दसरा मेळाव्याला गर्दी जमवण्यासाठी एकनाथ शिंदे गटाने राज्यातील विविध भागातून एस टी बसेस तसेच खाजगी बससेमधून कार्यकर्ते आणले जात आहेत. यासाठी एसटी महामंडळाकडे १० कोटी रुपये रोख भरले असून ते मोजण्यासाठी महामंडळाला दोन दिवस लागले असे वृत्त माध्यमांमधून समजते. शिंदे गटाकडे एवढी मोठी रक्कम कोठून आली? त्यांना हा पैसा कोणी …
Read More »‘वंदे मातरम्’ला विरोध करून काँग्रेसने देशविरोधी मानसिकता दाखवली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी दूरध्वनीवर हॅलो ऐवजी वंदे मातरम् म्हणावे या राज्य शासनाच्या निर्णयाला विरोध करून काँग्रेसने आपली देशविरोधी मानसिकताच दाखवली आहे, अशी टीका भारतीय जनता पार्टीचे प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. ‘वंदे मातरम्’ला विरोध करणारे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी स्वातंत्र्य संग्रामात वंदे मातरम् …
Read More »नाना पटोले म्हणाले, पोकळ चिंता व्यक्त करण्यापेक्षा आरएसएसने मोदी सरकारलाच सांगा सामाजिक विषमतेचे बीज राष्ट्रीय स्वसंयेवक संघानेच पसरवले
केंद्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचाराचे भाजपाचे सरकार आल्यापासून देशात महागाई, गरिबी व बेरोजगारीची स्थिती चिंताजनक बनलेली आहे. यावर विविध स्तरातून तीव्र नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारवर आसूड ओढले जात आहेत, लोकांमध्ये प्रचंड संताप असूनही मोदी सरकार त्याकडे लक्ष देत नाही. आज राष्ट्रीय स्वसंयेवक संघाला त्याची जाणीव झाली हे विशेष म्हणावे …
Read More »शरद पवार म्हणाले, … ते मी कधीही ऐकलं नाही एक शिवसेना तर दुसरी शिंदे सेना दोघात तिसऱ्या पक्षाने येण्याचे कारण नाही
राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार असताना शिवसेनेने भाजपाबरोबरील युती तोडून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन कऱण्यासाठीचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा समावेश असलेल्या शिवसेनेच्या शिष्टमंडळाने काँग्रेसला दिला होता असा गौप्यस्फोट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केला. त्यावरून राज्यातील चर्चेच्या फेऱ्या खाली बसल्या नाहीत तोच दाव्यावर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा …
Read More »अतुल लोंढे म्हणाले, त्या धसक्याने भाजपाला ‘सर्वधर्मसमभाव’ची आठवण वायुसेनेच्या कार्यक्रमात पंडितजींबरोबरच मौलवींकडूनही प्रार्थना
खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेने देशातील वातावरण ढवळून निघाले आहे. या पदयात्रेला सर्व जाती-धर्माच्या लोकांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या यात्रेची दखल भाजपा व आरएसएसला घ्यावी लागत आहे. संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांच्या उपस्थितीत लाइट कॉम्बॅट हेलीकॉप्टर वायुसेनेला सुपूर्द करण्याच्या जोधपूर येथील कार्यक्रमात सर्व धर्माच्या पंडितांकडून प्रार्थना करण्यात आली. …
Read More »नाना पटोलेंचा टोला, ‘भारत जोडो’ यात्रेच्या प्रचंड प्रतिसादाने भाजपाचे संतुलन बिघडले भाजपाच्या टीकेचा ‘भारत जोडो’ यात्रेवर काहीही फरक पडत नाही
काँग्रेस नेते खा. राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील भारत जोडो यात्रेला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहून भारतीय जनता पक्षाचे नेते बिथरले आहेत. भाजपाच्या नेत्यांचे संतुलन बिघडले असून त्याच निराश मानसिकतेतून पदयात्रेवर टीका केली जात आहे. परंतु भाजपाच्या या टीकेचा पदयात्रेवर तसूभरही परिणाम होणार नसून ही पदयात्रा जनतेच्या अभूतपूर्व प्रतिसादासह काश्मीरपर्यंत मार्गक्रमण करत …
Read More »नाना पटोले यांची मागणी, त्या Tax च्या माध्यमातून होणारी सर्वसमान्यांची दुहेरी लुट थांबवा
महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षात बऱ्याच जिल्ह्यातील राज्य महामार्गांचा दर्जा वाढवून त्यांना राष्ट्रीय महामार्ग म्हणून घोषित करण्यात आले आहे. यातील काही महामार्गांची बांधकामे पूर्ण झाली आहेत तर काही महामार्गांची कामे अद्याप सुरु आहेत. या महामार्गाचा वापर सुरू करण्यापूर्वी या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून रस्त्याच्या बांधकामासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी टोल लावण्यात …
Read More »जयंत पाटील म्हणाले, अशोक चव्हाण यांनी जो गौप्यस्फोट केला त्यात तथ्य… मराठा समाजाबद्दलचे तानाजी सावंतांचे वक्तव्य तीच भूमिका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची...
२०१४ साली अशोक चव्हाण यांची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन शिवसेना – कॉंग्रेस आघाडीबाबत चर्चा केली असा अशोक चव्हाण यांनी गौप्यस्फोट केला असेल तर त्यात तथ्य असणे स्वाभाविक आहे, असे मत व्यक्त करतानाच सध्या मुख्यमंत्र्यांनी जी युती केली आहे ती कशासाठी केली हे संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे असा टोलाही राष्ट्रवादी …
Read More »‘आदर्श’ घालून देणाऱ्या नेत्याच्या विधानांना फारसे महत्व देण्याची गरज नाही देवी कुणाच्या पाठीशी ते सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाने स्पष्ट झाले, खैरे, दानवेंच्या टीकेला म्हस्के यांचं सडेतोड प्रत्युत्तर
शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख आणि प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा खरपूस समाचार घेतला आहे. ज्या चव्हाणांनी संपूर्ण महाराष्ट्रासमोर ‘आदर्श’ घालून दिला त्यांनी केलेल्या वक्तव्याला महत्व देत नसल्याचे मत म्हस्के यांनी व्यक्त केले आहे. त्यासोबतच ज्यांच्या स्वतःबद्दल गेल्या काही दिवसात ते नाराज असून इकडे तिकडे जाणार …
Read More »भाजपाचा सवाल, ‘पीएफआय’ वरील कारवाईवर विरोधकांचे मौन का? भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांचा सवाल
पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या कट्टरवादी संघटनेवर केंद्रीय तपास यंत्रणांनी केलेल्या कारवाईमुळे देशात धार्मिक विद्वेष आणि दहशतवाद माजविण्याचा कट उघड झाला असून देशाच्या लोकशाही व सामाजिक सलोख्याशी तडजोड नाही हेच या कारवाईतून स्पष्ट झाले आहे. विरोधकांनी क्षुद्र राजकारण बाजूला ठेवून देशाच्या सुरक्षेबाबत सर्व राजकीय पक्षांचे ऐक्य असल्याचे दाखवून द्यावे, असे …
Read More »
Marathi e-Batmya