

Read More »

नरेंद्र मोदींची आठ वर्षे: देश आणि आर्थिक परिस्थिती एका बाजूला राजकिय यश तर दुसऱ्याबाजूला अपयशांची मालिका

देशाच्या केंद्रीय सत्तेत येवून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला आठ वर्षे झाली. परंतु, या आठ वर्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकाबाजूला देशात भाजपाच्या राजकिय यशाची कमान बरीच चढत्या स्वरूपात ठेवली आहे. त्यामुळे भाजपाला अपयशाचा सामना करावा लागत नाही. मात्र दुसऱ्याबाजूला भारतातील लोकशाहीवादी आणि सामाजिक स्वातंत्र्य व आंतररारष्ट्रीय आर्थिक संकटातून वर …

Read More »

वडिलांच्या वक्तव्यावर संभाजी राजेंनी दिली “ही” प्रतिक्रिया ट्विट करत म्हणाले मी काही भाष्य करणार नाही

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजी राजे यांनी शिवसेनेशी सुरू असलेली चर्चा फिस्कटल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शब्द फिरविला असा आरोप केला. तसेच आपण आता स्वराज्य संघटनेची बांधणी करणार असल्याची घोषणा केली. यावरून राज्यात भाजपाने शिवसेनेवर टीका सुरु केल्यानंतर या प्रकरणी दस्तुरखुद्द संभाजी राजे यांचे वडील श्रीमंत शाहु महाराज यांनीच भाष्य करत संभाजी राजे यांना …

Read More »

संभाजी राजेंच्या उमेदवारी प्रश्नी श्रीमंत शाहु महाराज म्हणाले, त्यांचे कुठे छापून आले नाही काय सल्ला हे माहित नाही पण ते वक्तव्य चुकीचे

राज्यसभा निवडणूकीतील उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी शब्द फिरवल्याचा आरोप केला. त्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी आणि शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. त्यातच आज कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या शिवसेनेचे प्रकक्ते संजय राऊत यांनीही भाजपावर टीकेची झोड उठविली. त्यामुळे …

Read More »

भाजपाचा पलटवार, शेंबडं पोर तरी विश्वास ठेवेल का? संजय राऊतांच्या टीकेला चंद्रकांत पाटील यांचे उत्तर

राज्यसभा निवडणूकीकरीता संभाजी राजे आणि शिवसेनेतील बोलणी फिस्कटल्यानंतर आणि त्यानंतर संभाजी राजे यांनी मुख्यमंत्र्यावर आरोप केल्यानंतर भाजपाकडून शिवसेनेवर टीकेची झोड उठविली. या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊत यांनी संभाजी राजे आणि आमच्या पक्षातील हा विषय इसून इतरांनी चोंबडेपणा करू नये असा खरमरीत टोला लगावला. तसेच चंद्रकांत पाटील हे शिवाजी महाराजांचे …

Read More »