Tag Archives: cm uddhav thackeray

पदोन्नतीतील रिक्त जागा भरण्यावरून माजी मंत्र्याची टीका महाविकास आघाडी सरकारने आपला खरा चेहरा दाखविला

भंडारा: प्रतिनिधी राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार हे मागासवर्गिय समाजाचे अहित करणारे सरकार असून अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती च्या पदोन्नतीने भरण्याची ७० हजार पदे सर्व सामान्य कोट्यातुन भरण्याच्या दृष्टीने १८ फेब्रुवारी २०२१ ला या सरकारने निर्णय काढुन आपला खरा चेहरा दाखविल्याची टीका राज्याचे भाजपाचे माजी सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी केली. …

Read More »

…तरच आपण आत्मनिर्भर बनू, केंद्राने धोरण तयार करावे मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनी पंतप्रधानांना बैठकीतच ठणकावले

मुंबई: प्रतिनिधी राज्यांत स्पर्धा जरूर व्हायला हवी पण ती सवलती किती देतात अशी आर्थिक नसावी तर राज्यांच्या प्रशासकीय कार्यक्षमता आणि उपलब्ध सुविधांवर निकोप अशी व्हावी तरच सर्व राज्यांना त्याचा फायदा होईल असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, केंद्राने गुंतवणुकी संदर्भात काही निकष ठरवायला हवेत. केवळ पैशाच्या स्वरूपात गुंतवणुकीचा विचार …

Read More »

राज्याच्या महसूल उत्पन्नात २५ ते २८ टक्के घट: मात्र कर्जात वाढ केंद्रानेही घेतला हात आखडता

मुंबई : विशेष प्रतिनिधी राज्याचे अर्थसंकल्पिय अधिवेशन आगामी १ मार्च २०२१ पासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर वित्तीय परिस्थिती पुन्हा बिकट असल्याचे दिसून येत असून मागील ८ ते ९ महिने कडक लॉकडाऊन राहिल्याचा परिणाम म्हणून राज्याच्या तिजोरीत मोठ्या प्रमाणावर तूट आली आहे. तरीही लॉकडाऊनमध्ये शिथिलता आणल्यामुळे काही प्रमाणात आर्थिक क्षेत्रे काही …

Read More »

कोरोना: महाराष्ट्रातील या जिल्ह्यात संचारबंदीसह हे निर्बंध जारी राज्य सरकार आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून जारी आदेश

मुंबई : प्रतिनिधी राज्यात कोरोना संसर्गाचे प्रमाण पुन्हा वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर राज्यातील जिल्ह्यांमध्ये यासंदर्भातील निर्बंध आदेश जारी करण्यात आले आहेत. अकोला जिल्ह्यात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी दर रविवार संपूर्ण तर रात्रीही संचारबंदीचे आदेश देण्यात आले आहेत. यवतमाळ जिल्ह्यातही संचारबंदी लागू करण्यात आली आहे. नांदेड जिल्ह्यात कोरोना रुग्ण तपासणीचा वेग वाढविण्याचे निर्देश देण्यात …

Read More »

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर : पदोन्नतीतील १००% रिक्त जागा भरणार आरक्षित जागांसह तात्पुरत्या स्वरूपात भरण्याचा निर्णय

मुंबई : प्रतिनिधी राज्य सरकारी सेवेतील आरक्षित पदोन्नतीतील पदांसह सर्व पदे सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय अखेर राज्य सरकारने घेतला. त्या अनुषंगाने यासंदर्भात शासन निर्णयही जाहिर करण्यात आला आहे. मात्र पदोन्नतीतील आरक्षण देण्याबाबतची याचिका सध्या सर्वोच्च न्यायालयात असल्याने हि सर्व पदे तात्पुरत्या स्वरूपात सेवा ज्येष्ठतेनुसार भरण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शासन निर्णयात …

Read More »

मुंबईकरांनो सावधान ! कोरोनाचे हे नियम मोडाल तर होणार गुन्हा दाखल महानगरपालिका आयुक्‍त इकबाल सिंह चहल यांचे सक्‍त आदेश

