Tag Archives: chief minister

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या नेतृत्वाखालील जीएसटी कौन्सिलकडून मोठ्या सुधारणांना हिरवा कंदील या गोष्टींमध्ये सुधारणेस मान्यता

५७ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत वस्तू आणि सेवा कर (जीएसटी) चे पालन करणे सोपे करणे, परतावा जलद करणे आणि कर अधिकाऱ्यांचा प्रत्यक्ष हस्तक्षेप कमी करणे या उद्देशाने प्रक्रिया सुधारणांच्या एका व्यापक संचाला मंजुरी देण्यात आली आहे. सर्वात मोठ्या बदलांपैकी एक म्हणजे परतावा प्रक्रियेत आहे. परताव्याच्या दाव्याची पोचपावती देण्याची कालमर्यादा १५ …

Read More »

अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांच्या जलद सुनावणीसाठी पुणे येथे विशेष न्यायालयाची स्थापना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पुढाकार

राज्यातील अंमली पदार्थांशी संबंधित गुन्ह्यांची सुनावणी जलदगतीने व्हावी आणि अशा प्रकरणांचा वेळेत निपटारा व्हावा, यासाठी विशेष नामनिर्देशित न्यायालय स्थापन करण्याच्या प्रक्रियेला गती देऊन ६ ऑगस्ट २०२६ रोजी नार्कोटिक ड्रग्स अँड सायको ट्रॉपिक सब स्टान्सेस ॲक्ट अंतर्गत पुणे येथे विशेष न्यायालय स्थापन करण्यात आले आहे. यासाठी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री …

Read More »

पश्चिम बंगाल सरकारच्या सल्लागार पदी भाजपा नेते मिथुन चक्रवर्ती यांची नेमणूक मिथुन चक्रवर्ती यांना कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा राहणार

ज्येष्ठ अभिनेते आणि भाजप नेते मिथुन चक्रवर्ती यांची पश्चिम बंगाल सरकारमध्ये सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्तीमुळे राज्याच्या प्रशासनातील सांस्कृतिक बाबींमध्ये या दिग्गज चित्रपट व्यक्तिमत्त्वाला महत्त्वाची भूमिका मिळाली आहे. मिथुन चक्रवर्ती यांना ‘माहिती आणि सांस्कृतिक व्यवहार विभागात’ (जो मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांच्या अखत्यारीत आहे) कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असेल. …

Read More »

पोलीस कोठडीतील मृत्यू प्रकरणी नुकसानभरपाईच्या धोरणास मान्यता जवळच्या वारसांना नुकसान भरपाई देण्याचा मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

पोलीस कोठडीतील व्यक्तींच्या मृत्यू प्रकरणात त्यांच्या जवळच्या वारसदारांना नुकसानभरपाई देण्याबाबतच्या धोरणास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. या धोरणानुसार पोलीस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्या मारहाण, अत्याचार किंवा दबावामुळे  मृत्यू झाल्याचे निष्पन्न झाल्यास जवळच्या वारसदारास ५ लाख रुपये नुकसानभरपाई देण्यात येणार आहे. अशा व्यक्तीस शारीरिक किंवा …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती, किमान ७० किलोमीटर मेट्रो मार्गिकांच्या पूर्णत्वातून २०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ मुंबईच्या दळणवळणाला गती देण्यासाठी मेट्रो आणि उन्नत मार्गिकांच्या कामांना वेग

२०२७ हे ‘मेट्रो वर्ष’ ठरवून यंदाच्या प्रलंबित कामांसह पुढील वर्षी किमान ७० किलोमीटर लांबीच्या मेट्रो मार्गिका पूर्ण कराव्यात. डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होणाऱ्या ३६ किलोमीटर मेट्रो मार्गिकांची व्याप्ती ५० किलोमीटरपर्यंत नेण्यासाठी कामांना गती द्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. पायाभूत सुविधांची कामे निर्धारित मुदतीत पूर्ण करण्यासाठी प्रकल्पांवरील किमान …

