Tag Archives: cm fadnavis

निवडणुकीचा निधी जमा करण्याकरीता नगरविकास खाते चालविले जात आहे का? आराखडा तयार असतानाही अधिसूचनेचे मसूदे काढले जात असल्याचा काँग्रेसचा आरोप

 मुंबई : प्रतिनिधी ऑक्टोबर २०१७ मध्ये मुंबई महानगरपालिकेने २०३४ सालापर्यंतचा विकास आराखडा सरकारकडे अंतिम मंजुरीसाठी सादर केला आहे. मुख्यमंत्र्यांनीही सहा महिन्यात तो मंजूर केला जाईल असे आश्वासन दिले असताना सद्यस्थितीत अस्तित्वात असलेल्या विकास नियंत्रक नियमावलीमध्ये बदल करणा-या अधिसूचनांच्या मसुद्याचा या सरकारने सपाटाच लावलेला आहे. सदर प्रस्तावित बदल बिल्डरांचे उखळ पांढरे …

Read More »

केंद्राच्या निधीतून राज्यात ४ लाख कोटींची कामे पूर्ण केंद्रीय भूपृष्ठमंत्री गडकरींची ग्वाही

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारमध्ये मला काम करण्याची संधी मिळाली असून रस्ते वाहतूक आणि नौकानयन विभागाच्या माध्यमातून राज्यात आतापर्यंत ४ लाख २७ हजार ८५५ कोटी रुपयांची कामे मार्गी लावली आहेत. माझ्या कार्यकाळात ५ लाख कोटींची कामे करण्याचे टार्गेट ठेवले होते. ते लक्ष्य पूर्ण करून सहा लाख कोटीपर्यंतची …

Read More »

बस, लोकल रेल्वे, मोनोचा प्रवास आता एकाच तिकिटावर एकात्मिक तिकिट प्रणालीच्या पहिल्या टप्प्याचे काम सुरू करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी मुंबई महानगर प्रदेशात कामाच्या निमित्ताने बस, लोकल रेल्वे आणि मोनोने प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाला वेगवेगळ्या वाहतूक व्यवस्थेचा वापर करताना वेगवेगळे तिकिट काढावे लागते. त्यात प्रवाशांचा मोठ्या प्रमाणावर वेळ जात असल्याने या सर्व वाहतूक व्यवस्थेचे एकाच कार्डावर तिकिट उपलब्ध व्हावे यासाठी एकात्मिक तिकिट …

Read More »

सरकारच्या घोषणा- करार फार झाले, मुर्त स्वरूपात काहीच नाही शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांचा राज्य सरकारला उपरोधिक टीका

मुंबई : प्रतिनिधी गेल्या चार वर्षांत सरकारने फक्त घोषणा आणि करार केले. मात्र ते मूर्त स्वरुपात आलेच नसल्याची टीका करत एकाही प्रकल्पाची विट रचली नाही. त्यामुळे मी गेलो तर उद्घाटनालाच जाईन असे सांगत ‘मेकिंग महाराष्ट्र’, ‘मॅग्नेटीक महाराष्ट्र’ झाला, अजून बरेच होतील. पण त्यात होणार्‍या हजारो कोटींच्या गुंतवणूकीतील किती टक्के मोदीकडे …

Read More »

भ्रष्टाचारामुळे ग्राम समितीचे अधिकार आता जिल्हा परिषदांकडे राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील ग्रामीण भागात करावयाच्या पाणी पुरवठ्याची दोन कोटी रूपयांची कामे मंजूर करण्याचे अधिकार ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समितीकडे होते. मात्र समितीने मंजूर केलेल्या कामात आर्थिक अपहार अर्थात भ्रष्टाचार होत असल्याच्या आरोपावरून या ग्राम समितीला देण्यात आलेले अधिकार रद्द बातल करण्याचा निर्णय घेत हा निधी मंजूर करण्याचे अधिकार …

Read More »

शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांचा उद्या मंत्रालयावर महामोर्चा ९१ शिक्षक संघटनांसह २ लाख कर्मचारी सहभागी होणार

मुंबई : प्रतिनिधी शासन दरबारी प्रलंबित असलेल्या मागण्यांची दाद मागण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने मंत्रालयावर उद्या गुरूवारी २२ फेब्रुवारी रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. या महामोर्चात राज्यातील शासकिय कर्मचाऱ्यांबरोबरच निमशासकिय कर्मचाऱ्यांच्या संघटनांचे तब्बल २ लाख कर्मचारी सहभागी होणार असून शिक्षकांच्या ९१ संघटनांनी पाठिंबा देत या मोर्चात सहभागी होणार असल्याची …

Read More »

राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटींची गुंतवणूक मँग्नेटीक महाराष्ट्र कॉर्न्व्हजन्स २०१८ समेटच्या समारोपात मुख्यमंत्र्यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी मँग्नेटीक महाराष्ट्रच्या माध्यमातून राज्यात १२ लाख १० हजार ४६४ कोटी रुपये गुंतवणुकीचे ४ हजार १०६ सामंजस्य करार झाले आहेत. त्या माध्यमातून ३६ लाख ७७ हजार १८५ जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्याच्या अविकसित भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे सांगितले. वांद्रे …

Read More »

आंदोलनात सहभागी होणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई राज्य सरकारच्या सामान्य प्रशासनाचा नवा फतवा

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शासकिय कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या संघटनांच्यावतीने आपल्या विविध मागण्यांच्या प्रश्नी महामोर्चाचे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनात सहभागी होणाऱ्या कर्मचारी-अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा फतवा राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाकडून काढण्यात आला आहे. शासकिय सेवेतील कर्मचारी-अधिकाऱ्यांची राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्यावतीने २२ फेब्रुवारी २०१८ रोजी महामोर्चाचे आंदोलन मंत्रालयासमोर करण्यात येणार …

Read More »

एक खिडकी योजनेतून १०० कोटींपेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांना मान्यता मुख्यमंत्री कार्यालयाचे सचिव प्रविण परदेशींचा दावा

मुंबई : प्रतिनिधी एमआयडीसी क्षेत्रात उद्योग सुरु करावयाचा झाल्यास आता फक्त ५ परवानग्या घ्याव्या लागतात. एक खिडकी योजनेतून सुमारे १०० कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीच्या प्रकल्पांना मान्यता देण्यात आल्याचा दावा मुख्यमंत्र्यांचे अपर मुख्य सचिव प्रविणसिंह परदेशी यांनी आज दिली. बीकेसी  येथे आयोजित “मॅग्नेटिक महाराष्ट्र ”  जागतिक गुंतवणूकदारांच्या शिखर परिषदेत आज “उद्योग सुगमता ” अर्थात …

Read More »

विमा क्षेत्रातील धोरणाबाबाबत केंद्र सरकारशी चर्चा करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन

मुंबई : प्रतिनिधी देशात सर्वाधिक ५० टक्के परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात असून नवीन धोरणामुळे ही गुंतवणूक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. विमा क्षेत्रात गुंतवणुकीसाठी मोठ्या संधी असून या क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी आपण लक्ष घालणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मँग्नेटीक महाराष्ट्र-२०१८ मधील परकीय गुंतवणूकदारांच्या राऊंड टेबल चर्चेदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. …

Read More »