मुंबई : प्रतिनिधी कोविड-१९ विषाणूचा संसर्ग पूर्णपणे नियंत्रणात येत असतानाच मागील काही दिवसांत रुग्‍ण संख्‍या वाढत असल्‍याने संपूर्ण यंत्रणेने सतर्क राहणे गरजेचे आहे. वाढती रुग्‍ण संख्‍या पाहता घरी विलगीकरण राहणाऱ्यांच्‍या हातावर शिक्‍के मारावेत, त्‍यांनी नियम मोडला तर त्‍यांच्‍यावर गुन्‍हे दाखल करावेत. लग्‍न समारंभ आयोजनाचे नियम मोडणाऱया आयोजकांसह व्‍यवस्‍थापनांवरही गुन्‍हे दाखल …

Read More »

मंत्री संजय राठोडचे प्रकरण म्हणजे “नो वन किल्ड जेसिका” विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा टोला

मुंबईः प्रतिनिधी बीडच्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी राज्याचे मंत्री संजय राठोड यांच्या विरोधात पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. मात्र त्या प्रकरणाची अवस्था नो वन किल्ड जेसिका या सटायर फिल्म सारखी असल्याचा उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली. अर्थसंकल्पिय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित संसदीय कामकाज सल्लागार मंडळाच्या बैठकीनंतर ते बोलत होते. …

Read More »

खर्डी आणि अंबरनाथमधील जमिनीत एमआयडीसीतील कोणाचा रस? डोंगराळ आणि संवेदनशील पर्यावरण भागातील जमिनीची खरेदी

मुंबईः विशेष प्रतिनिधी राज्यात उद्योजकांना सहजरीत्या जमिनी उपलब्ध व्हाव्यात यासाठी उद्योग विभागाच्या अखत्यारीत असलेल्या एमआयडीसीकडून प्रत्येक जिल्ह्यात-शहरात जमिनीची खरेदी केली जाते. याचाच भाग म्हणून एमआयडीसीने वाशिंद-शहापूरच्या दरम्यान संवेदनशील पर्यावरणीय क्षेत्रात मोडणारी १ हजार एकर आणि अंबरनाथ मधील डोंगराळ असलेली जमिन जी कोणत्याही स्वरूपात उद्योग उभारणीसाठी अनुकूल नसताना का खरेदी केली …

Read More »

पिंपरी-चिंचवड मेट्रोसह हे तीन महत्वाचे निर्णय घेतले राज्य मंत्रिमंडळाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत निर्णय

मुंबई: प्रतिनिधी राज्यात नाविन्यपूर्ण कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविणार पर्यटन धोरण-२०१६ मधील तरतूदीनुसार  तसेच कोविड-19 च्या पार्श्वभूमीवर सुरक्षित पयर्टनाच्या दृष्टीने पर्यटक खाजगी वाहनाने प्रवासास प्राधान्य देत आहेत हे पाहता, आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत कॅरॅव्हॅन व कॅरॅव्हॅन पार्क या सुविधा पर्यटकांना उपलब्ध करुन देण्यासाठी कॅरॅव्हॅन पर्यटन धोरण राबविण्यास मान्यता देण्यात आली. अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव …

Read More »

कोरोनाच्या पार्श्वभूमी मुख्यमंत्री ठाकरे , उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले हे आदेश राज्यातील विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक

मुंबईः प्रतिनिधी लॉकडाऊन पाहिजे की काही थोड्या निर्बंधांसह मोकळेपणाने राहायचे हे जनतेने ठरवायचे आहे. लोक मास्क घालत नाहीत किंवा आरोग्याचे नियम पाळत नसतील तर जिल्हा आणि पोलीस प्रशासनावर हे नियम काटेकोरपणे अंमलात आणण्याची जबाबदारी आहे, त्यांनी अजिबात शिथिलता न दाखवता कडक दंडात्मक व आवश्यक कारवाई केलीच पाहिजे असे स्पष्ट आदेश …

Read More »