Tag Archives: chief minister

मुंबईतील बोट दुर्घटनेत १३ जणांचा मृत्यूः पाच लाखाची मदत जाहिर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहितीः बोटीतील १०१ प्रवाशांना वाचविण्यात यश

मुंबईत एलिफंटा परिसरात प्रवासी बोट बुडाल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत बोटीतील १३ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आली असून १०१ जणांना वाचविण्यात यश आलं आहे. तसेच या दुर्घटनेत मृत्यूमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियाना ५ लाख रूपयांची मदत जाहिर करण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना दिली. या बोट …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण अनेक पोलिस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत केले उद्घाटन

महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. www.home.maharashtra.gov.in या नावाचे अद्ययावत असे संकेतस्थळ आता माहितीजालकावर उपलब्ध झाले आहे. मुख्यमंत्र्यांच्या रामगिरी शासकीय निवासस्थानी झालेल्या गृह विभागाच्या बैठकीत संकेतस्थळाचे अनावरण झाले. या बैठकीस मुख्य सचिव सुजाता सौनिक, गृह विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. …

Read More »

महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण

राज्यातील गोवंशाचे संवर्धन करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र गोसेवा आयोगाच्या www.mahagosevaayog.org या नवीन संकेतस्थळाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज येथे अनावरण करण्यात आले. विधानभवनातील समिती सभागृहात या संकेतस्थळाचे अनावरण करण्यात आले. राज्यामध्ये देशी गोवंशाचे संवर्धन, संरक्षण व कल्याण करण्यासाठी आणि त्यासाठी कार्यरत असणाऱ्या संस्थांचे पर्यवेक्षण करण्यासाठी, गोसेवा आयोगाची स्थापना …

Read More »

नागपूर मेट्रो प्रकल्प टप्पा-२ आशियाई बँक देणार १५२७ कोटींचे अर्थसहाय्य नागपूर शहरासह परिसराचा अधिक गतीने विकास होणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूर मेट्रो रेल्वे प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याला चालना देण्यासाठी आशियाई विकास बँकेकडून १ हजार ५२७ कोटी रुपयांचे (२०० मिलियन डॉलर) अर्थसहाय्य मिळणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात यासंदर्भात प्रकल्प करार करण्यात आला. या प्रकल्पामुळे नागपूर शहरासह परिसराच्या विकासाला आणखी गती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …

Read More »

उद्धव ठाकरे भलत्याच मुडमध्ये, दरेकरांशी मिश्किल संवाद, मुख्यमंत्री-अध्यक्ष भेट पत्रकार परिषदेनंतर नूरचा बदलला

नागपूरातील हिवाळी अधिवेशनास कालपासून सुरुवात झाली. या अधिवेशनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे कालपासून अधिवेशनात सहभागी झाले. आज अधिवेशनाचा दुसऱ्या दिवशीही उद्धव ठाकरे हे विधान परिषदेच्या कामकाजात सहभागी झाले. मात्र आज उद्धव ठाकरे यांचा नूर काही केल्या औरच असल्याचे विधिमंडळाच्या परिसरात पाह्यला मिळाले. आज एकाच दिवशी राष्ट्रवादीतील छगन भुजबळ यांच्या निमित्ताने नाराजी …

Read More »

भास्कर जाधव यांच्या आक्षेपामुळे मुख्यमंत्री फडणवीस यांनी विधेयकच मागे घेतले विधेयक आता चर्चेसाठी ठेवणार आता मागे घेतो

राज्यातील महायुती सरकारला संशयातीत बहुमत मिळाल्यानंतर नागपूरमध्ये होत असलेल्या हिवाळी अधिवेशनात राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देणे सुरु होते. तसेच दुपारनंतर काही काळ राज्यातील राज्य सरकारकडून विधेयक मंजूर करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. या विधेयके विधानसभेत मांडून त्यास मंजूरी देण्याची प्रक्रिया ही अध्यक्षांकडून पार पाडली जात होती. मात्र शिवसेना उबाठाचे …

Read More »

उच्च न्यायालयाने अदानीच्या विरोधातील याचिकाकर्त्याला ठोठावला ५० हजाराचा दंड अदानीला वीज पुरवठ्यासाठीचे कंत्राट देण्याचा निर्णय योग्य

राज्यात औष्णिक वीज पुरवठ्याचे कंत्राट अदानी ट्रान्समिशनला देण्याचा माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयाविरोधातील याचिका उच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावली. तसेच, याचिकाकर्त्याला ५० हजार रुपयांचा दंडही ठोठावला. अदानी ट्रान्समिशला दिलेल्या ६६०० मेगावॅटच्या कंत्राटाबाबत केलेले आरोप हे तथ्यहीन असल्याचे निरीक्षण मुख्य न्या. देवेंद्र कुमार उपाध्याय आणि न्या. अमित बोरकर यांच्या खंडपीठाने रिट …

Read More »

बीड सरपंच हत्येतील आरोपींना लवकरात लवकर अटक करा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषदेत केली मागणी

बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार ३ आरोपींना लवकरात लवकर अटक करावी. तसेच या घटनेत दोषी असलेल्या सर्वांची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आज सभागृहात केली. बीड मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची माहिती आज २८९ अनव्ये दानवे यांनी सभागृहात मांडली. …

Read More »

सुप्रिया सुळे यांची मागणी, बीड आणि परभणीत काय घडलं याचं उत्तर मुख्यमंत्री यांनी द्यावे जनतेने इतक्या विश्वासाने कौल दिला आहे तर लगेच कामाला लागायला पाहिजे

बीड आणि परभणीमध्ये झालेल्या घटना दुर्दैवी आहेत. महाराष्ट्राला तीन आठवड्यांपासून गृहमंत्री नाहीत. माझी अपेक्षा होती की एवढं मोठं बहुमत जर महाराष्ट्राच्या मायबाप जनतेने यांना दिलं आहे तर त्यांनी कामाला लागायला हवं होतं, असा उपरोधिक टोला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे यांनी नवी दिल्ली येथे पत्रकारांशी …

Read More »

मुख्यमंत्री फडणवीस यांचे आदेश, परभणीत कोंबिग ऑपरेशन करू नका… पोलिसांना दिले आदेश अवैध पद्धतीने आंदोलन करणाऱ्यावर कडक कारवाई करा

परभणीत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यालगत असलेल्या राज्यघटनेची विटंबना झाल्यानंतर त्यावर तेथील स्थानिक दलित समाजाची प्रतिक्रिया उमटली. यावेळी विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी परभणी बंदची हाक दिली. मात्र या परभणी बंदच्या आंदोलनाला हिंसक वळण लागले. आंदोलकांकडून सुरु असलेल्या आंदोलना दरम्यान काही जणांनी अज्ञात समाजकंटकांनी पोलिसांच्या वाहनावर दगडफेक करत जाळपोळीच्या घटना घडवून आणल्याचे …

Read More »