Tag Archives: bjp

बिहारमध्ये पंतप्रधान मोदींना हादरा, भाजपाबरोबरील नितीश कुमार यांचा संसार मोडीत काँग्रेस, आरजेडी आणि डाव्यांबरोबर पुन्हा सत्ता स्थापन करणार

महाराष्ट्रातील सत्ता हस्तगत करण्यासाठी शिवसेनेत बंड घडवून आणत भाजपाने शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांना सोबत घेत शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारची स्थापना केली. तर दुसऱ्याबाजूला बिहारचे नितीश कुमार यांना दिलेल्या शब्दाप्रमाणे मुख्यमंत्री पदावर बसवित भाजपाने सरकार चालविण्याचा प्रयत्न केला. मात्र नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील संयुक्त जनता दल आणि …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, राज्यातील ED सरकार महाराष्ट्रासाठी की गुजरातसाठी? नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत मात्र बुलेट ट्रेनवर ६ हजार कोटींची उधळपट्टी

राज्यात एकनाथ शिंदे व देवेंद्र फडणवीस सरकार स्थापन होऊन ३९ दिवसानंतर मंत्रिमंडळ विस्तार झाला असला तरी हे सरकार महाराष्ट्राच्या हितासाठी आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विदर्भ, मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देण्यास या सरकारकडे पैसे नाहीत. पण गुजरातच्या हिताचा व पंतप्रधान नरेंद्र मोंदींचा ड्रिम प्रोजेक्ट बुलेट ट्रेनसाठी ६ हजार कोटी …

Read More »

सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे-फडणवीस सरकारला मोदींच्या ‘त्या’ वाक्याचा विसर मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला मंत्र्यांचा समावेश नाही

सत्तांतरानंतर जवळपास ४० दिवस रखडलेल्या शिंदे-फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार आज पार पडला. या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाच्या ९ तर शिंदे गटाच्या ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. मात्र या दोन्ही पक्षांकडून महिला मंत्र्यांचा समावेशच करण्यात आला नाही. यापार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, शिंदे सरकारच्या मंत्रिमंडळात महिलांना योग्य …

Read More »

नवनियुक्त १८ मंत्र्यांचा अल्प परिचय माहित आहे का? मग वाचा भाजपा-शिवसेना मंत्र्यांचा माहिती थोडक्यात

शिंदेे-फडणवीस सरकारच्या आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ विस्तारात नवनियुक्त १८ जणांना मंत्री पदाची शपथ दिली. हे सर्व आमदार पूर्वी कधी मंत्री झाले होते. त्यांचा मतदारसंघ कोणता? त्याचे जन्मसाल, शिक्षण, त्यांनी केलेल्या कामाचा माहिती यासह त्या सर्वांचा अल्प परिचय खालील प्रमाणे :- विखे–पाटील, श्री. राधाकृष्ण एकनाथराव जन्म : 15 जून, 1959. जन्म …

Read More »

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कामाचा झपाटा ३९ दिवसात ३९९ फाईल्स क्लिअर ३९९ फाईल्सचा निपटारा जनहिताच्या निर्णयांना वेग

राज्य सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेला वेग आला असून नवीन सरकारने कार्यभार स्वीकारल्यापासून ते आजतागायत जनहिताचे विविध निर्णय झपाट्याने घेतले आहेत. १ जुलै ते अगदी आत्तापर्यंत म्हणजे ८ ऑगस्टपर्यंतच्या कालावधीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ३९९ फाईल्सचा निपटारा केला आहे. विशेष म्हणजे यात नैसर्गिक आपत्ती मधील मदत, गरजूंना मदत, कृषि विभाग, मंत्री मंडळासमोर …

Read More »

राज्यपालांच्या आदेशानुसार रखडलेले पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सहा दिवस कामकाज होणार

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार जाऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाच्या पाठिंब्यावरील सरकार सत्तेवर आले. त्यामुळे महाविकास आघाडी सरकारने जाहिर केलेले नियोजित १७ जुलै रोजी होणारे पावसाळी अधिवेशन पुढे ढकलण्यात आले. त्यातच शिंदे आणि उध्दव ठाकरे यांची एकमेकांच्या विरोधात सुरु असलेली न्यायालयीन लढाई सर्वोच्च न्यायालयात अद्यापही सुरु आहे. त्यावर अंतिम निकाल …

Read More »

नाना पटोले यांचा सवाल, पंतप्रधान ओबीसी समाजाचा असूनही समाजाला काय मिळाले? जातीनिहाय जनगणना झाल्याशिवाय ओबीसी समाजाला न्याय मिळणार नाही

देशभरात ओबीसींची संख्या जास्त असूनही आजपर्यंत या समाजावर अन्यायच झालेला आहे. मंडल आयोगामुळे २७ टक्के आरक्षण मिळण्यास सुरुवात झाली पण हे आरक्षणही आज धोक्यात आल्याचे दिसत आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्ष होत आहेत तरिही ओबीसी समाजाला योग्य न्याय मिळालेला नाही. आज पंतप्रधानपदावर ओबीसी समाजाचा व्यक्ती असूनही ८ वर्षात समाजाला …

Read More »

राज्य मंत्रिमंडळ विस्तारात भाजपा आणि शिंदे गटातील या संभावित चेहऱ्यांना मिळणार संधी आणि खाती भाजपामधून १५ तर शिंदे गटातून १० जणांचा समावेश राहणार

सर्वोच्च न्यायालयात एकनाथ शिंदे आणि उध्दव ठाकरे यांच्यात शिवसेनेचा वारससह कोण पात्र-अपात्र या मुद्यावरून न्यायालयीन लढाई सुरु आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस यांच्या नुकत्याच झालेल्या दिल्ली दौऱ्यानंतर राज्यात मंत्रिमंडळ विस्ताराची लगबग सुरु आहे. या मंत्रिमंडळात भाजपाकडून १५ तर शिंदे गटाकडून १० जणांची नावे अंतिम करण्यात आली …

Read More »

विस्तारीत मंत्रिमंडळाचा शपथविधी सकाळी ११ वाजता राजभवनात: २० ते २५ जणांचा समावेश? राज्यपाल भवन, राज शिष्टाचार विभाग इन रेडी पोझिशन

शिवसेनेत एकनाथ शिंदे यांच्यासह ४० जणांनी बंडखोरी करत शिवसेनेवर दावा केला. तसेच उध्दव ठाकरे गटाने एकनाथ शिंदेंसह त्यांच्या समर्थक आमदारांच्या विरोधात दाखल केलेल्या अपात्रतेच्या विरोधात थेट सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर पुन्हा उध्दव ठाकरे गटाकडूनही एकनाथ शिंदे यांच्या विरोधात याचिका दाखल करण्यात आल्या. मात्र कायदेशीर बाबी सुरु असतानाही राज्य मंत्रिमंडळाचा …

Read More »

कट्टर हिंदूत्ववादी शिंदे-फडणवीस सरकारचा मोहरम सणाच्या दिवशी मंत्रिमंडळ विस्ताराचा शपथविधी २०-२५ जणांचा होणार शपथविधी

राज्यात सत्तांतर होत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाजपाच्या पाठिंब्याने सरकार सत्तेवर आले. हे सरकार स्थापन झाल्यापासून एकनाथ शिंदे यांच्या गटातील आणि भाजपाकडून हे सरकार हिंदूत्ववादी असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र या हिंदूत्वावादी सरकारकडून एक महिन्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार हिंदू सणाच्या किंवा हिंदू शुभ दिवशी होणे अपेक्षित …

Read More »