Tag Archives: congress

टास्कफोर्स स्थापून सर्वोच्च न्यायालयाकडून मोदींच्या अपयशावर शिक्कामोर्तब कोरोना प्रतिबंधक लसीचे 'राष्ट्रीय धोरण' जाहीर करावे : नाना पटोले

मुंबई : प्रतिनिधी केंद्रातील मोदी सरकार कोवीड परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे. केंद्र सरकारच्या गलथानपणामुळे लसीकरण मोहिमही फसली आहे. देशभरात लसीकरण केंद्राबाहेर लोकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. १७ कोटी जनतेला लस दिल्याचे मोदी सरकार सांगते पण लाखो लोकांची दुसऱ्या डोसची कालमर्यादा उलटून गेली तरी अजून त्यांना दुसरा डोस …

Read More »

महासत्तेचे स्वप्न दाखविणाऱ्यांनी दुसऱ्या देशासमोर हात पसरविण्याची वेळ आणली काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची टीका

मुंबई: प्रतिनिधी भारताला एक समृद्ध राष्ट्र म्हणून उभे करण्यात काँग्रेस पक्षाचा मोठा वाटा राहिला आहे. जगात भारत ताठ मानेने उभा राहिला तो पंडित नेहरूंपासून काँग्रेसच्या सरकारांनी केलेल्या विकासकामामुळे. परंतु दुर्दैवाने मागील सात वर्षात देशाच्या लौकीकाला काळीमा फासण्याचे काम भाजपा सरकारने केले आहे. कोरोनाच्या महामारीत तर मोदी सरकारने देशातील जनतेला वाऱ्यावर …

Read More »

येत्या शैक्षणिक वर्षांपासून नांदेडमधील शासकीय परिचर्या महाविद्यालय सुरु वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांचे आदेश

मुंबई : प्रतिनिधी परिचारिकांची वाढती आवश्यकता लक्षात घेता राज्य शासनाने नांदेड येथे शासकीय परिचर्या महाविद्यालय अर्थात ‘नर्सिंग कॉलेज’ मंजूर केले आहे. येत्या शैक्षणिक वर्षांपासून हे महाविद्यालय सुरू करण्याबाबतची तयारी करण्यात यावी, असे निर्देश वैद्यकिय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी दिले. डॉ. शंकरराव चव्हाण वैद्यकीय महाविद्यालय आणि शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालयात संदर्भातील बैठक आज …

Read More »

पुनावाला म्हणतात, रात्रीत उत्पादन वाढवणे शक्य नाही लस पुरवठ्यावरून निर्माण झालेल्या गोंधळावर पुनावाला यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबई: प्रतिनिधी लसींचा पुरवठा करण्यावरून एका राजकिय पक्षाच्या नेत्याकडून धमकीचा फोन आल्याचा गौप्यस्फोट सीरम इन्स्टीट्युटचे सीईओ अदार पुनावाला यांनी करताच यावरून एकच गदारोळ निर्माण झाला. त्यावर विविध राजकिय पक्षांनी पुनावाला यांना कोणी फोन केला याचा खुलासा करण्याची मागणी करण्यास सुरु झाली. अखेर याप्रश्नी आपले मौन सोडत रात्रीत लसींचे उत्पादन वाढविणे …

Read More »

धमकी कोणी दिली याचा खुलासा अदर पुनावाला यांनी करावा गरज पडल्यास पुनावाला यांना राज्य सरकार व काँग्रेस सुरक्षा पुरवेल- नाना पटोले

मुंबई: प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधक लस उत्पादन करणाऱ्या पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांना धमकावण्यात आल्याचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. पुनावाला यांनी स्वतःच लंडनमध्ये एका मुलाखतीत महत्वाच्या राजकीय व्यक्तीने धमकावल्याची माहिती दिली असून त्यांना धमकी देणारा राजकीय व्यक्ती कोण आहे, याचा खुलासा त्यांनी करावा असे आवाहन करत पुनावाला यांनी देशहितासाठी लंडनमधून …

Read More »

लेकाच्या अभियानात बापाने उचलला खारीचा वाटा जयंत पाटील यांनी उचलला दहा जणांच्या लसीचा खर्च

सांगली: प्रतिनिधी आज सांगली येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लसीचा पहिला डोस घेत प्रतिक जयंत पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या#Citizens4Maharashtra या मोहिमेचे समर्थन म्हणून दहा जणांच्या लसीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देत असल्याचे जाहीर केले. लस अगदी सुरक्षित आहे, त्यामुळे प्रत्येकाने शासनाच्या नियमानुसार लस घ्यावी. रुग्णसंख्येत दिवसेंदिवस घट …

Read More »

काँग्रेस आमदार १ महिन्याचे तर मंत्री थोरात वर्षाचे वेतन मुख्यमंत्री सहाय्यता निधीला आमदारांच्या वेतनाचे २ कोटी रुपये, काँग्रेस कमिटी ५ लाख तर अमृत उद्योग समूहाच्या ५ हजार कर्मचाऱ्यांचा खर्चही देणार

मुंबई : प्रतिनिधी कोरोना संकटामुळे राज्य अडचणीत असतानाही राज्यातील नागरिकांच्या आरोग्याला प्राधान्य देत महाराष्ट्र विकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संकटकाळात एका जबाबदार राजकीय पक्षाचा नेता आणि लोकप्रतिनिधी म्हणून राज्य सरकारच्या या कामात थोडीशी मदत म्हणून आपण आपल्या एक वर्षाच्या वेतनाची आणि …

Read More »

काँग्रेस म्हणते, आता मुख्यमंत्र्यांनीच अधिकृत घोषणा करावी मोफत लसीकरणावरून श्रेयवादाची लढाई अयोग्य: बाळासाहेब थोरात

मुंबई: प्रतिनिधी राज्यातील जनतेचे कोरोनापासून संरक्षण करण्याच्यादृष्टीकोनातून मोफत लस देण्याची घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी जाहिर यांनी करताच शिवसेना नेते तथा मंत्री आदित्य ठाकरे यांनी यांनी यासंदर्भात राज्य सरकारकडून योग्य तो निर्णय जाहिर करणार असल्याचे ट्विट करत अंतिम निर्णय झाले नसल्याचे स्पष्ट केले. तर मोफत लस …

Read More »

“त्या” आरोपांबाबत भाजपा उच्च न्यायालयात अवमान याचिका दाखल करणार प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा सीबीआयप्रकरणी इशारा

पुणे : प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सीबीआय चौकशी उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार चालू असली तरीही ही चौकशी म्हणजे भारतीय जनता पार्टीकडून यंत्रणेचा दुरुपयोग असल्याचा आरोप करण्यात येत आहे. हा आरोप म्हणजे उच्च न्यायालयाचा अवमान असून भाजपा त्याच्या विरोधात अवमान याचिका दाखल करेल, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी रविवारी पिंपरी …

Read More »

केंद्र सरकारने देशभरात मोफत कोरोना लसीकरण करावे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

मुंबई : प्रतिनिधी देशभरात कोरोनाने उद्भवलेली परिस्थिती चिंताजनक आहे. दररोज दोन हजारांपेक्षा जास्त लोकांचा मृत्यू होत आहे. रुग्णालयात बेड्सही मिळत नाहीत. हे केंद्र सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे परिणाम आहेत. कोरोनाच्या पहिल्या लाटेनंतर लसीकरणासंदर्भात तरी योग्य ते नियोजन करणे अपेक्षित असताना त्याकडेही अक्षम्य दुर्लक्ष करण्यात आले. लसीकरणामुळे कोरोनाचा प्रभाव मोठ्या प्रमाणात कमी …

Read More »