Read More »

मुख्यमंत्री डी के शिवकुमार यांचा आरोप, फॉर्म ७चा भाजपाकडून गैरवापर धर्माच्या आधारे मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांची नावे मतदार यादीतून वगळली

बेंगळुरूमध्ये एका मुस्लिम कुटुंबातील आठ सदस्यांना त्यांच्या धर्मामुळे लक्ष्य करण्यात आल्याच्या घटनेनंतर, कर्नाटकचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी मतदार यादीतून पात्र मतदारांची नावे वगळण्याच्या “गुन्हेगारी स्वरूपाच्या कटाचा” आरोप केला. उल्सूर येथील ३२ सदस्यांच्या एका कुटुंबाने स्थानिक भाजप नेत्यावर यादीतून आठ सदस्यांची नावे वगळण्यासाठी अर्ज दाखल केल्याचा आरोप केला. प्रसारमाध्यमाशी बोलताना …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आश्वासन, डिजिटल युगात मराठीला ज्ञानभाषा करणार मराठी ही केवळ संवाद आणि भाषा नव्हे, तर संस्कृती-इतिहासाची साक्षीदार

मराठी भाषा ही केवळ संवादाचे माध्यम नाही, तर ती आपल्या समृद्ध संस्कृतीची वाहक आणि जाज्वल्य इतिहासाची साक्षीदार आहे. विपुल शब्दसंपदा, समृद्ध साहित्यपरंपरा आणि विविध बोलीभाषांचा वारसा लाभलेल्या मराठीला २१ व्या शतकात डिजिटल आणि ज्ञानभाषा म्हणून अधिक सक्षम करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मराठीचा दैनंदिन व्यवहारातील वापर …

Read More »

हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, शिवाजी पार्कवर तरुणाईचा प्रचंड असंतोष, सरकारविरोधातील आवाज दडपण्यासाठीच खोटे गुन्हे तरुणाईने उपस्थित केलेल्या मुळ प्रश्नांना भाजपाने उत्तर द्यावे, हिंदू-मुस्लीम व भारत-पाकिस्तानचे तुणतुणे बंद करा

केंद्र व राज्यातील भाजपाचे भ्रष्ट सरकार, निवडणूक आयोगाच्या पक्षपाती कारभाराविरोधात तरुणाईमध्ये प्रचंड असंतोष आहे. शिवाजी पार्कवरील आंदोलनात या असंतोषाला वाचा फोडण्याचे काम करण्यात आले आहे, परंतु भाजपाच्या मोदी सरकार विरोधातील हा असंतोष दडपण्यासाठी सरकारने त्यांच्यावर खोटे गुन्हे दाखल केले आहेत. भाजपाने कितीही गुन्हे दाखल केले तरीही ही तरुणाई आता मागे …

Read More »

शरद पवार यांचे आश्वासन, दुष्काळी परिस्थितीवर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या दौऱ्याला सुरुवात

राज्यावर ओढवलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आजपासून पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाचा दौरा सुरू केला. बारामती, पुरंदर आणि दौंड या तालुक्यांमध्ये ते थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा जाणून घेत आहेत. पुरंदर तालुक्यातील परिंचे गावात शरद पवार यांनी या दौऱ्यात राज्य …

Read More »

चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा सरकारचा प्रयत्न ! दुष्काळी परिस्थिती पाहून ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या तालुक्यांचाही समावेश करणार

पंचनामे लवकर पूर्ण करण्याचा सरकारचा प्रयत्न असून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खिशात काहीतरी मदत गेली पाहिजे, असा सरकारचा विचार असून कॅबिनेट उपसमितीचीही त्याबाबत शिफारस असल्याचे महसूल मंत्री व दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले,” राज्यातील दुष्काळी परिस्थितीत ट्रिगर-वनमध्ये न आलेल्या मात्र प्रत्यक्षात दुष्काळाची स्थिती असलेल्या …

Read More »