राज्यसभा निवडणूक उमेदवारीवरून संभाजी राजे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर शब्द फिरविल्याचा आरोप केला. त्यातच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही शिवसेनेवर शरसंधान साधला. त्यास उत्तर देताना सध्या कोल्हापूर दौऱ्यावर असलेले शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस आणि संभाजी राजेंना प्रत्युत्तर दिले. वाचा …
Read More »सदाभाऊ खोतांना भाजपाचा निरोप, “विश्रांती घ्या” विधान परिषद निवडणूकीत पत्ता कट
रयत क्रांती संघटनेचे संस्थापक माजी भाजपाचे राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना आता विश्रांती घ्या असा निरोप आल्याचे कळते. त्यामुळे विधानपरिषदेच्या निवडणुकीतून खोत यांचे नाव मागे पडले आहे. विधान परिषदेच्या १० जागासाठी निवडणुका जाहीर झाल्या असून २० जून रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीतून रयत क्रांती संघटनेचे संस्थापक, माजी मंत्री सदाभाऊ खोत …
Read More »किरिट सोमय्या म्हणाले; परबांनी ती जागा विकली, पण उध्दव ठाकरेंना नोबेल पारितोषिक मिळेल ईडी कारवाईनंतर सोमय्यांची पुन्हा मुख्यमंत्री आणि अनिल परबांवर टीका
ईडीने काल राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या सरकारी आणि खासजी निवासस्थानासह ७ ठिकाणी धाडी टाकत १२ तासाहून अधिक काळ चौकशी केली. त्यानंतर अनिल परब यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रिसॉर्ट माझ्या मालकीचे नाही. तसेच चौकशीला आपण सामोरे जाणार असल्याचेही जाहिर केले. त्यानंतर आज भाजपाचे माजी खासदार किरिट सोमय्या यांनी आज …
Read More »चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर अजित पवारांचा इशारा, आम्ही पण खूप काही बोलू शकतो… महाराष्ट्राची संस्कृती ती नाही
भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अतिशय चुकीचे वक्तव्य केले असून महाराष्ट्राची ती संस्कृती नाही. आम्ही पण खूप काही बोलू शकतो, पण आपल्या संस्कृतीचा विचार करुन गप्प बसतो असा गर्भित इशारा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आयोजित जनता दरबारानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. चंद्रकांत पाटील यांचे ते वक्तव्य त्यांच्या …
Read More »संजय राऊत म्हणाले, धाडी टाकल्याने निवडून येतील असे वाटत असेल तर… राज्यसभेसाठी संजय राऊत आणि संजय पवार यांनी उमेदवारी अर्ज भरला
नियोजित कार्यक्रमानुसार राज्यसभेच्या निवडणूकीकरीता शिवसेनेकडून प्रवक्ते संजय राऊत आणि कोल्हापूरचे जिल्हाप्रमुख संजय पवार हे दोघेही आज आपले अर्ज भरणार होते. तत्पूर्वीच राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या शासकिय निवासस्थानासह त्यांच्याशी संबधित सात ठिकाणी ईडीने धाडी टाकल्या. यापार्श्वभूमीवर शिवसेना प्रवक्ते संजय राऊत यांना विचारले असता ते म्हणाले की, भाजपाकडून दबावतंत्र सुरू …
Read More »चंद्रकांत पाटील यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना आव्हान, तिहेरी चाचणी काय ते सांगा ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपाचा धडक मोर्चा
ओबीसींचे राजकीय आरक्षण पुन्हा मिळविण्याचा निर्धार करून भारतीय जनता पार्टीने बुधवारी मुंबईत मंत्रालयावर धडक मोर्चा काढला व पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी अटक करून घेतली. महाविकास आघाडी सरकार ओबीसींची फसवणूक करत असल्याचा आरोप यावेळी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. वाचा चंद्रकांत पाटील यांची मागणी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राजीनामा द्यावा नाना पटोले …
Read More »नाना पटोले म्हणाले, तर भाजपाची नौटंकी… आरक्षणाप्रश्नी राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान कार्यालयावर मोर्चा काढावा -
ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी भारतीय जनता पक्षाने मंत्रालयावर काढलेला मोर्चा हे निव्वळ ढोंग आणि नौटंकी असल्याची टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपाचे सरकार राज्यात असतानाच ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात आणण्याची सुरुवात झाली आणि त्याला केंद्रातील भाजपा सरकारने साथ दिली हे उघड सत्य आहे, …
Read More »ढोंगी भाजपाला संविधान सोडा पण सावरकरांचा राष्ट्रवाद ही मान्य नाही सबका साथ, सबका विश्वास’ असेल तर भाजपाची मदरशांवर वक्रदृष्टी का? सचिन सावंत
देशात धार्मिक उन्माद वाढवण्याचे भाजपाचे पद्धतशीपणे प्रयत्न सुरु असून मदरशांचा मुद्दाही त्यातील एक भाग आहे. आसामचे मुख्यमंत्री हेमंता विश्वशर्मा यांनी मदरसे अस्तित्वातच नसावेत असे म्हटले आहे. नव्याने धर्मांतर केलेले अधिक कट्टर असतात अशी म्हण आहेच. याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी मदरशांना सरकारी अनुदान देण्यावर बंदी घातली आहे. हा सर्व …
Read More »फडणवीस यांचा सवाल, पेट्रोल का महाग? उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा पेट्रोल डिझेल दरवाढ, ओबीसी आरक्षणाच्या प्रश्नी एल्गार पुकारा
महाराष्ट्रात पेट्रोलवर केंद्र सरकारचा कर १९ रुपये प्रतिलीटर तर राज्याचा कर २९ रुपये आहे. आता उद्धव ठाकरे, अजित पवार आणि नाना पटोले सांगा, राज्यात पेट्रोल डिझेलची महागाई कोणामुळे आहे, असा सवाल करत विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना या विषयावर आंदोलन करून खोटारड्यांना उघडे पाडण्याचे आवाहन …
Read More »ओबीसीशिवाय “या” १४ महापालिकांच्या आरक्षण सोडत आणि हरकतींचा कार्यक्रम जाहिर ३१ मेला होणार आरक्षणाची सोडत
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार ओबीसी आरक्षणाशिवाय प्रभागातील अनुसूचित जाती-जमाती आणि महिला आरक्षणाचा कार्यक्रम पूर्ण करण्यासंदर्भात राज्य निवडणूक आयोगाने आज मुंबईसह १४ महापालिकांना आदेश दिले. विशेष म्हणजे अन्य राखीव प्रवर्गासाठी आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर करून येत्या ३१ मे रोजी या राखीव प्रवर्गासाठी सोडत काढण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने महापालिकांना दिले. राज्यातील …
Read More »
Marathi e-Batmya